Join us  

थुलथुलीत पोट कमी करायचं? रात्री जेवताना चपातीऐवजी खा ‘हे’ ५ पदार्थ; पोट कमी होणारच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2024 6:06 PM

20-Minute Healthy Dinners to Help You Lose Belly Fat : वजन कमी करण्यासाठी डिनरमध्ये कोणते बदल करणे गरजेचं?

आजकालच्या व्यस्त जीवनशैलीत स्वतःला तंदुरुस्त ठेवणं फार अवघड (Health Tips). फिट राहण्यासाठी बरेच ऑप्शन्स आहेत. ज्यामुळे वजन कमी करणं सोपं होतं (Weight loss). जर आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल तर, निरोगी जीवनशैलीला फॉलो करा. फास्ट फूड खाणं टाळा (Fitness). शिवाय हेल्दी पदार्थ नियमित खा.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी बरेच लोक चपाती आणि भात आहारातून वगळतात. काही लोक रात्रीचं डिनरही स्किप करतात. जर आपल्यालाही वेट लॉस करायचं असेल तर, चपाती स्किप करण्याऐवजी काही खास पदार्थांचा आहारात समावेश करा. या हेल्दी पदार्थांमुळे वेट लॉस करणं नक्कीच शक्य होईल. शिवाय शरीराला आवश्यक पौष्टीक घटकही मिळतील(20-Minute Healthy Dinners to Help You Lose Belly Fat).

वेट लॉससाठी चपातीऐवजी काय खावं?

मूग डाळ चिला

वेट लॉससाठी आपण मूग डाळ चिला खाऊ शकता. मुगाच्या डाळीत काॅपर, फोलेट, रायबोफ्लेविन, क, बी 6 जीवनसत्व, फायबर, पोटॅशियम, फाॅस्फरस, मॅग्नेशियम, लोह, नियासिन, थायमिन हे घटक असतात. यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते. शिवाय प्रोटीनही मिळते. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते.

अक्षय कुमार उठल्यानंतर करतो १ 'खास' काम; पन्नाशीतही तंदुरुस्त राहायचं असेल तर..

डाळ - भात

ज्यांना डाळ - भाताशिवाय जमत नाही. त्यांनी डाळ - भात खाताना पोर्शनवर कण्ट्रोल ठेवणं गरजेचं आहे. कारण डाळीमध्ये प्रोटीन आणि तांदुळात कार्बोहायड्रेट्स पुरेशा प्रमाणात असतात. ज्यामुळे शरीराला पोषण मिळते, आणि वजनही वाढत नाही.

सूप आणि उकडलेल्या भाज्या खा

सूप आणि उकडलेल्या भाज्या खाण्याचे अनेक फायदे आहेत. विविध भाज्यातील पौष्टीक घटक शरीराला सूप आणि उकडलेल्या भाज्यातून मिळतील.

लापशी

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी चपातीऐवजी लापशी खा. लापशीमध्ये फायबर आणि कार्बोहायड्रेट असते. ज्यामुळे पचनसंस्था सुधारेल.

वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..

पनीर

पनीर हा प्रोटीनचा उत्तम सोर्स आहे. १०० ग्रॅम पनीरमध्ये १.२ ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात. कमी कार्बोहायड्रेट पदार्थ खाणे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यामुळे पोट देखील दीर्घकाळ भरलेले राहते. रोज पनीर खाल्ल्याने कॅल्शियमचीही कमतरता पूर्ण होते.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सहेल्थ टिप्सअन्न