Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन तर कमी करायचंय, पण डाएट शक्य नाही? डॉक्टर सांगतात, 'हा' उपाय- वजन उतरेल भराभर

वजन तर कमी करायचंय, पण डाएट शक्य नाही? डॉक्टर सांगतात, 'हा' उपाय- वजन उतरेल भराभर

Fasting Tips For Easy Weight Loss: काही जणांना वजन तर कमी करायचं असतं, पण त्यासाठी तोंडावर ताबा ठेवून डाएटिंग करणं कठीण जातं. त्यांच्यासाठीच हा एक खास उपाय.(12-12 intermittent fasting for fast weight loss)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2025 16:27 IST2025-02-07T12:19:53+5:302025-02-07T16:27:02+5:30

Fasting Tips For Easy Weight Loss: काही जणांना वजन तर कमी करायचं असतं, पण त्यासाठी तोंडावर ताबा ठेवून डाएटिंग करणं कठीण जातं. त्यांच्यासाठीच हा एक खास उपाय.(12-12 intermittent fasting for fast weight loss)

12-12 intermittent fasting for fast weight loss, fasting tips for easy weight loss | वजन तर कमी करायचंय, पण डाएट शक्य नाही? डॉक्टर सांगतात, 'हा' उपाय- वजन उतरेल भराभर

वजन तर कमी करायचंय, पण डाएट शक्य नाही? डॉक्टर सांगतात, 'हा' उपाय- वजन उतरेल भराभर

Highlightsडाएटिंग हा प्रकारच जे पहिल्यांदा करत आहेत त्यांच्यासाठीही हा एक खूप चांगला पर्याय आहे.

वाढतं वजन कमी करण्यासाठी अनेकजण डाएटिंग करतात. सुरुवातीला डायटिंग करण्याचा उत्साह असतो, त्यामुळे मग आपण कितीही तास उपाशी राहू शकतो. पण नंतर जसा जसा हा उत्साह मावळतो तसं तसं पुन्हा खाणं सुरू होतं आणि जेवढं वजन कमी केलं असेल त्याच्या दुप्पट वाढतं. असा अनुभव तुम्हीही घेत असाल. तुम्हालाही वजन कमी करण्यासाठी डाएटिंग करणं कठीण जात असेल तर हा एक सोपा उपाय तुम्ही करून बघा (fasting tips for easy weight loss). त्यामुळे अगदी भराभर वजन कमी होण्यास मदत होईल, असं डॉक्टर सांगतात.(12-12 intermittent fasting for fast weight loss)

 

याविषयीची डॉ. सौरभ सेठी यांनी दिलेली माहिती इकॉनॉमिक टाइम्सने प्रकाशित केली आहे. यामध्ये डॉ. सेठी असं सांगत आहे की ज्या लोकांना फास्टिंग जमत नाही त्यांनी १२- १२ तासांचं इंटरमिंटंट फास्टिंग करावे.

रोज खा सूर्यफुलाच्या १ चमचा बिया, वजन कमी-केस सुंदर-त्वचा चमकेल तेजानं..

फास्टिंग करण्याचा हा एक अतिशय सोपा उपाय असून डाएटिंग हा प्रकारच जे पहिल्यांदा करत आहेत त्यांच्यासाठीही एक खूप चांगला पर्याय आहे. १२- १२ तासांचे इंटरमिटंट फास्टिंग करताना तुम्ही १२ तास व्यवस्थित आहार घ्या आणि त्यानंतरचे १२ तास मात्र पुर्णपणे उपवास करा. उदा. तुम्ही सकाळचे ९ ते रात्रीचे ९ यावेळेत खाऊ शकता. पण त्यानंतर मात्र रात्रीचे ९ ते सकाळचे ९ वाजेपर्यंत तुम्ही काहीही खायचे नाही. तुमच्या साेयीनुसार तुम्ही कोणतीही वेळ ठरवू शकता.

 

उपवासाच्या काळात तुम्ही भरपूर पाणी तर प्याच.. पण त्याचबरोबर ब्लॅक कॉफी, ग्रीन टी, ब्लॅक टी,  लिंबू पाणी, बडीशेपाचा काढा, जिऱ्याचा काढा, तुळशीचा काढा, आल्याचा काढा असे पेयसुद्धा घेऊ शकता.

दिवसभर उभ्याने काम करून पाय गळून जातात- पाठ दुखते? बघा थकवा घालवणारा १ खास उपाय

डॉक्टर सांगतात की १२- १२ तासांचे फास्टिंग करताना तुमच्या आहारात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि फायबर असणं गरजेचं आहे. यामुळे तुम्हाला अधिकाधिक ऊर्जा मिळेल आणि दीर्घकाळ पोट भरल्यासारखं वाटेल. वजन कमी करण्यासाठी एकदा हा उपाय करून बघायला हरकत नाही.

 

Web Title: 12-12 intermittent fasting for fast weight loss, fasting tips for easy weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.