Join us  

लग्नासाठी फुटवेअर खरेदी करताय? ५ गोष्टींची घ्या विशेष काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2022 7:41 PM

Footwear Marriage लग्नसोहळ्यात अनेकदा बारीक सारीक अडचणी समोर येतात, त्यामुळे खबरदारी म्हणून या गोष्टींची काळजी घ्या

तुळशी विवाह झाल्यानंतर अनेक जण आपल्या जोडीदारासह लग्नगाठ बांधतात. सध्या लग्नाचा सिझन सुरू आहे. त्याकरिता सर्वत्र, खरेदीची लगबग सुरू आहे. खरेदी करताना कपड्यांइतकीच महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे फुटवेअर. लग्नात पेहराव, दागिने, मेकअप या गोष्टींसोबतच वधूच्या लूकमध्ये चार चांद लावतात ते म्हणजे फुटवेअर. पण लग्नासाठीचे खास फुटवेअर खरेदी करताना काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. लग्नासाठी फुटवेअर खरेदी करत असाल तर या टिप्स जरुर विचारात घ्या.

खरेदीपुर्वी विचार

सगळ्यात पहिल्यांदा आपण लग्नाच्या विधींसाठी खरेदी करत असलेल्या पादत्राणांच्या निवडीबाबत विचार करा. प्रत्येक विधीसाठी कोणत्या पद्धतीचं, कलरचं पादत्राण निवडाल याबाबत शांतपणे विचार करा. पादत्राण कधीही शेवटी खरेदी करा, आपल्या पोशाखाला शोभेल असे खरेदी करा.

लेहंग्याचा रंग विचारात घ्या

लग्नाच्या फुटवेअरमध्ये अनेकदा गोल्डन वर्क असलेल्या फुटवेअरलाच प्राधान्य दिलं जातं. पण शक्यतो असं फुटवेअर निवडा ज्याने तुमचा वेडिंग लूक कंप्लीट होईल आणि ते लेहंग्याला, साडीला मॅचिंग असेल.

कंफर्टही महत्त्वाचे

लग्नात स्टायलिश दिसणं महत्त्वाचं आहेच. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे ते त्या पेहरावात कंफर्टेबल असणं. लग्नाचा पेहराव हेवी वर्क वाला असतो. त्यात ज्वेलरी आणि मेक अपचीही भर असते. अशावेळी फुटवेअर कंफर्टेबल नसेल तर पावलांना अतिशय त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्टाईलसोबत कंफर्टलाही प्राधान्य द्या.

लेहंग्याची उंची जरुर विचारात घ्या

ब्रायडल लेहंगे हे अनेकदा हेवी असतात. अशावेळी लेहंग्याची उंची, वजन या बाबी जरुर विचारात घ्या. फुटवेअरवर फार हेवी वर्क नसेल तर त्यावर हेवी बॉर्डरचा लेहंगा खुलून दिसेल. याउलट फुटवेअर हेवी वर्कवालं असेल तर त्यावर बारीक बॉर्डर असलेला लेहंगा निवडा. लग्नासाठी प्लॅटफॉर्म हिल्स, किटन हिल्स, वेजेस, मोजडी, कोल्हापुरी चप्पल हे फूटवेअर ऑलटाईम फेव्हरेट आहेत.

डबल जोडी खरेदी करा

जर आपण बाजारात लग्नासाठी पादत्राणे खरेदी करणार असाल तर नक्कीच आणखी एक जोडी पादत्राणे खरेदी करा.  कारण कधीकधी पादत्राणांमध्ये गडबड झाल्यास, आपण दुसरे पादत्राणे वापरू शकता आणि तुमचा विशेष दिवस कोणत्याही अडचणींशिवाय आनंदात पार पडेल.

टॅग्स :लग्नफॅशन