आरोग्यासाठी फळं अतिशय चांगली असतात. त्यामुळे ती रोज खायलाच पाहिजेत, यात काही वादच नाही. सौंदर्यासाठी आणि अधिककाळ तरुण राहण्यासाठीही फळांमधले ॲण्टीऑक्सिडंट्स अतिशय महत्त्वाची असतात. म्हणूनच हंगामी फळं अधिकाधिक खावीत असं डॉक्टर, आहारतज्ज्ञ यांचं नेहमीच म्हणणं असतं. पण म्हणून इच्छा झाली की लगेच कधीही फळं खाणं चुकीचं आहे (what is the best time of eating fruits?). फळं खाताना काही गोष्टी कायम लक्षात ठेवल्या पाहिजेत (which is the perfect time for eating fruits?). त्या कोणत्या ते आता पाहूया... (3 Simple rules about eating fruits)
फळं खाताना ३ चुका कधीच करू नका
फळं खाताना कोणत्या गोष्टी करू नयेत, याविषयीचा एक व्हिडिओ drdimplejangda या पेजवर शेअर करण्यात आलेला आहे.
केस पातळ आहेत पण हळदीकुंकू, लग्नसमारंभासाठी सुंदर अंबाडा घालायचाय? बघा ६ सुपरट्रेण्डी प्रकार
१. यामध्ये सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे फळं कधीही दूध, दही, योगर्ट या पदार्थांसोबत खाऊ नयेत. काही जण ओट्समध्ये किंवा अन्य कोणती रेसिपी करतानाही त्यात फळं टाकतात. पण अशा पद्धतीने कोणत्याही पदार्थांसोबत फळं खाऊ नये. कारण फळांचे पचन लवकर होते. त्या तुलनेत इतर अन्नपदार्थांचे पचन व्हायला वेळ लागतो. त्यामुळे फळांसोबत खाल्लेल्या इतर अन्नपदार्थांचे पचन होत नाही. आणि त्यामुळे अपचन, ॲसिडिटी असा त्रास होतो.
२. काही जण दुपारी जेवण झाल्यानंतर किंवा सकाळी नाश्ता झाल्यानंतर लगेचच फळं खातात. असं केल्यानेही अन्नाचं पचन व्यवस्थित होत नाही. त्यामुळेही अपचनाचा त्रास वाढू शकतो.
फक्त अर्ध्या तासात करता येतं विकतपेक्षा जास्त सुगंधी, शुद्ध गुलाब पाणी- बघा सोपी पद्धत
३. फळं खाण्याच्या बाबतीतला तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सुर्यास्त झाल्यानंतर फळं खाऊ नयेत. याचं कारण म्हणजे फळांमध्ये असणारे काही एन्झाईम्स ॲक्टीव्ह होतात आणि त्यामुळे मग आपल्या झोपेच्या सायकलवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सायंकाळनंतर फळं खाणं टाळावं. सकाळी किंवा मग दोन जेवणांच्या मधल्या काळात फळं खाणं अधिक उत्तम.