Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > जेवताना हमखास तुम्हीही करता ३ चुका, आहारतज्ज्ञांचा 'हा' सल्ला वाचा-वजन वाढतं कारण..

जेवताना हमखास तुम्हीही करता ३ चुका, आहारतज्ज्ञांचा 'हा' सल्ला वाचा-वजन वाढतं कारण..

3 Mistakes That Causes Indigestion And Weight gain: जेवण करताना बहुसंख्य लोक कोणत्या चुका करतात ज्या अपचनासाठी कारणीभूत ठरतात बघा...(how to do weight loss?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2024 09:05 AM2024-06-13T09:05:33+5:302024-06-13T09:10:01+5:30

3 Mistakes That Causes Indigestion And Weight gain: जेवण करताना बहुसंख्य लोक कोणत्या चुका करतात ज्या अपचनासाठी कारणीभूत ठरतात बघा...(how to do weight loss?)

3 major mistakes that causes indigestion and weight gain, how to do weight loss | जेवताना हमखास तुम्हीही करता ३ चुका, आहारतज्ज्ञांचा 'हा' सल्ला वाचा-वजन वाढतं कारण..

जेवताना हमखास तुम्हीही करता ३ चुका, आहारतज्ज्ञांचा 'हा' सल्ला वाचा-वजन वाढतं कारण..

Highlightsव्यायाम, डाएटिंग करूनही वजन कमी होत नाही. असं का होतं, त्यासाठी कोणत्या गोष्टी जबाबदार आहेत, याविषयी बघा आहारतज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती...

सध्या बहुसंख्य लोक वजन वाढीच्या तक्रारीमुळे हैराण आहेत. बैठ्या कामाचे वाढलेले तास, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे हल्ली वजन वाढल्याची समस्या खूप लाेकांना छळते आहे. वाढतं वजन कमी करण्यासाठी आपण व्यायाम करतोच. पण बऱ्याचदा असं लक्षात येतं की व्यायाम, डाएटिंग करूनही वजन कमी होत नाही. असं का होतं, त्यासाठी कोणत्या गोष्टी जबाबदार आहेत, याविषयी बघा आहारतज्ज्ञांनी दिलेली ही खास माहिती... (3 major mistakes that causes indigestion and weight gain)

अपचन, वजन वाढण्याची ३ मुख्य कारणं

 

आपण जे खातो त्याचं व्यवस्थित पचन का होत नाही, आपलं वजन दिवसेंदिवस वाढतच का जातं, यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरत आहेत, याविषयीचा एक व्हिडिओ आहारतज्ज्ञांनी dt.lavleen या पेजवर शेअर केली आहे. त्या ३ चुका नेमक्या कोणत्या ते पाहा...

 

नर्सरीतून आणलेलं हिरवंगार रोप कुंडीत लावताच सुकतं? बघा कुंडीत रोप लावण्याची योग्य पद्धत

१. गरज नसेल तेव्हा खाणं

बऱ्याचदा येता- जाता काहीतरी तोंडात टाकण्याची आपल्याला सवय असते. दरवेळी आपल्याला भूक लागलेलीच असते असं नाही. पण उगाच दिसलं म्हणून काहीतरी पटकन तोंडात टाकलं असं अनेकांचं होतं.

अस्सल सोन्याचांदीचं जरीकाम असलेल्या साडीत चमकली कंगना रनौत, बघा शपथविधी सोहळ्यातला खास लूक

शिवाय बऱ्याचदा असंही होतं की भूक लागलेली नसते, पण वेळ झाली म्हणून आपण जेवतो. किंवा कधी कधी कमी भूक असते पण तरीही आपला रोजचा जो आहार आहे, तोच आपण जेवण जात नसलं तरी बळेच खातो. असं वारंवार होत असेल तर यामुळे आपलं ओव्हरइटिंग होतं. भूक लागलेलीच नसते, त्यामुळे शरीरात पाचक रस तयार होत नाहीत. त्यामुळे मग खाल्लेल्या जास्तीच्या अन्नाचं व्यवस्थित पचन होत नाही.

 

२. खूप वेगात खाणे

जेव्हा जेवण आपल्या समोर येतं तेव्हा आपण त्यावर लगेच ताव मारतो आणि एकदम वेगात जेवण संपवतो. ही सवय अपचनासाठी कारणीभूत ठरते. तुम्ही ज्या स्पीडमध्ये जेवता त्या स्पीडमध्ये शरीर ते पचवू शकत नाही.

लाल मुंग्यांनी घरात उच्छाद मांडला? किचनमधला 'हा' पदार्थ चिमूटभर वापरा- घरातून मुंग्या गायब

त्यावर प्रक्रिया करू शकत नाही. त्यामुळे अपचनाचा त्रास वाढतो. त्यामुळे जेवण समोर आल्यावर सुरुवातीचे काही सेकंद शांत बसा. स्वत:ला जेवणासाठी तयार करा आणि सावकाश एकेक घास घेत जेवण करा.

 

३. जेवणाला नावे ठेवणे

जेवणात आपल्या आवडीचे पदार्थ दिसले नाहीत तर अनेकांचा जेवणाचा मूड जातो. असं मूड नसताना, जेवणाबाबत तक्रार करत जेवलं तर शरीरात पाचक रस, पचनासाठी उपयुक्त ठरणारे बॅक्टेरिया योग्य प्रमाणात तयार होत नाहीत.

मिळमिळीत जेवणाला एकदम झणझणीत चव आणणारा वऱ्हाडी ठेचा! बघा फक्त ५ मिनिटांची सोपी रेसिपी

त्यामुळे तुम्ही केलेलं जेवण पचत नाही. त्यामुळे पानात जे काही अन्न आहे त्याकडे सकारात्मतेने पाहा आणि त्याचा आनंद घेत जेवा. पचन चांगलं होण्यास नक्कीच मदत होईल. 

 

 

 

Web Title: 3 major mistakes that causes indigestion and weight gain, how to do weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.