हायड्रेटेड आणि ऊर्जावान राहण्यासाठी, दिवसातून ८ - १० ग्लास पाणी प्यावे (Weight Loss Tips). पाणी प्याल्याने शारोराला अनेक फायदे मिळतात. परंतु, पाणी पिण्याशी संबंधित काही नियमांचे पालन करणेही गरजेचं आहे (Fitness). जसे की सकाळी उठल्यानंतर किती पाणी प्यावे आणि रात्री झोपण्यापूर्वी किती पाणी पिणे चांगले? हे माहित असणे गरजेचं आहे.
काही लोक सकाळची सुरुवात कोमट पाण्याने करतात. वेट लॉससाठी काही लोक रिकाम्या पोटी कोमट पाण्यात काही गोष्टी मिसळून पितात. साधारणपणे सकाळी कोमट पाणी आणि दिवसभर लोक साधे पाणी पितात. पण झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिण्याचेही काही फायदे आहेत(3 reasons why drinking a mixture of honey and warm water before bed is good for your health).
झोपण्यापूर्वी कोमट पाणी पिण्याचे फायदे
द हेल्थ साईट. कॉम या वेबसाईटनुसार, 'झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यासाठी एका भांड्यात ग्लासभर पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी गरम झाल्यानंतर एका ग्लासमध्ये काढून घ्या. त्यात चमचाभर मध घालून मिक्स करा.'
अक्षय कुमार उठल्यानंतर करतो १ 'खास' काम; पन्नाशीतही तंदुरुस्त राहायचं असेल तर..
वेट लॉससाठी मदत
कोमट पाण्यात थोडा मध मिसळून प्यायल्याने वजन कमी करण्यात खूप मदत होते. यामुळे चयापचय गतिमान होते आणि वजन वेगाने कमी होते.
पचनशक्ती सुधारते
रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने पचनशक्ती वाढते. यामुळे सकाळी बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. त्याचबरोबर रात्रीच्या वेळीही पोट हलके वाटते. ज्यामुळे झोपेचा त्रास होत नाही.
उत्तम झोप
पावसाळ्यात झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्यायल्याने ताण काहीसा कमी होतो. यामुळे निद्रानाशाची समस्याही कमी होते आणि चांगली झोप लागते.
वजन वाढतं म्हणून चपाती बंद केली? कणकेत घाला ३ गोष्टी; वजन वाढणारच नाही; उलट..
रक्ताभिसरण सुधारते
रक्ताभिसरणाच्या अडथळ्यांमुळे अनेक प्रकारच्या समस्या वाढू शकतात. उदाहरणार्थ, यामुळे हात आणि पाय दुखू शकतात, हृदयावर दबाव वाढू शकतो आणि त्वचेशी संबंधित समस्या देखील वाढू शकतात. पण, गरम पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण वाढते आणि या समस्यांपासून आराम मिळतो.