Lokmat Sakhi >Social Viral > शाब्बास!! जोया अग्रवाल ठरली अमेरिकेच्या म्युझिअममध्ये स्थान मिळविणारी पहिली भारतीय महिला पायलट

शाब्बास!! जोया अग्रवाल ठरली अमेरिकेच्या म्युझिअममध्ये स्थान मिळविणारी पहिली भारतीय महिला पायलट

Inspirational Story of Zoya Agarwal: अमेरिकेच्या सेंट फ्रान्सिस्को एव्हिएशन म्युझियममध्ये (SFO Aviation Museum) जागा मिळविणाऱ्या झोया अग्रवाल या पहिल्या भारतीय महिला पायलट  ठरल्या आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची अमेरिकेने घेतलेली ही दखल संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण ठरली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2022 07:07 PM2022-08-20T19:07:54+5:302022-08-20T19:08:58+5:30

Inspirational Story of Zoya Agarwal: अमेरिकेच्या सेंट फ्रान्सिस्को एव्हिएशन म्युझियममध्ये (SFO Aviation Museum) जागा मिळविणाऱ्या झोया अग्रवाल या पहिल्या भारतीय महिला पायलट  ठरल्या आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची अमेरिकेने घेतलेली ही दखल संपूर्ण भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण ठरली आहे.

Zoya Agarwal is the first Indian women pilot who get place in San Francisco Aviation Luis A Turpen Aviation museum  | शाब्बास!! जोया अग्रवाल ठरली अमेरिकेच्या म्युझिअममध्ये स्थान मिळविणारी पहिली भारतीय महिला पायलट

शाब्बास!! जोया अग्रवाल ठरली अमेरिकेच्या म्युझिअममध्ये स्थान मिळविणारी पहिली भारतीय महिला पायलट

Highlightsजोया या पहिल्या महिला भारतीय पायलट आहेत, ज्यांनी उत्तर ध्रुवावरून उड्डाण घेतले होते आणि १६ हजार किलोमीटर एवढे विक्रमी अंतर पार केले.

एअरक्राफ्ट बोईंग ७७७ च्या वरिष्ठ पायलट जोया अग्रवाल (Zoya Agarwal) यांनी त्यांच्या क्षेत्रात आजवर जी काही उत्तूंग कामगिरी केली आहे, त्या कार्याचा सन्मान अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को एव्हिएशन म्युझियमद्वारे (San Francisco Aviation museum) करण्यात आला आहे. या म्युझियममध्ये स्थान मिळविल्यासंदर्भात जोया यांना नुकतेच प्रमाणपत्र सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आले आहे. हा गौरव आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून मी त्या संग्रहालयात स्थान मिळविणारी आपण एकमेकव जिवंत व्यक्ती आहे, हे बघून मला खूपच आश्चर्य वाटले, विमानांशी संबंधित अमेरिकेतील एका प्रतिष्ठित संग्रहालयाचा मी एक हिस्सा झाले आहे, ही गोष्ट खरोखरच आनंदाची आहे, अशी प्रतिक्रिया जोया यांनी एका इंग्रजी वाहिनीशी बोलताना दिली. 

 

जोया या पहिल्या महिला भारतीय पायलट आहेत, ज्यांनी उत्तर ध्रुवावरून उड्डाण घेतले होते आणि १६ हजार किलोमीटर एवढे विक्रमी अंतर पार केले. तसेच २०२१ सालीही त्यांनी एका मोहिमेचे नेतृत्व केले होते. याअंतर्गत त्यांच्या सोबत असणाऱ्या टिममध्ये सगळ्याच महिला पायलट होत्या आणि यादरम्यान त्यांनी अमेरिकेतील सेन फ्रान्सिस्को येथून ते भारतातील बँगलोर हा जगातील सगळ्यात मोठा एअर रुट यशस्वीपणे पार केला होता.

 

त्यांचा हा प्रवासही उत्तर ध्रुवावरूनही झाला होता. त्यांच्या याच कामगिरीचा गौरव अमेरिकेच्या म्युझियमद्वारे करण्यात आला आहे. जोया यांचे हे यशस्वी उड्डाण संपूर्ण जगातील महिलांसाठीच प्रेरणादायी असून महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने ते एक मोठे पाऊल आहे, अशा शब्दांत सेन फ्रान्सिस्को एव्हिएशन म्युझियमद्वारे जोया यांचे कौतूक करण्यात आले.  

 

Web Title: Zoya Agarwal is the first Indian women pilot who get place in San Francisco Aviation Luis A Turpen Aviation museum 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.