Join us  

बसून बसून पोटाचा घेर वाढतच चाललाय? जेवणानंतर करा फक्त ३ गोष्टी, पोट राहील फ्लॅट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2022 11:35 AM

3 Things After Having Meal for loosing Belly Fat : पोटाचा आणि कंबरेचा घेर इतका वाढतो की शरीर बेढब दिसायला लागते.

ठळक मुद्देदिवसभराच्या बैठ्या कामाने पोटाच्या बाजुने चरबी वाढत जाते.जेवल्यावर लगेच न बसता काही गोष्टी आवर्जून केल्या तर ही चरबी साठत नाही..

दिवसभर बैठे काम, व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या सवयी यांमुळे लठ्ठपणा आणि इतरही जीवनशैलीविषयक समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. सकाळचा नाष्ता झाला की आपण जे खुर्चीत बसतो ते दुपारी जेवणासाठीच उठतो. ते झाल्यावरही आपण पुन्हा बसतो ते संध्याकाळी काम संपल्यावरच उठतो. मात्र यामुळे खाल्लेले अन्न पचत तर नाहीच पण ते पोट आणि कंबरेच्या भागात साचत जाते. अशाने काही दिवसांनी आपला पोटाचा आणि कंबरेचा घेर इतका वाढतो की शरीर बेढब दिसायला लागते. एकदा हा पोटाचा आणि कंबरेचा भाग वाढला की तो कमी करणे हे अतिशय मोठे आव्हान असते. त्यामुळे हा भाग वाढू न देणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. आता कामाला तर पर्याय नाही, मात्र खाल्ल्यानंतर अशा कोणत्या गोष्टी केल्या तर आपल्या पोटावर चरबी साठणार नाही. पाहूयात त्यासाठी खाल्ल्यानंतर काय करायला हवे (3 Things After Having Meal for loosing Belly Fat). 

१. चालणे 

नाश्ता किंवा जेवण झाल्यावर लगेचच खुर्चीत न बसता किमान १० मिनीटे तरी चालायला हवे. त्यामुळे खाल्लेले अन्न पचण्याची क्रिया सुलभ होण्यास मदत होते. यामुळे चरबी पोटाच्या भागात साचून राहत नाही. त्यामुळे खाल्ल्यावर बसणे टाळायला हवे. 

२. वज्रासनात बसणे 

वज्रासन हे आसन अन्नपचनासाठी अतिशय उपयुक्त आसन आहे. त्यामुळे खाल्ल्यानंतर अवश्य वज्रासनात बसायला हवे. हे आसन आपण जमिनीवर, खुर्चीमध्येही करु शकतो. १० मिनीटे या आसनात बसल्यास खाल्लेले अन्न चांगल्या रितीने पचते आणि पोटावर चरबी साचत नाही.

३. ढेकर देणे 

लहान मुलांना ज्याप्रमाणे आपण जेवण झाल्यावर ढेकर देतो. त्याचप्रमाणे आपल्यालाही जेवणानंतर ढेकर येणे महत्त्वाचे असते. अन्न पचल्याची ती एक उत्तम साईन असते. त्यामुळे खाल्लावर थोडं पाणी प्यायल्यास किंवा चालल्यास आपल्याला ढेकर येतो. ढेकर आला नाही तर पोटात गॅसेस साचून राहतं. त्यामुळे पोट फुगल्यासारखं होतं.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्सलाइफस्टाइल