Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सुटलेल्या पोटाची चरबी होईल झरझर कमी; फक्त चमचाभर मेथी दाणे 'या' पद्धतीने खा; वजन घटणारच

सुटलेल्या पोटाची चरबी होईल झरझर कमी; फक्त चमचाभर मेथी दाणे 'या' पद्धतीने खा; वजन घटणारच

3 sure shot ways to use Fenugreek seeds for faster weight loss : वजन कमी करण्यासाठी मेथी दाण्यांचा करून पाहा 'असा' सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2024 01:08 PM2024-09-27T13:08:50+5:302024-09-27T13:10:31+5:30

3 sure shot ways to use Fenugreek seeds for faster weight loss : वजन कमी करण्यासाठी मेथी दाण्यांचा करून पाहा 'असा' सोपा उपाय

3 sure shot ways to use Fenugreek seeds for faster weight loss | सुटलेल्या पोटाची चरबी होईल झरझर कमी; फक्त चमचाभर मेथी दाणे 'या' पद्धतीने खा; वजन घटणारच

सुटलेल्या पोटाची चरबी होईल झरझर कमी; फक्त चमचाभर मेथी दाणे 'या' पद्धतीने खा; वजन घटणारच

निरोगी आरोग्य आणि वजन घटवण्यासाठी पौष्टीक पदार्थ खाणं गरजेचं आहे (Weight Loss). सध्या वजन वाढीमुळे अनेक जण त्रस्त आहे. वजन कमी करणे हे जणू टास्क बनलं आहे (Fitness). वजन कमी करण्यासाठी आपण व्यायामासह डाएटकडेही बारकाईने लक्ष देतो (Cooking Oil). पण तरीही हवा तसा फरक दिसून येत नाही. वेट लॉससाठी आपण विविध उपाय करून पाहतो. जर आपल्याला झरझर वजन घटवायचं असेल तर, मेथी दाण्याचा सोपा उपाय करून पाहा.

मेथी दाणे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेला गती देतात. या बिया खाल्ल्याने आपली भूक कमी होऊ शकते. मेथीमध्ये आढळणारे पौष्टीक घटक फक्त वेट लॉससाठी नसून, केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. वेट लॉससाठी आहारात नेमकं मेथी दाण्यांचा वापर कसा करावा? याची माहिती शिखा अग्रवाल यांनी दिली आहे(3 sure shot ways to use Fenugreek seeds for faster weight loss).

मेथी दाणे वजन कसे कमी करतात?

- मेथी दाण्यांमध्ये फायबर, मिनरल्स आणि इतर पोषक घटक आढळतात. वजन कमी करण्यासाठी फायबर खूप महत्वाचे आहे. फायबर आतड्यांचे कार्य वाढवते आणि चयापचय सुधारते. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते. 

करवंटीला चिकटून खोबरं वाया जातं? १ जबरदस्त ट्रिक; मिनिटात करवंटीतून खोबरं निघेल बाहेर

मेटाबॉलिज्म करते बुस्ट

मेथी दाणे मेटाबॉलिज्म बुस्टर करण्यास मदत करते. जे शरीराच्या विश्रांतीच्या वेळेही अधिक कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात. याशिवाय मेथीचे दाणे कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात. यामुळे गोड पदार्थ खाण्याची इच्छा कमी होते. आणि भूकही नियंत्रणात राहते.

फॅट्स स्टोअर होत नाही

मेथी दाण्यांमध्ये फॅट्स स्टोअर करण्यापासून रोखणारे घटक असतात. मेथी दाणे नैसर्गिक लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून देखील कार्य करतात. ज्यामुळे शरीराला अतिरिक्त पाणी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते.

वेट लॉससाठी मेथी दाणे कशापद्धतीने खावे?

तज्ज्ञांच्या मते, १- २ चमचे पाण्यात मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा. नंतर सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाणे चावून खा आणि त्याचे पाणी प्या. असे नियमित केल्याने वेट लॉससाठी मदत होऊ शकते.

'या' प्रकारेही आपण मेथी दाणे खाऊ शकता

- मेथी दाण्यांचा चहा वेट लॉससाठी मदत करते. भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. त्यात मेथी दाणे घालून पाणी उकळवण्यासाठी ठेवा. ५ -१० मिनिटांनंतर मेथी दाण्यांचा पाणी तयार होईल. गाळणीने गाळून चहा प्या.

दूध पिता पिता दगावलं तान्हं बाळ, व्हायरल बातमी : स्तनपान करताना आईने काय काळजी घ्यायला हवी?

- मेथी दाणे कोरडी भाजून त्याची पावडर बनवा. ही पावडर दही, स्मूदीमध्ये घालून खा. यामुळे शरीराला फायबर मिळेल, ज्यामुळे पचनक्रिया सुधारेल आणि वेट लॉससाठी मदत होईल.

- मेथी दाणे आपण भिजत घालू शकता. मोड आलेले मेथी दाणे खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. 

Web Title: 3 sure shot ways to use Fenugreek seeds for faster weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.