Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट कमीच होत नाही-पूर्ण शरीर बेढब झालं? नियमित २ पदार्थ पाण्यासोबत घ्या, झरझर घटेल चरबी

पोट कमीच होत नाही-पूर्ण शरीर बेढब झालं? नियमित २ पदार्थ पाण्यासोबत घ्या, झरझर घटेल चरबी

2 Ayurvedic Foods For Weight Loss : मध नैसर्गिकरित्या गोड असते याचा वापर तुम्ही साखरेऐवजी करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 03:24 PM2024-09-20T15:24:02+5:302024-09-20T15:28:04+5:30

2 Ayurvedic Foods For Weight Loss : मध नैसर्गिकरित्या गोड असते याचा वापर तुम्ही साखरेऐवजी करू शकता.

2 Ayurvedic Foods For Weight Loss : Ayurvedic Diet For Weight Loss | पोट कमीच होत नाही-पूर्ण शरीर बेढब झालं? नियमित २ पदार्थ पाण्यासोबत घ्या, झरझर घटेल चरबी

पोट कमीच होत नाही-पूर्ण शरीर बेढब झालं? नियमित २ पदार्थ पाण्यासोबत घ्या, झरझर घटेल चरबी

वाढत्या वजनामुळे (Weight Loss)  फक्त शरीराची  सुंदरता कमी होत नाही तर अनेक गंभीर उद्भवू शकतात. डायबिटीस, हार्ट डिसीज फॅटी लिव्हर, गॉल ब्लॅडर, हाय ब्लड प्रेशर, स्लिप एपिनिया, स्ट्रोक, कॅन्सर आणि अस्थमा यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. वाढत्या वजनामुळे मानसिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होतो. ज्यामुळे डिप्रेशन, चिंता यांसारख्या समस्या वाढतात. (2 Ayurvedic Foods For Weight Loss)

अधिकाधिक महिलांच्या मनात हा प्रश्न असतो की वजन कमी करण्यासाठी कोणकोणते उपाय करायला हवेत. जर तुम्ही वजन कमी  करण्यासाठी काही फूड्स शोधत असाल तर ३ आयुर्वेदीक फूड्सचा आहारात समावेश करून तुम्ही शरीर चांगले ठेवू शकता. आयुर्वेदीक डॉक्टर ऐश्वर्या संतोष यांनी इंस्टाग्रामवर काही उपाय शेअर केले आहे.  या पौष्टीक पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही वेट लॉस जर्नी सुरू ठेवू शकता. 

एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार आजकाल अन्हेल्दी खाण्यापिण्याच्या सवयी, बसून काम करणं, व्यायामाची कमतरता यामुळे लोक लठ्ठपणाचे शिकार होत आहेत. लठ्ठपणामुळे आरोग्याच्या इतर समस्या उद्भवू शकतात. यासाठी लठ्ठपणापासून सुटका मिळवण्यासाठी डाएट आणि फिटनेसकडे लक्ष द्यायला हवं. आहारात थोडा बदल करून तुम्ही पोषक तत्वांची कमतरता भरून काढू शकता. 

रोजच्या वापरासाठी सुई-धागा पॅटर्नचे नाजूक कानातले; कमी बजेटमध्ये सोन्याच्या कानातल्यांचे आकर्षक डिजाइन्स

जवसाने वजन करा कमी

जवसात फायबर्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि भूक कंट्रोल होण्यासही मदत होते. यात कमी कॅलरीज असतात ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.  कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते जे आरोग्यासाठी उत्तम ठरते. याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. 

वजन कमी करण्यासाठी जवसाचे सेवन कसे करावे

जवस तुम्ही सूप किंवा सॅलेडमध्ये घालून खाऊ शकता.  भाज्यांमध्ये जवस घालून हेल्दी खिचडी बनवू शकता. जवसाच्या पिठाचे पराठेसुद्धा उत्तम लागतात. जवसाचा भात किंवा पुलाव, डोसा बनवून खाता येईल. जवस तांदळाप्रमाणे शिजवण्याआधी रात्री पाण्यात भिजवून ठेवा नंतर पाणी आणि १ चिमूट मीठासोबत शिजवा नंतर व्यवस्थित गाळून घ्या. 

मधाने वजन कमी होण्यास मदत होते

मध नैसर्गिकरित्या गोड असते याचा वापर तुम्ही साखरेऐवजी करू शकता. यात कमीत कमी कॅलरीज असतात. ज्यामुळे मेटाबॉलिझ्म वाढतो आणि शरीर जास्त कॅलरीज बर्न करते. यामुळे भूक कंट्रोल होते  आणि जास्त खाण्याची इच्छा कमी होते. मधात एंटीऑक्सिडेंट्स असतात जे शरीरारासाठी फायदेशीर ठरतात.

नजर धुसर झाली-इच्छा नसताना चश्मा लावता? तुपात हा पदार्थ मिसळून खा, चश्मा हटेल-दृष्टी तीक्ष्ण

कोमट पाण्यात १ चमचा मध घालून दिवसाची सुरूवात करा. गरम पाण्यासोबत मध घेऊ नका पाणी कोमटच असावं. दह्यात चमचाभर मध मिसळून नाश्त्याला खाऊ शकता. आल्याच्या रसात मध मिसळून सकाळच्यावेळी याचे सेवन करू शकता.

Web Title: 2 Ayurvedic Foods For Weight Loss : Ayurvedic Diet For Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.