आता हळूहळू कपाटात दडून ठेवलेले थंडीचे कपडे बाहेर यायला सुरुवात झाली आहे. सकाळी आणि रात्री वातावरणात चांगलाच गारठा जाणवू लागला आहे. त्वचाही कोरडी पडू लागली आहे. लवकरच थंडीचा कडाका वाढणार. त्याआधी तब्येतीची काळजी घ्यायला सुरुवात करायलाच हवी. म्हणूनच तर हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती (Immunity booster food for winter) उत्तम असावी आणि थंडीचा त्रास होऊ नये, यासाठी सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी हिवाळ्यात आवर्जून खायलाच पाहिजेत असे ३ अन्नपदार्थ (3 Winter super food) सांगितले आहेत. हे पदार्थ आपल्या रोजच्या आहारात कशा पद्धतीने घ्यावेत (Food items we must eat in winter), याविषयीही त्यांनी सविस्तर माहिती दिली आहे.
थंडीच्या दिवसांत खायलाच पहिजेत असे ३ पदार्थ
१. डिंक
थंडी सुरू झाली की डिंकाचे लाडू तयार करून ठेवायचे, ही प्रथा आपल्याकडे फार पुर्वीपासून चालत आली आहे. यादिवसांत डिंक खाणे अतिशय फायदेशीर मानले गेले आहे. थंडीच्या दिवसांत अनेकांना पोट साफ न होण्याचा,
सोहा अली खानचं जबरदस्त वर्कआऊट, फिटनेस टिकविण्यासाठी पहा करते किती अवघड व्यायाम
सांधेदुखीचा त्रास होतो. हे दोन्ही त्रास कमी करण्यासाठी डिंक उपयुक्त ठरतो. बोन डेन्सिटी वाढविण्यासाठी डिंकाची मदत होते. त्यामुळे लाडू किंवा हलवा या माध्यमातून नियमितपणे डिंक खावा.
२. हिरवा लसूण
यालाच आपण लसूणाची पात असंही म्हणतो. ही पात याच दिवसांत मिळते. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडण्याचा त्रास होतो. हा त्रास होऊ नये म्हणून लसूणाची पात अतिशय उपयुक्त ठरते.
केस गळाल्याने हेअर लाईन मागे जाऊन कपाळ मोठं दिसतं? केस पुन्हा वाढविणारा खास उपाय
यामध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे चटणी किंवा भाजीच्या माध्यमातून या दिवसांत लसूणाची पात अवश्य खावी.
३. शलगम किंवा सलगम
या भाजीचे लोणचे केले जाते. शलगममध्ये फायबर, मायक्रो न्युट्रियंट्स मोठ्या प्रमाणावर असतात. तसेच डोळ्यांचे
करिश्मा कपूरला आवडली मोतिया रंगाची थ्रेडवर्क साडी, साडीवरची नाजूक नक्षी अशी की..
आरोग्य जपण्यासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन्स आणि इतर पौष्टिक घटकही या भाजीतून भरपूर प्रमाणात मिळतात.