Join us  

पोटावरची चरबी वाढली? कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर करा फक्त २ व्यायाम; काही दिवसांत दिसेल फरक.…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2023 4:27 PM

2 Easy Morning Exercises to loose belly fat : वाढलेले पोट वेळीच कमी व्हावे यासाठी रोज सकाळी फक्त २ व्यायाम करायला हवेत.

आपण जाड होतो म्हणजे आपल्या शरीराच्या ठराविक भागातली चरबी वाढते. कोणाची मांडीवर, कोणाची दंडावर तर कोणाची पोटावरची चरबी वाढते. पोट सुटायला लागलं की ते काही केल्या कमी होत नाही. पोटाचे टायर दिसायला लागतात आणि जास्तच वाढले तर ते चक्क खाली लोंबायला लागते. अशात ना आपल्याला फॅशनेबल कपडे घालता येतात ना छान छान फोटो काढता येतात. मग सतत सगळीकडे पोट लपवण्याची आणि झाकण्याची काळजी घेत राहावी लागते. असे होऊ नये आणि हे वाढलेले पोट वेळीच कमी व्हावे यासाठी रोज सकाळी फक्त २ व्यायाम करायला हवेत. दिवसभर बैठे काम, व्यायामाचा अभाव, खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धती यांकडेही लक्ष द्यायला हवे. आता हे २ व्यायाम प्रकार कोणते आणि ते कसे करायचे याविषयी (2 Easy Morning Exercises to loose belly fat)...

(Image : Google)

१. माऊंटन क्लायंबर 

दोन्ही हाताचे तळवे आणि पायाची बोटे जमिनीवर टेकवून ठेवायची आणि एक पाय पुढे आणायचा, मग काही सेकंदात लगेचच दुसरा पाय पुढे आणायचा आणि आधीचा मागे न्यायचा. आपण ज्याप्रमाणे जॉगिंग करतो त्याचप्रमाणे जमिनीला समांतर राहून जॉगिंग करायचे. स्टॅमिना वाढवण्यासाठी आणि हृदय चांगलं ठेवण्यासाठी हा व्यायाम फायदेशीर ठरतो. यामध्ये पाय वेगाने हलवल्यास हातापासून खांदे, पाठ, कंबर, पोट, पाय अशा सगळ्या अवयवांचा एकावेळी व्यायाम होतो. शरीरावरील अनावश्यक वाढलेली चरबी कमी करण्यासाठी हे आसन फायदेशीर ठरते. हा व्यायाम किमान ५ मिनीटांसाठी करावा. 

२. फ्लटर किक

(Image : Google)

दिसताना सोपा दिसला तरी हा प्रकार करायला काहीसा अवघड असतो. जमिनीवर पाठीवर झोपायचे. दोन्ही हाताच्या मुठी कंबरेखाली ठेवायच्या आणि दोन्ही पाय ३० अंशात वरती घेऊन ते वरखाली करत राहावे. यामुळे पोटाच्या स्नायूंना चांगला ताण येण्यास मदत होते. सकाळच्या वेळात हे व्यायामप्रकार केल्यास शरीरातील अनावश्यक टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत होते. दिवसभरासाठी शरीर रिचार्ज होण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सव्यायाम