Lokmat Sakhi >Social Viral > बापरे! युट्यूबर पोरीनं घेतलं एकावेळी १०० मोमोज खाण्याचं चॅलेन्ज; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल शॉक

बापरे! युट्यूबर पोरीनं घेतलं एकावेळी १०० मोमोज खाण्याचं चॅलेन्ज; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल शॉक

YouTuber takes up challenge to finish 100 momos : अलीकडेच या व्हिडिओनं पुन्हा एकदा नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतलं आणि ऑनलाईन ट्रेंड झाला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 01:25 PM2022-01-04T13:25:11+5:302022-01-04T16:09:57+5:30

YouTuber takes up challenge to finish 100 momos : अलीकडेच या व्हिडिओनं पुन्हा एकदा नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतलं आणि ऑनलाईन ट्रेंड झाला आहे. 

YouTuber takes up challenge to finish 100 momos. Old video with 7 million views goes viral | बापरे! युट्यूबर पोरीनं घेतलं एकावेळी १०० मोमोज खाण्याचं चॅलेन्ज; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल शॉक

बापरे! युट्यूबर पोरीनं घेतलं एकावेळी १०० मोमोज खाण्याचं चॅलेन्ज; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल शॉक

आजकाल सगळ्यांनाच मोमोज खायला खूप आवडतात. सोशल मीडियावर मोमोज खाणाऱ्या तरूणीचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. एका YouTuber ने एकाच वेळी 100 मोमो पूर्ण करण्याचे आव्हान स्वीकारले. माधुरी लाहिरीने तिच्या मॅडीईट्स चॅनलवर मोमो खाण्याचे आव्हान स्वीकारतानाचा एक व्हिडिओ अपलोड केला आहे. गेल्या वर्षी अपलोड केलेल्या व्हिडिओला ७० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. अलीकडेच या व्हिडिओनं पुन्हा एकदा नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतलं आणि ऑनलाईन ट्रेंड झाला आहे. 

YouTuber माधुरी लाहिरी अनेकदा युट्यूबवर तोंडाला पाणी सुटेल असे फूड व्हिडीओज अपलोड करते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये ती तिच्या समोर ठेवलेल्या चिकन मोमोजवर ताव मारत होती. तिने आव्हान पूर्ण केले का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. ती 100 मोमोज खाऊ शकली नाही आणि तरीही तिच्याकडे 10-20 तुकडे शिल्लक होते. तरीही तिचा हा प्रयत्न वाखाणण्याजोगा होता.

इतकं कठीण चॅलेन्ज पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यानं काही सोशल मीडिया युजर्सनी नाराजी व्यक्त केली. इतरांनी निदर्शनास आणून दिले की ही विलक्षण आव्हाने करत असताना इतक्या कॅलरीज घेणे आरोग्यासाठी योग्य नाही. एका युजरनं म्हटलं की, “मला या मुलीची खरोखर काळजी वाटते.  ती जेवढं अन्हेल्दी आहार घेते ते फारच भयानक आहे. आशा आहे की, तिला भविष्यात वैद्यकीय समस्यांचा त्रास होणार नाही. दुसऱ्या युजरनंने लिहिले." हे पाहताना माझ्या तोंडाला पाणी सुटले होते." 

Web Title: YouTuber takes up challenge to finish 100 momos. Old video with 7 million views goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.