Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सतत काहीतरी खावंसं वाटतं, खा खा वजन वाढवते? फक्त ३ नियम, वजनावर कंट्रोल

सतत काहीतरी खावंसं वाटतं, खा खा वजन वाढवते? फक्त ३ नियम, वजनावर कंट्रोल

Weight loss formula: दिवसभर घरी असलं की सतत काहीतरी खावं वाटतं.. जबरदस्त फुड टेम्पटेशन (food temptation) होतं आणि मग भराभर वजन वाढतं... हे टाळायचं असेल तर हे ३ सोपे नियम पाळा.. (3 rules for weight loss) तोंडावर ताबा आणि वजनावर कंट्रोल !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 07:03 PM2021-12-17T19:03:51+5:302021-12-17T19:05:11+5:30

Weight loss formula: दिवसभर घरी असलं की सतत काहीतरी खावं वाटतं.. जबरदस्त फुड टेम्पटेशन (food temptation) होतं आणि मग भराभर वजन वाढतं... हे टाळायचं असेल तर हे ३ सोपे नियम पाळा.. (3 rules for weight loss) तोंडावर ताबा आणि वजनावर कंट्रोल !!

3 step formula to get out of food cravings... 3 rules to control your weight and food temptation! | सतत काहीतरी खावंसं वाटतं, खा खा वजन वाढवते? फक्त ३ नियम, वजनावर कंट्रोल

सतत काहीतरी खावंसं वाटतं, खा खा वजन वाढवते? फक्त ३ नियम, वजनावर कंट्रोल

Highlightsहे ३ नियम पाळले तर नक्कीच फुड टेम्पटेशन रोखता येईल आणि वजन आटोक्यात आणण्यास मदत होईल. 

घरी असलं की त्रास थोड्या- फार फरकाने सगळ्यांनाच जाणवतो. सतत काहीतरी खाद्यपदार्थ समोर दिसतात किंवा मग घरात असलेल्या एखाद्या पदार्थाची आठवण येते आणि मग प्रचंड खावरी सुटते. कोरोनानंतर तर अजूनही अनेक जणांचं वर्क फ्रॉम होम (work from home) सुरू आहे. त्यामुळे मग काम करताना सतत काही तरी तोंडात टाकायची सवयही (how to stop food cravings) अनेकांना लागली आहे. म्हणून तर जेव्हा पासून वर्क फ्रॉम होम सुरू केलंय, तेव्हापासून वजनाचा काटा सतत पुढे सरकत चालला आहे, असा अनेक जणींचा अनुभव आहे... 

 

थोडं काम झालं की छोटासा ब्रेक घ्यायचा, घरात चक्कर मारायची आणि काही ना काही उचलून तोंडात टाकायचं, असं अनेकींचं रूटीन झालं आहे. ऑफिस असल्यावर खाण्या- पिण्याच्या वेळांवर बंधने आलेली असतात. एकदा लंचब्रेक आणि २- ३ वेळा होणारा चहा- कॉफी ब्रेक सोडला तर अन्य वेळी आपण सतत काहीतरी तोंडात टाकू शकत नाही. त्यामुळे पोटाला जरा आराम मिळतो आणि आपोआपच वजन वाढीवर नियंत्रण येते. मात्र घरी असताना वजनावर आणि सतत होणाऱ्या या खा- खा वर कसा ब्रेक लावायचा हे सांगितलं आहे आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी. त्यांनी याविषयीची एक पोस्ट नुकतीच इन्स्टाग्रामवर (instagram) शेअर केली आहे. जेव्हा काही तरी असंच अबरचबर खाण्याची इच्छा होईल (how to stop food cravings in Marathi) तेव्हा या ३ गोष्टी करा.. 

 

3 rules to stop food craving
१. एक ग्लास पाणी प्या.. (glass of water)

काहीतरी खाण्यासाठी घ्यायला जेव्हा तुम्ही घरात चक्कर माराल, तेव्हा सगळ्यात आधी पाणी जिथे ठेवले असेल तेथे जा. एक ते दिड ग्लास पाणी प्या. यामुळे मग पोटही भरल्यासारखे वाटेल आणि काही खाण्याची इच्छाही होणार नाही. इच्छा झाली तरी कमी खाल्ले जाईल. शिवाय यामुळे होणारा दुसरा फायदा असा की शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळेल आणि डिहायड्रेशन होणार नाही.

 

२. ताजी फळं खा.. (eat fresh fruit)
काहीतरी खावंसं वाटत असताना फळं खाणं हा सगळ्यात चांगला पर्याय. घरात नेहमीच ताजी फळ आणून ठेवत जा. पाणी पिऊनही जर काही खाण्याची इच्छा झाली तर दुसरं- तिसरं काहीही तोंडात न टाकता सरळ एक ताजं फळ उचला आणि ते खा. फळांमध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे असतात. त्यामुळे आरोग्याला तर फायदा होईलच शिवाय त्वचा व केसही चांगले होतील.. 

 

३. १५ मिनिटांनी तुमचा निर्णय लांबवा.. (wait for 15 minutes)
भुक लागलेली नसतानाही उगाच काही तरी खावं असं टेम्प्टेशन होत असेल तर काही तरी तोंडात टाकण्याचा तुमचा निर्णय १५ मिनिटांसाठी का होईना पण लांबवा... इच्छा झाली की लगेच उठू नका. थोडं कंट्रोल कर असं मनालाही समजावून सांगा.. बघा हे ३ नियम पाळले तर नक्कीच फुड टेम्पटेशन रोखता येईल आणि वजन आटोक्यात आणण्यास मदत होईल. 

 

Web Title: 3 step formula to get out of food cravings... 3 rules to control your weight and food temptation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.