Join us  

खडीसाखर खाण्याचे जबरदस्त ३ फायदे, तज्ज्ञ सांगतात ॲसिडिटीसह ३ आजारांवर गुणकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2022 5:25 PM

3 Amazing benefits of khadi sakhar: खडीसाखर आपण क्वचितच कधीतरी खातो. पण ती नियमितपणे खाल्ली तर ॲसिडिटीसह आरोग्याच्या इतर काही तक्रारी निश्चितच कमी होऊ शकतात.

ठळक मुद्देखडीसाखर खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतातजेवण झाल्यनंतर खडीसाखरेचा एक खडा आणि थोडीशी बडिशेप तोंडात टाका आणि चावून चावून खा. ताेंडाची दुर्गंधी कमी होईल.

कधी कधी प्रसाद म्हणून खडीसाखर मिळते. तेवढीच काय ती आपण खातो. त्या व्यतिरिक्त नियमितपणे खडीसाखर (rock sugar or khadi sakhar) खाणारे किंवा किराणा दुकानातून दर महिन्याला आवर्जून खडीसाखर आणणारे लोक कमीच असतात. पण खडीसाखर खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक तक्रारी दूर होऊ शकतात, असं डॉ. वरलक्ष्मी यांनी एचटी लाईफस्टाईलशी बोलताना सांगितलं. बाजारात दोन प्रकारच्या खडीसाखर मिळतात. यापैकी एका प्रकारच्या खडीसाखरेचा आकार अगदी प्रमाणशीर आणि एकसारखा असतो. तर दुसऱ्या प्रकारची खडीसाखर जरा ओबडधोबड असते. तिचा आकार निश्चित नसतो. ही दुसऱ्या प्रकारची खडीसाखर आरोग्यासाठी उत्तम आहे, असंही तज्ज्ञ सांगतात.(3 Amazing benefits of khadi sakhar) 

खडीसाखर खाण्याचे ३ फायदे१. तोंडाला दुर्गंधी येत असल्यासमुखदुर्गंधीचा त्रास अनेक जणांना असतो. दररोज २ वेळा स्वच्छ दात घासूनही तोंडाचा वास जात नाही. अशा लोकांना नियमितपणे खडीसाखर खाणे फायद्याचे ठरते. यासाठी जेवण झाल्यनंतर खडीसाखरेचा एक खडा आणि थोडीशी बडिशेप तोंडात टाका आणि चावून चावून खा. ताेंडाची दुर्गंधी कमी होईल.

 

२. खोकल्यावर गुणकारीसतत कोरडा खोकला येण्याचा त्रास होत असेल तर अशावेळीही खडीसाखर चांगली उपयोगी पडते.

ऑफिसला जाण्यासाठी झटपट हेअरस्टाईल करायची? पोनीटेल घालण्याच्या २ खास पद्धती, दिसाल स्टायलिश

ज्या लोकांना खास करून रात्री झोपल्यानंतर खोकल्याची उबळ येते, त्यांनी खोकला सुरू झाल्यावर खडीसाखरेचा एक तुकडा तोंडात ठेवून चघळावा. काही वेळातच खोकला कमी होईल. 

 

३. ॲसिडिटीसाठी उत्तमखडीसाखर ही नॅचरल कुलंट म्हणजेच नैसर्गिक दृष्ट्या एक थंड असणारा पदार्थ म्हणून ओळखली जाते.

बॅग आहे की पेटारा! जबरदस्त ट्रोल होतेय सब्यासाची कलेक्शनची नवी हॅण्डबॅग, ती पाहूनच नेटिझन्स म्हणाले... 

त्यामुळे छातीत जळजळ होणे, ॲसिडिटी असा त्रास ज्यांना होतो, त्यांनी खडीसाखरेचे पाणी प्यावे. ॲसिडिटी लगेचच कमी होईल. हा उपाय केल्यामुळे नॉशिया, मळमळ असा त्रासही कमी होतो.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नहेल्थ टिप्स