Join us  

वेटलॉससाठी उपयुक्त २ डिटॉक्स ड्रिंक्स, वजन कमी आणि त्वचाही होईल सुंदर- देखणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2022 8:10 AM

Perfect Detox Drinks For Weight Loss: २ डिटॉक्स ड्रिंक्स जे तुमचं वजन कमी करण्यासाठी तर मदत करतातच पण सोबतच तुमच्या त्वचेवरही (beautiful skin) त्याचा खूप चांगला परिणाम दिसून येतो. 

ठळक मुद्देजर तुम्ही सध्या वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्यासाठी हे डिटॉक्स ड्रिंक्स तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात.

वेटलॉस (weight loss) करायचा तर त्यासाठी व्यायाम तर हवाच, पण त्यासोबतच तुमचा आहार कसा आहे, तुम्ही कोणते पदार्थ किती प्रमाणात खाता यालाही खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळेच तर जेव्हा वेटलॉस करण्यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेता, तेव्हा व्यायाम आणि आहार (exercise and diet) या दोन्हीही गोष्टींबाबत तुम्हाला मार्गदर्शन केले जाते. जर तुम्ही सध्या वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्यासाठी हे डिटॉक्स ड्रिंक्स (detox drinks for weight loss) तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात.

 

डिटॉक्स ड्रिंक्स शरीरातून विषारी पदार्थ (toxins) बाहेर फेकण्यास मदत करतात. तसेच तुमची पचन क्रिया आणि चयापचय क्रिया (digestion and metabolism) सुधारण्यास फायदेशीर ठरतात. या दोन्ही क्रिया व्यवस्थित असतील तर आपोआपच वेटलॉससाठी त्याचा फायदा होतो. शिवाय विषारी पदार्थ शरीराबाहेर टाकले गेल्याने शरीर शुद्ध होऊन त्वचा चमकदार (glowing skin) होण्यास मदत होते. 

 

१. काकडी- लेमन डिटॉक्स ड्रिंकलिंबूपाणी हे वेटलॉससाठीचं उत्तम डिटॉक्स ड्रिंक मानलं जातं. आता या लिंबूपाण्याला एकदा काकडीची जोड देऊन बघा. काकडीचा वापर केल्यामुळे तुमचं शरीर अधिक प्रमाणात हायड्रेटेड राहण्यास मदत होते. मेटाबॉलिझम वाढते. तसेच काकडीमधून भरपूर ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात. त्यामुळे शरीरातून टॉक्झिन्स बाहेर काढायला मदतही होते. म्हणूनच तर काकडी आणि लिंबू यांचं कॉम्बिनेशन वेटलॉससाठी अगदी परफेक्ट मानलं जातं. 

पावसाळ्यात बुटांचा खूपच कुबट, घाण वास येतो? ५ उपाय, बुटांची दुर्गंधी होईल गायब काकडी लेमन डिटॉक्स ड्रिंक करण्यासाठी...- यासाठी तुम्हाला १ टेबलस्पून लिंबाचा रस, काकडीच्या ५ ते ६ चकत्या, ३ कप पाणी हे साहित्य लागणार आहे.- हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये टाकून त्याचा रस करून घ्या.- त्यामध्ये चवीसाठी थोडं काळं मीठ आणि चाट मसाला टाकला तरी चालेल. 

 

२. लिंबू- पुदिना डिटॉक्स ड्रिंकलिंबू आणि पुदिना हे कॉम्बिनेशन एकत्र करून घेतल्याने शरीरातले कॉम्प्लेक्स पदार्थ सिंपल पदार्थांमध्ये रुपांतरीत होण्यास मदत होते. यामुळे जेवणातील अधिकाधिक पोषणमुल्ये रक्तात मिसळण्यास मदत होते. तसेच पुदिन्यामध्ये असणारे मेंथॉल हे कम्पाऊंट पचनक्रिया तसेच मेटाबॉलिझम या दोन्ही क्रियांचा वेग वाढविण्यास मदत करते. कसं करायचं लेमन- पुदिना डिटॉक्स ड्रिंक?- हे ड्रिंक करण्यासाठी १ टेबलस्पून लिंबाचा रस, पुदिन्याची ४ ते ५ पाने, ३ कप पाणी लागणार आहे. - ३ कप पाणी एका भांड्यात टाकून गॅसवर उकळत ठेवा. त्यात ४ ते ५ पुदिन्याची पाने तोडून टाका.- या पाण्याला उकळी आली की ते एका ग्लासमध्ये गाळून घ्या आणि त्यात लिंबाचा रस टाका.- काळे मीठ, चाट मसाला किंवा जिरे पूड टाकून तुम्ही हे ड्रिंक घेऊ शकता.   

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सब्यूटी टिप्सत्वचेची काळजी