Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पाणी पिताना प्रत्येकवेळी लक्षात ठेवा ३ गोष्टी, छोटीशी चूकही ठरू शकते आराेग्यासाठी घातक

पाणी पिताना प्रत्येकवेळी लक्षात ठेवा ३ गोष्टी, छोटीशी चूकही ठरू शकते आराेग्यासाठी घातक

How To Drink Water Properly: पाणी पिणं हे तर रोजचंच काम... यात पुन्हा नव्याने सांगण्यासारखं काय, असं वाटत असेल तर तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती एकदा वाचा आणि त्यानंतरच कसं पाणी प्यायचं ते ठरवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 02:00 PM2022-08-22T14:00:27+5:302022-08-22T14:01:17+5:30

How To Drink Water Properly: पाणी पिणं हे तर रोजचंच काम... यात पुन्हा नव्याने सांगण्यासारखं काय, असं वाटत असेल तर तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती एकदा वाचा आणि त्यानंतरच कसं पाणी प्यायचं ते ठरवा.

3 Important rules of drinking water.. Avoid these 3 mistakes while drinking water, proper method of drinking water as per Ayurveda  | पाणी पिताना प्रत्येकवेळी लक्षात ठेवा ३ गोष्टी, छोटीशी चूकही ठरू शकते आराेग्यासाठी घातक

पाणी पिताना प्रत्येकवेळी लक्षात ठेवा ३ गोष्टी, छोटीशी चूकही ठरू शकते आराेग्यासाठी घातक

Highlightsपाणी पिणं ही अगदी रोजची गोष्ट. जी आपण दिवसातून कमीतकमी ८ ते १० वेळा तरी करतो. म्हणूनच तर आपल्याकडून त्यात काही चूक होत असेल तर ती एका दिवसांत ८ ते १० वेळा होते.

पाणी कसं प्यावं, किती प्यावं, जेवणानंतर प्यावं की जेवताना प्यावं, फळं खाल्ल्यावर प्यावं की नाही, रात्री झोपताना कमी प्यावं की नेहमीसारखं प्यावं? अशा पाण्याविषयी अनेकांच्या मनात अनेक शंका असतात. पाणी पिणं ही अगदी रोजची गोष्ट. जी आपण दिवसातून कमीतकमी ८ ते १० वेळा तरी करतो. म्हणूनच तर आपल्याकडून त्यात काही चूक होत असेल तर ती एका दिवसांत ८ ते १० वेळा होते. एवढ्या वारंवार चुका (Avoid these 3 mistakes while drinking water) होत गेल्या, तर त्या आरोग्यासाठी निश्चितच घातक ठरू शकतात. म्हणूनच आयुर्वेदतज्ज्ञ डिंपल जांगडा यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून पाणी पिताना कोणते ३ नियम पाळावेत, याविषयीची माहिती शेअर केली आहे. (proper method of drinking water as per Ayurveda)

 

पाणी पिताना लक्षात ठेवा ३ गोष्टी
१. प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी नको (plastic bottles)

नुकत्याच काही अभ्यासांमध्ये मानवी शरीरांत डॉक्टरांना मायक्रोप्लास्टिक सापडले आहे. या प्लास्टिक कणांचा आकार ५ मिलीमीटरपेक्षाही लहान असतो.

हिरव्या रंगाची कॉफी, वेटलॉससाठी अतिशय उपयुक्त, बघा नेमका काय हा प्रकार- कशी करायची हिरवी कॉफी 

प्लास्टिक बाटलीमधील पाण्यावर जेव्हा सुर्यप्रकाश पडतो, तेव्हा त्यापासून मायक्रोप्लास्टिकचे कण तयार होतात आणि ते पाणी पिताना शरीरात जातात. त्याचे शरीरातले प्रमाण वाढत गेल्यास भविष्यात कर्करोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे टाळावे. त्याऐवजी पाणी पिण्यासाठी आणि साठवून ठेवण्यासाठी मातीची किंवा धातूची भांडी वापरावीत.

 

२. गटागट पाणी पिऊ नका
बाहेरून आल्यानंतर गटागटा पाणी पिण्याची सवय अनेकांना असते. विशेषत: लहान मुलांमध्ये तर ही सवय खूप दिसून येते.

पावसाळ्यातल्या संसर्गजन्य आजारांना दूर ठेवणाऱ्या गुणकारी रानभाज्या, यंदा खा-बघा ५ फायदे

मोठी माणसेही गडबडीत अशाच पद्धतीने पाणी पितात. पण यामुळे तुमचे शरीर व्यवस्थित हायड्रेटेड होत नाही. खूप जलद पाणी प्यायल्याने किडनीवर आणि युरिनरी ब्लॅडरवर दाब येतो. त्यामुळे पाणी नेहमी हळूहळू प्या. यामुळे पचनक्रिया आणि मेटाबॉलिझम सुधारण्यासही मदत होईल.

 

३. उभे राहून पाणी पिऊ नका
आयुर्वेदानुसार जर तुम्ही कायम उभे राहून पाणी पित असाल तर पाणी खूप वेगात पोटात जाते. त्यामुळे शरीर पाण्यातून मिळणारे पोषकमुल्ये आणि खनिजे व्यवस्थित शोषून घेऊ शकत नाही. त्यामुळे पाण्यातील घटकांचा शरीराला पुरेपूर लाभ मिळण्यासाठी नेहमी खाली बसून शांतपणे पाणी प्या.  


 

Web Title: 3 Important rules of drinking water.. Avoid these 3 mistakes while drinking water, proper method of drinking water as per Ayurveda 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.