Join us  

काबुली चण्याचे ३ चविष्ट पदार्थ, वजन कमी करायचं असेल तर उकडलेलं-बेचव खाणं आधी बंद करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2023 4:14 PM

3 tasty chickpea recipes for weight loss वजन कमी करायचं, प्रोटीन डाएट हवं तरी खा चविष्ट काबुली चणे

वजन कमी करण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो. काही लोकं जिममध्ये घाम गाळतात, तर काही योगभ्यास करतात. तर काही लोकं मन मारून आवडीचे पदार्थ टाळतात. व त्याजागी उकडलेले पदार्थ खातात. वजन कमी करण्यासाठी डाएट चार्टमध्ये फक्त कंटाळवाण्या गोष्टी असतात. चटपटीत, कुरकुरीत, आणि खमंग पदार्थ आपण जेमतेम कमी खातो किंवा टाळतोच. पण आपल्याला माहित आहे का, की कबुली चणे खाल्ल्याने देखील वजन कमी होऊ शकते.

मायहेल्थबडीच्या आहारतज्ज्ञ अंतरा देबनाथ सांगतात, ''चणे खाल्ल्याने शरीरात साठलेली अतिरिक्त चरबी कमी होते. परंतु काबुली चणे कशा पद्धतीने खावे हे माहित असणं गरजेचं आहे.'' वजन कमी करण्यासाठी काबुली चणे कसे फायदेशीर ठरते? आणि आपण याचा आहारात कसा समावेश करू शकता, हे पाहूयात(3 tasty chickpea recipes for weight loss).

वजन कमी करण्यासाठी काबुली चणे कसे फायदेशीर ठरते

आरोग्य तज्ञांच्या मते, काबुली चण्यामध्ये प्रोटीन्स आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जे वजन कमी करण्यास मदत करतात. काबुली चणे खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. ज्यामुळे आपल्याला वारंवार भूक लागत नाही. यासह शरीरातील ब्लड शुगर स्पाइक देखील नियंत्रित राहते.

वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफीमध्ये घाला मध, पाहा कॉफी पिण्याची योग्य वेळ आणि पद्धत

वजन कमी करण्यासाठी काबुली चणा कसा खावा?

सकाळच्या नाश्त्याला आपण सॅलॅड तयार करून खाऊ शकता. यासाठी प्रेशर कुकरमध्ये पाणी - मीठ आणि काबुली चणे घालून शिजवून घ्या. शिजलेले काबुली चणे एका बाऊलमध्ये काढून ठेवा. त्यात चिरलेली काकडी, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि हिरवी कोथिंबीर घाला. नंतर त्यात आवडीचे मसाले आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा. हे सॅलॅड खाल्ल्याने आपल्याला वारंवार भूक लागणार नाही.

कितीही व्यायाम केला-डाएट केले तरी ४ चुकांमुळे वजन कधीच कमी होत नाही, पाहा काय चुकतंय..

काबुली चण्याची भाजी

वजन कमी करण्यासाठी आपण आहारात काबुली चण्याच्या भाजीचा समावेश करू शकता. भाजी करताना कमी तेल अथवा तुपाचा वापर करा. आपण काबुली चण्याची भाजी लंच अथवा डिनरमध्ये खाऊ शकता. काबुली चण्याची भाजी खाल्ल्याने पचनसंस्थाही निरोगी राहते, ज्यामुळे वजन कमी होते.

रोस्टेड काबुली चणे

सायंकाळची छोटी भूक अनेकदा सतावते. अशावेळेस काय खावे हे सुचत नाही. जर आपण वेट लॉस करत आहात तर, सायंकाळच्या स्नॅक्समध्ये जंक फूड ऐवजी उकडलेले चणे किंवा रोस्टेड काबुली चणे खा. रोस्टेड काबुली चणे करण्यासाठी एका बाऊलमध्ये एक कप भिजलेले काबुली चणे घ्या, त्यात तिखट, गरम मसाला, जिरेपूड, चाट मसाला, ऑलिव्ह ऑईल आणि मीठ घालून मिक्स करा. नंतर काबुली चणे एका बेकिंग ट्रेमध्ये काढून ठेवा, आणि मायक्रोवेव्हमध्ये हाय मोडवर 400°F वर 20 ते 30 मिनिटे भाजून घ्या.

टॅग्स :वेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सफिटनेस टिप्सआरोग्य