न्यू इयर पार्टीसाठी आता अनेक हॉटेल्स, लॉन्स सजले आहेत. जे अशा ठिकाणी जाऊन सेलिब्रेट करणार नाहीत, त्यांनी आपल्याला मित्रमंडळींसोबत किंवा नातलगांसोबत पार्टी कशी करायची, याचं नियोजन केलं आहे. पार्टीसाठी आता अनेक जण एक्सायटेड असून या एक्साईटमेंटमध्ये जरा जास्तच खाणं- पिणं होतं. आणि त्यानंतर मात्र पुढचे कितीतरी दिवस डाएटिंगचे पार बारा वाजून गेले याचं वाईट वाटत राहतं. तुमचंही असं होऊ नये, म्हणून आधीपासूनच थोडं नियोजन करा (3 Tips to manage your sugar level and diating). जेणेकरून जेवण जास्त होऊन शुगर वाढणार नाही.
पार्टीमध्ये जेवण जास्त होऊ नये म्हणून...
१. पार्टीमधले अनेक पदार्थ आपल्या डाएटनुसार नसतात. त्यामुळे असे पदार्थ कमीतकमी खाणं कधीही योग्य. त्यामुळे जर शक्य असेल तर घरी आपलं साधं पण पौष्टिक जेवण पाेटभर करा आणि त्यानंतर पार्टीमध्ये जा.
त्वचा, आरोग्य आणि केस! राहतील एकदम परफेक्ट, वाचा आहारतज्ज्ञांनी सांगितलेला खास उपाय...
पोट भरलेलं असल्याने अनेकदा काहीच खाण्याची इच्छा होत नाही. किंवा इच्छा झाली तर खूप जात नाही. मग अशावेळी तिथल्या हेल्दी मेन्यूवर अधिक फोकस करता येतं.
२. याविषयी डॉ. अमित गुप्ता यांनी एचटी लाईफस्टाईलशी बोलताना सांगितले की पार्टीमध्ये गेलात तरी तिथे जे पदार्थ लो कॅलरी डाएटमध्ये येणारे असतील, असे पदार्थ तुमच्या ताटात अधिकाधिक घ्या.
सायकलची किंमत ऐकूनच गडबडले नेटिझन्स, म्हणाले एवढ्या पैशात तर आम्ही अख्खं...
जास्तीतजास्त भर सूप पिण्यावर किंवा ज्यूस पिण्यावर द्या. त्याचप्रमाणे तळलेले, मैद्याचे पदार्थ कमीतकमी खा किंवा शक्यतो टाळा.
३. आग्रहाला बळी पडल्याने आपण अनेक पदार्थ गरज नसताना पोटात ढकलतो. त्यामुळे कुणाच्याही आग्रहाला फार गांभिर्याने घेऊ नका. पाेट आणि आपलं डाएट पाहूनच काय खायचं- काय नाही ते ठरवा.