Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > Garlic For Weight Loss: वजन कमी करताय लसूण खा, 3 पद्धतीने लसूण खाल्ल्यास लवकर होतो फॅट लॉस

Garlic For Weight Loss: वजन कमी करताय लसूण खा, 3 पद्धतीने लसूण खाल्ल्यास लवकर होतो फॅट लॉस

Weight Loss Tips: वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काय करावं, याचा विचार करत असाल तर हा एक घरगुती उपाय करून बघा (home remedies for weight loss).. वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2022 01:02 PM2022-06-10T13:02:39+5:302022-06-10T13:03:33+5:30

Weight Loss Tips: वाढलेलं वजन कमी करण्यासाठी काय करावं, याचा विचार करत असाल तर हा एक घरगुती उपाय करून बघा (home remedies for weight loss).. वजन कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

3 ways of eating garlic or lahsun for weight loss, Use of garlic for weight loss | Garlic For Weight Loss: वजन कमी करताय लसूण खा, 3 पद्धतीने लसूण खाल्ल्यास लवकर होतो फॅट लॉस

Garlic For Weight Loss: वजन कमी करताय लसूण खा, 3 पद्धतीने लसूण खाल्ल्यास लवकर होतो फॅट लॉस

Highlightsकोणताही एक उपाय नियमित करा. या उपायांमुळे वजन कमी होण्यास तर मदत होईलच पण आरोग्याला अनेक फायदेही होतील.

वजन वाढताना भराभर वाढतं.. पण कमी करताना मात्र अक्षरश: नाकी नऊ येतात. एकदा का वजनाचा काटा एक विशिष्ट टप्पा ओलांडून पुढे गेला की त्यानंतर मात्र वजन कंट्रोल (garlic for weight loss) करणं खरोखरंच अवघड होऊन जातं. म्हणूनच तर अनेक तज्ज्ञ सांगतात की मुळात वजन खूप वाढू देऊच नका. आपलं वजन वाढायला सुरुवात झाली आहे, हे लक्षात येताच लगेचच ते कंट्रोल कसं करता येईल आणि आहे तेवढंच कसं ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करायला हवेत. (how to control weight)

 

म्हणूनच वजन वाढू नये, ते आधीपासूनच कंट्रोलमध्ये रहावं यासाठी आणि तसंच वाढलेलं वजन कमी करण्यासाठी हा घरगुती उपाय नक्कीच उपयोगी ठरेल. तसंही एरवी नेहमीच्या स्वयंपाकात आपण लसूण खातोच. कधी तो फोडणीत टाकला जातो तर कधी वेगवेगळ्या चटण्यांमध्ये वापरला जाताे. लसूण खाण्याची ही पद्धत जेवण अधिक चवदार बनविण्यासाठी उपयुक्त ठरते. पण आता जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी लसूण खाणार असाल, तर तो खाण्याची पद्धत बदलायला हवी. त्यासाठीच या काही खास टिप्स. 

 

लसूण खाण्याचे फायदे (benefits of garlic)
- लसूणमध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे चयापचय क्रिया व पचनक्रिया सुधारण्यासाठी लसूण फायदेशीर ठरतो. या दोन्ही क्रिया जेव्हा उत्तम असतात, तेव्हा शरीरावर अतिरिक्त चरबीचे साचणे आपोआपच कमी होते. 
- लसूणमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन बी ६, व्हिटॅमिन सी आणि मँगनीज हे घटक भरपूर प्रमाणात असतात.
- हाडांच्या बळकटीसाठी लसूणमधील काही घटक फायदेशीर ठरतात. 
- तसेच लसूणामधील काही घटक शरीरातील विषारी द्रव्ये शरीराबाहेर फेकण्यासाठी मदत करतात. त्यामुळे शरीर आतून स्वच्छ होण्यास मदत होते. त्यामुळेच लसूणाला डिटॉक्स एजंट म्हणूनही ओळखलं जातं. 
- हृदयाच्या आरोग्यासाठीही लसूण खाणे चांगले असते. कारण यामुळे शरीरातील वाईट कोलेस्टरॉलची पातळी कमी होते तर चांगल्या कोलेस्टराॅलची पातळी वाढते.
- रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठीही लसूण उपयुक्त आहे.

 

वजन कमी करण्यासाठी कसा खायचा लसूण (garlic for weight loss)
वजन कमी करण्यासाठी लसूण खायचा असेल तर तो कच्चा खाणे आवश्यक आहे.. त्यासाठी पुढील ३ उपाय दिले आहेत. यापैकी कोणताही एक उपाय नियमित करावा. या उपायांमुळे वजन कमी होण्यास तर मदत होईलच पण आरोग्याला अनेक फायदेही होतील.
१. सकाळी रिकाम्या पोटी लसूण पाकळी हलकीशी चावून खा आणि त्यावर लगेचच ग्लासभर कोमट पाणी प्या. 
२. वरील पद्धतीने लसूण चावून खाणं आवडत नसेल तर रात्री झोपताना ग्लासभर पाण्यात लसूण पाकळी भिजत घाला. सकाळी उठल्यानंतर लसूण मऊ पडला असेल. तो बोटानेच दाबून बारीक करा आणि पाण्यासोबत पिऊन टाका. 
३. लसूण पाकळी ठेचून घ्या. त्यात थोडा मध टाकून एकत्र करा. एक तासानंतर हे चाटण खाऊन घ्या.

 

Web Title: 3 ways of eating garlic or lahsun for weight loss, Use of garlic for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.