Join us  

पोट सुटलं- खाल्लेलंही पचत नाही? रात्री आल्याचा चहा पिऊन पाहा; काही दिवसात पोट सपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2024 2:00 PM

2 Benefits of Drinking Ginger Tea Before Bed : वजन कमी करणं कठीण वाटत असेल तर, रात्री जेवणानंतर एक वेट लॉस ड्रिंक पिऊन पाहा..

योग्य आहार न खाणे, अपुरी झोप, उलट सुलट पदार्थांचे सेवन करणे, यासह इतर काही वाईट गोष्टींमुळे वजन वाढते, शिवाय पोटाचे विकारही वाढतात (Weight loss drink). वजन कमी करण्यासाठी आपण व्यायामासह अनेक गोष्टी करतो. डाएटकडेही बारकाईने लक्ष देतो. पण वजन कमी होईलच असे नाही (Indigestion). वजन कमी आणि पचनासाठी आपण एक बेड टाईम ड्रिंक पिऊन पाहू शकता.

या बेड ड्रिंकमुळे रात्री खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचेल. शिवाय पोटाची चरबी घटवण्यास मदत होईल. पण यामुळे वेट लॉससाठी मदत होईल का? थुलथुलीत पोटाची चरबी घटेल का? शिवाय अपचनाचा त्रास कमी होईल का? बेड टाईम ड्रिंक कशी तयार करायची? याची माहिती पोषणतज्ज्ञ अंकिता अग्निहोत्री यांनी इन्स्टाग्रामच्या एकां पोस्टद्वारे दिली आहे(2 Benefits of Drinking Ginger Tea Before Bed).

बेड टाईम ड्रिंक कशी तयार करायची?

लागणारं साहित्य

आलं

योगाभ्यासाने जगणं बदललं, अस्थमा कमी झाला आणि.. योगशिक्षक रुपाली मोरे सांगतात बदललेल्या जगण्याची गोष्ट..

पाणी

मध

कृती

एका भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात अर्धा चमचा किसलेलं आलं घाला. ५ मिनिटांसाठी उकळवत ठेवा. ५ मिनिटानंतर चहाच्या गाळणीने गाळून ड्रिंक एका ग्लासमध्ये काढून घ्या.

पावसाळ्यात दही खावं? कधी खावं सकाळी की रात्री? सर्दी-खोकला होण्याची भीती वाटते?

हवं असल्यास आपण ड्रिंकमध्ये एक चमचा मध घाला. आपण ही ड्रिंक रात्री जेवणानंतर घेऊ शकता. आठवड्यातून ४ ते ५ वेळा आपण हे ड्रिंक घेऊ शकता. यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचेल. शिवाय वेट लॉससाठीही मदत होईल.

वजन कमी करण्यासाठी आल्याचे फायदे

पोटाचे विकार आणि वजन कमी करण्यासाठी आपण आल्याचा वापर करू शकता. त्यात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्याचे काम करतात. यासह शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. जर आपल्याला व्हायरल इन्फेक्शनपासून सरंक्षण हवं असेल तर, आपण नियमित आल्याचा चहा तयार करून पिऊ शकता.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स