Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन वाढते कारण रात्री जेवणानंतर तुम्ही करता ३ चुका, तब्येतीचे बिघडते तंत्र...

वजन वाढते कारण रात्री जेवणानंतर तुम्ही करता ३ चुका, तब्येतीचे बिघडते तंत्र...

3 Things You Shouldn’t Do After a Dinner : निरोगी राहायचंय ? वजन आटोक्यात ठेवायचं... तर जेवणानंतर या ३ गोष्टी करणे टाळा, नाहीतर....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2023 10:05 PM2023-09-12T22:05:25+5:302023-09-12T22:34:50+5:30

3 Things You Shouldn’t Do After a Dinner : निरोगी राहायचंय ? वजन आटोक्यात ठेवायचं... तर जेवणानंतर या ३ गोष्टी करणे टाळा, नाहीतर....

3 Things You Shouldn't Be Doing After Having Your Dinner For Weight Loss. | वजन वाढते कारण रात्री जेवणानंतर तुम्ही करता ३ चुका, तब्येतीचे बिघडते तंत्र...

वजन वाढते कारण रात्री जेवणानंतर तुम्ही करता ३ चुका, तब्येतीचे बिघडते तंत्र...

वजन वाढणे ही एक सामान्य समस्या आहे. जास्त वजनामुळे अनेक शारीरिक समस्या तर होतातच, पण त्याचबरोबर अनेक गंभीर आणि जीवघेण्या आजारांचा धोकाही वाढतो. वाढतं वजन कमी करायचं किंवा ते आटोक्यात ठेवायचं, हे अनेकांसमोरचं एक मोठं आव्हान झालं आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या वजनामुळे बरेचजण बहुदा चिंतेत असतात. हे वाढत जाणारे वजन कमी करण्यासाठी आपण सगळेच अनेक प्रकारचे उपाय करुन बघतो. या उपायांमध्ये आपण अनेक प्रकारचे डाएट, जिम, योगा, एक्सरसाइज यांसारख्या असंख्य गोष्टी सतत करत असतो. एवढे सगळे उपाय करूनही काहीवेळा आपले वजन कमी होत नाही(3 Things You Shouldn't Be Doing After Having Your Dinner For Weight Loss).

खरंतर बिघडलेल्या जीवनशैलीमुळे वेळेवर सकस व संतुलित आहार घ्यायला अनेकांना शक्य होत नाही. योग्य आहार न घेतल्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. ज्यामुळे अनेक आजारांचा धोका शरीरात वाढतो. उत्तम आहारामध्ये फळे, भाज्या, प्रोटीन्स, कडधान्यांचा समावेश करायला हवा. याचबरोबर, जेवणाची वेळ देखील निश्चित करायला हवी. यासह रात्रीच्या जेवणाआधी, व जेवण केल्यानंतर काय करावं - काय करणे टाळावे (Avoid Doing These Things After Meal) हे देखील माहित असणं गरजेचं आहे. आजकालच्या धावपळीच्या जीवनात छोट्या - छोट्या चुकांमुळे आपलं वजन(3 Things to avoid doing right after dinner) नकळतपणे वाढू शकत. यासाठी रात्रीच्या जेवणानंतर हमखास होणाऱ्या ३ चुका कोणत्या ज्यामुळे आपले वजन वाढू शकते, त्या समजून घेऊयात(3 Things you should NEVER do immediately after the dinner).

जेवल्यानंतर या ३ चुका करु नका.... 

१. जेवल्यानंतर थेट झोपू नये :- दिवसा आणि रात्रीच्या जेवणानंतर तुम्ही नेहमी थोडं चालायला हवं. दुपारचं जेवण करून जर तुम्ही चालत नसाल  आणि कामाला लागत असाल तर फारशी अडचण नाही, पण रात्रीचे जेवण झाल्यावर थोडा वेळ नक्कीच फिरायला हवे. अन्न खाल्ल्यानंतर लगेच फेरफटका मारल्याने तुमच्या शरीरातील रक्तातील साखर नियंत्रणात राहते आणि वजन वाढत नाही. शक्यतो रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करावी. जेवणानंतर किमान १०० पावले चालावी. यामुळे अन्न पचण्यास आणि रक्ताभिसरण सुरळीत राहण्यास मदत होते. 

कॉफी प्या आणि वजन कमी करा ! आहारतज्ज्ञ सांगतात ४ प्रकारची कॉफी प्या, वजनाचा काटा हललाच समजा...

भात खा बिंधास्त पोटभर ! ऋजुता दिवेकर सांगतेय, राइस इज नाइस, भीती विसरा-भात खा कारण...

२. जेवणानंतर चहा - कॉफी घेणे टाळावे :- आपल्यापैकी बऱ्याचजणांना रात्रीच्या जेवणानंतर चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. यासोबतच काही लोकांचा असा समज असतो की, जेवल्यानंतर चहा, कॉफी घेतल्याने आपले जेवण व्यवस्थित पचण्यास मदत होते. परंतु असे नसून जेवणानंतर चहा - कॉफी घेतल्याने त्याचे वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होतात. चहा - कॉफी मधील कॅफीन आपल्या झोपेच्या पद्धतींमध्ये व्यत्यय आणू शकते आणि वजनावर नकारात्मक परिणाम करू शकते. जेव्हा आपण रात्री जेवल्यानंतर उशिरा चहा, कॉफी पिता तेव्हा ते आपल्या झोपेच्या आणि झोपण्याच्या क्षमतेमध्ये व्यत्यय आणू शकते, ज्यामुळे झोप कमी होते. झोपेसंबंधित समस्या असलेल्या व्यक्तींना अनेकदा शर्करायुक्त आणि उच्च-कॅलरीयुक्त पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा होते, जे वजन वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. जेवणानंतर जर आपल्याला चहा - कॉफी पिण्याची सवय असेलच तर कॅफेनविरहित हर्बल टी पिण्याला प्राधान्य द्यावे. 

कोण म्हणतं वजन कमीच होत नाही? ४ साधे-सोपे उपाय-वजन कमी होणारच..

वजन कमी करण्यासाठी सतत गरम पाणी प्यायल्याने वजन खरंच कमी होतं का ? तज्ज्ञ सांगतात...

३. रात्रीच्या जेवणानंतर लगेच पाणी पिणे टाळावे :- पाणी वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावते. यासाठी नियमित पाणी पिऊन स्वत:ला हायड्रेट ठेवणे अतिशय गरजेचे असते. रात्रीच्या जेवणानंतर लगेच पाणी पिणे शक्यतो टाळावे कारण लगेच पाणी प्यायल्याने पचनक्रियेत अडथळा निर्माण होतो. जेवल्यावर लगेच पाणी प्यायल्याने खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. याचबरोबर या अन्नांतील पोषक द्रव्य आपल्या शरीराला योग्य त्या प्रमाणांत मिळत नाही. रात्री जास्त जेवल्यामुळे जसे आपल्याला अस्वस्थत वाटू शकते तसेच पाणी प्यायल्यामुळे देखील आपल्याला बेचैन वाटू शकते. जेवल्यानंतर जास्त पाणी प्यायल्यामुळे पोट फुगण्याची देखील समस्या उद्भवू शकते. पचनक्रियेमध्ये व्यत्यय न आणता योग्य हायड्रेशन राखण्यासाठी, दिवसभरात लहान घोट - घोट   पाणी पिणे आणि जेवणाच्या आधी किंवा नंतर लगेचच मोठ्या प्रमाणावर पाणी पिणे टाळावे.

दिवसभर उपाशी राहून रात्री 'ओव्हरइटिंग' करताय, खूप जास्त खाताय? ६ टिप्स, जीवावर बेतणारी सवय सोडा...

Web Title: 3 Things You Shouldn't Be Doing After Having Your Dinner For Weight Loss.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.