Join us  

लठ्ठपणा कमी करायचा तर जेवणानंतर अजिबात करु नका ३ चुका; वजन तर कमी होणार नाहीच पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 11:22 AM

3 things you should not do after meal if you want to weight loss : वजन वाढ आटोक्यात आणायची तर जेवणाच्या पद्धतीकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.

लठ्ठपणा ही गेल्या काही वर्षात सर्वच वयोगटात वाढत असलेली एक महत्त्वाची समस्या आहे. लठ्ठपणा हा हळूहळू वाढत जातो आणि त्यामुळे आरोग्याच्या इतर तक्रारीही सुरू होतात. डायबिटीस, बीपी, थायरॉईड किंवा अन्य बऱ्याच समस्या या लठ्ठपणामुळे निर्माण होतात. व्यायामाचा अभाव, वाढते ताणतणाव, बैठी जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या पद्धती यांसारख्या जीवनशैलीविषयक कारणांमुळे ही लठ्ठपणाची समस्या वाढत आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपण जीवनशैलीमध्ये काही आवश्यक बदल केले तरच त्याचा फायदा होतो अन्यथा आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत जाण्याचीच शक्यता जास्त असते. आहार, व्यायाम यांचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर लठ्ठपणाची समस्या आटोक्यात येणे फार अवघड नाही. यासाठी जेवणाच्या बाबतीतही काही गोष्टी आवर्जून पाळायला हव्यात. जेवण झाल्यावर काही गोष्टी आवर्जून पाळल्यास वजनवाढ आटोक्यात येऊ शकते, या गोष्टी कोणत्या ते पाहूया (3 things you should not do after meal if you want to weight loss) ...  

१. जेवणानंतर लगेचच फळं खाणे 

अनेकांना जेवण झाल्यावर फळं खाण्याची सवय असते. असे करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले असते असा त्यांचा समज असतो. पण आरोग्यासाठी हे अजिबात चांगले नसते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे फळांमध्ये असणाऱ्या फ्रूक्टोजमुळे शरीरातील ट्रायग्लिसराईड वाढते. हे ट्रायग्लिसराईड वजन आणि हृदय यांच्यासाठी अजिबात चांगले नसते. 

२. जेवणानंतर बसून राहणे

खाल्ल्यानंतर काही वेळ हालचाल करणे अतिशय महत्त्वाचे असते. किमान काही वेळ शतपावली करणे, थोडी हालचाल होईल अशी कामे करायला हवीत. पण अनेकदा आपण ऑफीसमध्ये काम असल्याने किंवा खाल्ल्यावर आळस येत असल्याने बरेच जण खाल्ल्या खाल्ल्या बसून राहतात. यामुळे खाल्लेले अन्न नीट पचत नाही आणि पचनाशी निगडीत तक्रारी सुरू होतात. इतकेच नाही तर अशाप्रकारे बसून राहील्याने लठ्ठपणाची समस्या वाढते ते वेगळेच. 

(Image : Google )

३. खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे 

अनेकांना जेवताना आणि जेवण झाल्यावर गटागटा पाणी पिण्याची सवय असते. जेवल्यावर लगेचच पाणी प्यायल्याने गॅस्ट्रीक ज्यूस त्यामध्ये मिसळतो आणि पचनक्रिया मंद होते. तसेच यामुळे जठराग्नी थंड होतो आणि खाल्लेले अन्न पचत नाही. हे न पचलेले अन्न आपल्या सिस्टीममध्ये तसेच राहते आणि त्यामुळे अॅसिडीटीसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे लठ्ठपणा वाढू नये असे वाटत असेल तर खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सलाइफस्टाइलआहार योजनाहेल्थ टिप्स