- कोमल दामुद्रेमुलीला स्वयंपाक करता येत नाही? हा प्रश्न म्हणजे घरीदारी केवढा मोठा प्रश्न. मुलगी आहे तर स्वयंपाक आलाच पाहिजे. (Zeenat Aman says she can't cook) त्यात मुलींना शिकवलं जातं की नवऱ्याच्या हृदयापर्यंत पोहोचायचं असेल तर त्याचा एकमेव मार्ग म्हणजे पोट. त्याला चांगल खाऊ घातलं तो तुझ्या मुठीत. (zeenat aman revels her diet) अजूनही हे समज काही पुसले गेलेले नाहीत. पण आता मुली सांगू लागल्या आहेत की मला जेमतेम बेसिक स्वयंपाक येतो, मला फार स्वयंपाक येत नाही, किंवा मला अजिबात स्वयंपाक करता येत नाही. (priyanka chopra comment on zeenat aman post)अर्थात असं म्हंटलं की लोकांचे कान टवकारतात. पण निदान ते उघड सांगण्यापर्यंतची मुलींची तयारी झाली आहे. खरंतर स्वयंपाक ही काही जेंडरबेस गोष्ट नाही. मुलामुली दोघांना तो यायला हवा, आणि दोघांना तो येत नसेल तर तसं म्हणण्याचं स्वातंत्र्य आणि स्वीकारही हवा.
याविषयाचं निमित्त म्हणजे, झीनत अमान यांनी केलेली एक पोस्ट. त्या म्हणतात की मला स्वयंपाक करताच येत नाही. त्यावर प्रियांका चोप्राही कमेंट करत म्हणाली की सेम, सेम. मलाही येत नाही. मागे काजोलही म्हणाली होती की मला स्वयंपाक करता येत नाही. आता मुद्दा असा आहे की स्वयंपाक करता येत नाही असं बाईनं म्हणणं म्हणजे खरंच काही भयंकर मोठं पाप आहे का?
पूर्वीच्या काळी महिलांना चूल आणि मुल याच्या पलीकडे आयुष्य जगता येतं नव्हतं. सतत स्वयंपाकघरात काही ना काही बनवून घरच्यांना खुश करत असतं. परंतु, ही परिस्थिती सध्या बदलताना दिसत आहे. हल्ली स्वयंपाकाचे क्लास घेतले जातात. कधी कंटाळा आला किंवा काही महत्त्वाचे काम असले की, आपण बाहेरुन जेवण ऑर्डर करतो. कित्येक महिला खाद्यपदार्थचा बिझनेस देखील करतात. महिलांची शिक्षणाच्या बाबतीत प्रगती झाली आणि त्या स्वतंत्र राहू लागल्या. वाढत्या तंत्रज्ञानामुळे त्यांची हातातील महत्त्वाची आणि रोजची कामे कमी होऊ लागली. स्वयंपाक करण्यासाठी त्यांच्याकडे अनेक पर्याय आले.
पूर्वीच्या काळी स्वयंपाक करता येत नाही हे जाहीर सांगताना आजवर महिलांना संकोच वाटत आला परंतु, आता हे चित्र बदलताना आपल्या दिसून येतं आहे. याचे कारण असे की, सोशल मीडियावर प्रत्येक जण काही ना काही पोस्ट करत असतो. त्यात जर एखाद्या सेलिब्रिटी स्टार ने काही पोस्ट केलं की, तो चर्चेचा विषय ठरतो. अशीच एक पोस्ट अभिनेत्री झीनत अमानने गुरुवारी केली. त्या म्हणतात, की मला अंडी उकडवण्यापलिकडे काही येत नाही. पूर्वी आपल्याला स्वयंपाक करता येत नाही हे सांगण्याची मला लाज वाटायची. 'यांच्या या पोस्टला अनेकांनी कॉमेंट्स केल्या पण त्यातली एक पोस्ट महत्त्वाची ठरली ती म्हणजे प्रियंका चोप्राची. ती म्हणते की, मॅडम सेम तेच... मलाही स्वयंपाक करता येत नाही. मी सुद्धा टेबलावर सरळ जेवायला बसते.’
झीनत अमान म्हणतात की, अन्न हे शरीराला इंधन म्हणून पुरते. पोषणतज्ञ, आहारतज्ज्ञ आणि वैयक्तिक प्रशिक्षक हे सारं आपल्या आयुष्यात येण्यापूर्वी आईने एक गोष्ट कायम मनात रुजवली "थोडे खा, ताजे खा". त्या म्हणाल्या की, ८० च्या दशकात एका पेपरात माझा स्वयंपाक करतानाचा फोटो प्रकाशित झाला होता. जो पूर्णपणे बनावट होता. त्यासाठी मी खूप स्पोर्टिंगली पोझ दिली परंतु खरे हे आहे की, स्वयंपाकघरात फक्त अंडं मला उकडता येतं. तरीही स्वयंपाक ही माझ्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. माझा धाकटा मुलगा उत्तम शेफ बनला जो कधीकधी घरी चांगले पदार्थ बनवून मला चकीत करतो.’मुद्दा झिनत अमान यांचा असला तरी विषय हाच की एकतर स्वयंपाक मुलगामुलगी दोघांना येऊ शकतो, किंवा दोघांनाही त्यात रुची नसू शकते. नियम दोघांनाही सारखेच..