Lokmat Sakhi >Social Viral > ‘तिची’ बॅटिंग पाहून युवराज सिंगही थक्क झाला, कोलकात्याच्या मुलीसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘तिची’ बॅटिंग पाहून युवराज सिंगही थक्क झाला, कोलकात्याच्या मुलीसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Viral Video Of Rishika Sarkar: ४ वर्षांच्या रिषिका सरकार या चिमुकलीचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ क्रिकेटर युवराज सिंगने (Yuvraj Singh) पाहिला आणि बघा काय केलं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2024 03:55 PM2024-07-20T15:55:18+5:302024-07-20T16:04:01+5:30

Viral Video Of Rishika Sarkar: ४ वर्षांच्या रिषिका सरकार या चिमुकलीचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल झाला आहे. तो व्हिडिओ क्रिकेटर युवराज सिंगने (Yuvraj Singh) पाहिला आणि बघा काय केलं...

yuvraj singh gave scholarship to 4 years old girl rishika sarkar | ‘तिची’ बॅटिंग पाहून युवराज सिंगही थक्क झाला, कोलकात्याच्या मुलीसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

‘तिची’ बॅटिंग पाहून युवराज सिंगही थक्क झाला, कोलकात्याच्या मुलीसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Highlightsती तिच्या वडिलांसोबत नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळत होती. त्यानंतर जे काही घडलं ते तिच्या आयुष्याला मोठी कलाटणी देणारं ठरणार आहे एवढं मात्र नक्की... 

प्रत्येक लहान मुल एखादी कला, बुद्धीमत्ता घेऊन जन्माला आलेलं असतं. ते अचूक ओळखून त्याच्या गुणांना वाव देता आला तर मग त्या मुलाच्या आयुष्याला योग्य वळण मिळतं, दिशा मिळते. असंच काहीसं कोलकता येथे राहणाऱ्या रिषिका सरकार या ४ वर्षीय मुलीचं आहे. भारतातली बहुतांश लहान मुलं क्रिकेट खेळतच मोठी झाली आहेत. मुलगा असो किंवा मुलगी असो लहानपणी बहुतांश मुलांनी हातात बॅट, चेंडू घेऊन बॅटींग, बॉलिंग केलेलीच असते. रिशिकाचंही तसंच. ती तिच्या वडिलांसोबत नेहमीप्रमाणे क्रिकेट खेळत होती. त्यानंतर जे काही घडलं ते तिच्या आयुष्याला मोठी कलाटणी देणारं ठरणार आहे एवढं मात्र नक्की... 

 

तर त्याचं झालं असं की रिशिकाच्या घरात कोणीही क्रिकेट खेळणारं नाही. कारण तिचे आई- वडील कामगार आहेत. घरची परिस्थितीही खूपच जेमतेम. त्यामुळे तिने टिव्हीवरच काय तो खेळ पाहिला असणार.

व्हिक्सचा वापर करून डास पळवून लावण्याचा भन्नाट उपाय! घरात शोधूनही डास सापडणार नाहीत..

ती नेहमीच तिच्या वडिलांसोबत क्रिकेट खेळायची. तशीच ती त्या दिवशीही खेळली. खूप मस्त खेळत होती. त्यामुळे तिचा खेळ पाहून एकाने तिच्या खेळाचं शुटिंग करून ते सोशल मिडियावर शेअर केलं. तिची ती क्लिप खूप व्हायरल झाली आणि ती चक्क माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या पाहण्यात आली. तिचे बॅटींगचे स्ट्रोक पाहून तो आश्चर्यचकीत झाला.

बॅटिंग करण्याची तिची प्रतिभा पाहून त्याने तिला थेट मर्लिन राइज युवराज सिंग सेंटर ऑफ एक्सीलंस यांच्यातर्फे शिष्यवृत्ती दिली आहे.

वजन कमी करण्यासाठी रोज ३ पदार्थ पाण्यात टाकून प्या, ८ दिवसांतच दिसेल फरक- चरबी उतरेल

तिथे तिला क्रिकेटचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार असून त्याचा संपूर्ण खर्च तसेच तिच्या शिक्षणाचा खर्च युवराज सिंग करणार आहे. एवढंच नाही तर त्याने सही केलेली एक बॅट तसेच एक जर्सी देखील तिला भेट म्हणून दिली. लेकीच्या आयुष्याला मिळालेली ही दिशा तिच्या गरीब पालकांना सुखावून टाकणारी होती. 

 

Web Title: yuvraj singh gave scholarship to 4 years old girl rishika sarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.