Join us  

लग्नसराईत पोटावर अत्याचार झाले? पचनक्रिया चांगली ठेवायची तर खा ३ पदार्थ, आहारतज्ज्ञ सांगतात, फिट राहायचं तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2022 3:55 PM

3 Foods that Keep the Digestion Healthy during Wedding Season : जास्त खाल्ल्याने पोट जड झाल्यासारखे होते तर कधी गॅसेस, अॅसिडीटी यांसारख्या पोटाच्या तक्रारीही सुरू होतात.

ठळक मुद्देलग्नसराईत जास्तीचे जेवण झाल्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता असतेअशावेळी आहारात योग्य त्या पदार्थांचा समावेश केल्यास त्रास होत नाही

लग्नसराई म्हणजे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या भेटीगाठी, नटणे, दंगामस्ती आणि खाणे-पिणे. लग्नसराईत घरात असणारे मुहूर्त, ग्रहमख, हळद, मेहंदी यांसारखे विधी आणि कार्यालयातील संगीत, लग्न, रिसेप्शन यांसारख्या गोष्टी यांमध्ये खाण्यापिण्याची भरपूर चंगळ असते. या काळात तेलकट, गोड, मसालेदार पदार्थ खाल्ले जातात. आपल्या जवळच्या व्यक्ती सोबत असतील तर गप्पांच्या नादात ४ घास जास्तच खाल्ले जातात (3 Foods that Keep the Digestion Healthy during Wedding Season). 

थंडीच्या दिवसांत भूक लागत असल्याने आणि चवीला चांगले लागत असल्याने आहार नेहमीपेक्षा जास्तच घेतला जातो. खाताना कदाचित आपल्या हे लक्षात येत नाही. पण नंतर पोटावर किती ताण आला ते आपल्याला समजते. अनेकदा जास्त खाल्ल्याने पोट जड झाल्यासारखे होते तर कधी गॅसेस, अॅसिडीटी यांसारख्या पोटाच्या तक्रारीही सुरू होतात. अशावेळी आरोग्य चांगले ठेवायचे तर आहारात ३ गोष्टींचा अवश्य समावेश करायला हवा असे प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर सांगतात. हे ३ पदार्थ कोणते आणि त्याचा काय फायदा होतो पाहूयात...

(Image : Google)

१. ताक 

जेवणानंतर हिंग आणि काळं मीठ घातलेले ताक आवर्जून प्यायला हवे. ताक हे प्रोबायोटीक असते तसेच व्हिटॅमिन बी १२ चा उत्तम स्त्रोत असल्याने बद्धकोष्ठता, गॅसेस यांसारखे त्रास कमी होण्यासाठी ताक पिणे अतिशय फायदेशीर ठरते. विशेषत: तुम्ही रात्रीचे फंक्शन अटेंड करत असाल तर पोट फ्लॅट ठेवण्यासाठी ताक आवर्जून प्यायला हवे. 

२. च्यवनप्राश 

लग्नसराईत सारखेच लग्नाचे जेवण होत असेल तर रात्री झोपताना च्यवनप्राश आवर्जून खायला हवे. यामुळे प्रतिकारशक्ती तर चांगली राहतेच पण यामध्ये फ्लेवोनाईडस आणि अँटीऑक्सिंटस असल्याने त्वचा चांगली राहण्यासाठीही याचा अतिशय चांगला उपयोग होतो. 

३. मेथी लाडू

 

गूळ, सुंठ पावडर आणि तूप घालून केलेले मेथीचे लाडू या काळात आवर्जून खायला हवेत. यामुळे पोटदुखी, बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी दूर होण्यास मदत होते. आतड्यांचे कार्य सुरळीत ठेवण्यास याचा फायदा होतो. तसेच केस खूप भुरकट न दिसता सिल्की दिसण्यासाठीही हे लाडू खाणे फायदेशीर ठरते. हे लाडू सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेत किंवा ४ ते ६ मध्ये स्नॅक्सच्या वेळात खाऊ शकता. झोपेच्या वेळा चुकत असतील आणि व्यायामात खंड पडत असेल तर याचा खूप चांगला फायदा होतो. 

 

 

 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजनाआरोग्य