Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > रोजच्या जेवणात प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे, तर करा फक्त २ गोष्टी, खाल्लेलं प्रोटीन पचलं तर पाहिजे..

रोजच्या जेवणात प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे, तर करा फक्त २ गोष्टी, खाल्लेलं प्रोटीन पचलं तर पाहिजे..

2 Tips To Increase Protein In Everyday Meal : हाडांच्या बळकटीसाठी, स्नायूंची ताकद वाढण्यासाठी, शरीराची ताकद भरुन येण्यासाठी, प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2022 11:16 AM2022-12-06T11:16:07+5:302022-12-06T13:39:43+5:30

2 Tips To Increase Protein In Everyday Meal : हाडांच्या बळकटीसाठी, स्नायूंची ताकद वाढण्यासाठी, शरीराची ताकद भरुन येण्यासाठी, प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते.

2 Tips To Increase Protein In Everyday Meal : If you want to increase the amount of protein in your daily meals, do just 2 things - experts say... | रोजच्या जेवणात प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे, तर करा फक्त २ गोष्टी, खाल्लेलं प्रोटीन पचलं तर पाहिजे..

रोजच्या जेवणात प्रोटीनचे प्रमाण वाढवायचे, तर करा फक्त २ गोष्टी, खाल्लेलं प्रोटीन पचलं तर पाहिजे..

Highlightsरोजच्या आहारात प्रोटीनचा योग्य पद्धतीने समावेश असावा यासाठी काय करावे याविषयी...आहार चांगला असेल तर आरोग्य दिर्घकाळ चांगले राहण्यास मदत होते

शरीराची योग्य वाढ आणि पोषण व्हावे यासाठी आपल्याला प्रोटीन, जीवनसत्त्वे, खनिजे, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके अशा सगळ्या घटकांची योग्य प्रमाणात आवश्यकता असते. हे सगळे घटक योग्य प्रमाणात मिळाले तरच आपले शरीर सुदृढ राहू शकते. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्ती किंवा व्यायाम करणाऱ्यांनी आहारात नियमितपणे प्रोटीन्स घेणे आवश्यक असते. हाडांच्या बळकटीसाठी, स्नायूंची ताकद वाढण्यासाठी, शरीराची ताकद भरुन येण्यासाठी, प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते. केवळ मांसाहार केला म्हणजेच आपल्याला भरपूर प्रोटीन्स मिळतात असे नाही. तर त्याशिवायही अनेक पदार्थांमधून आपल्या शरीराची प्रोटीनची गरज भागू शकते (2 Tips To Increase Protein In Everyday Meal). 

(Image : Google)
(Image : Google)

मानवी शरीर प्रोटीन साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळे शरीराला वारंवार प्रोटीनचा पुरवठा करण्याची गरज असते.  दूध, अंडी, डाळी यांमध्ये प्रोटीन्स असतात हे आपल्याला माहित असते. पण रोजच्या आहारात प्रोटीनचा योग्य पद्धतीने समावेश असावा यासाठी काय करावे यासाठी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ पूजा भार्गव काही महत्त्वाच्या टिप्स देतात. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून अतिशय सोप्या पद्धतीने आहाराबाबतची अतिशय महत्त्वाची गोष्ट त्या शेअर करतात. या टिप्स लक्षात ठेवून आहार घेतला तर आपले आणि आपल्या कुटुंबाचे पोषण होण्यास निश्चितच मदत होईल. यासाठी त्या काय सांगतात पाहूया...

१. पनीर

आपण साधारणपणे पोळी आणि भात हे मुख्य जेवण घेतो. यातही आपण रोज पोळ्या, फुलके असे काही ना काही करतोच. त्यावेळी पोळीच्या कणकेत पनीर घालून त्याचा पराठा करा, म्हणजे नकळत प्रोटीन तुमच्या शरीरात जाईल. याशिवाय पनीरचा भातही आपण नक्कीच करु शकतो. पनीर हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असल्याने त्याचे आहारातील प्रमाण वाढवायला हवे. 

२. कडधान्य 

कडधान्य हाही प्रोटीनचा एक उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे ब्रेकफास्टला कडधान्याची उसळ, जेवणात सलाडमध्ये कडधान्य यांचा आवर्जून समावेश करायला हवा. याशिवाय कडधान्याचा भातही चांगला होतो. धिरडे, डोसा यांमध्येही आपण कडधान्याचा वापर करुन शकतो. 
 

Web Title: 2 Tips To Increase Protein In Everyday Meal : If you want to increase the amount of protein in your daily meals, do just 2 things - experts say...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.