Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पावसाळ्यात बाहेर चालायला जाणं शक्यच नाही? घरीच करा सोप्या ४ गोष्टी-जिम-खर्च आणि कंटाळा विसराल

पावसाळ्यात बाहेर चालायला जाणं शक्यच नाही? घरीच करा सोप्या ४ गोष्टी-जिम-खर्च आणि कंटाळा विसराल

4 Best Exercises to Lose Weight at Home : मान्सूनमध्ये रनिंग, जॉगिंग - वॉकिंग करायला जमत नसेल तर; घरातच व्यायाम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2024 09:45 PM2024-08-02T21:45:24+5:302024-08-02T21:45:24+5:30

4 Best Exercises to Lose Weight at Home : मान्सूनमध्ये रनिंग, जॉगिंग - वॉकिंग करायला जमत नसेल तर; घरातच व्यायाम करा

4 Best Exercises to Lose Weight at Home | पावसाळ्यात बाहेर चालायला जाणं शक्यच नाही? घरीच करा सोप्या ४ गोष्टी-जिम-खर्च आणि कंटाळा विसराल

पावसाळ्यात बाहेर चालायला जाणं शक्यच नाही? घरीच करा सोप्या ४ गोष्टी-जिम-खर्च आणि कंटाळा विसराल

व्यायामाच्या प्रकारामध्ये धावणे हा एक उत्तम व्यायाम आहे (Weight Loss). जॉगिंग वजन कमी करण्यासोबतच हृदयालाही निरोगी बनवते (Fitness). मात्र, पावसाळ्यात आऊटडोअर अॅक्टिव्हिटी करणं कठीण होऊन जातं. धावणं, जॉगिंग, किंवा इतर व्यायामाचे प्रकार करणं अशक्य होतं.

पावसाळ्यात रस्त्यावर शेवाळं तयार होतात. ज्यामुळे पाय घसरू शकतो, आणि दुखापत होण्याची शक्यता जास्त असते. जर आपण पावसामुळे बाहेर जाऊन वर्कआउट करणं टाळत असाल तर, घरातच ४ कार्डिओ व्यायाम करा. यामुळे वेट लॉस होईल, यासह हृदयाचे आरोग्यही सुधारेल(4 Best Exercises to Lose Weight at Home).

इनडोअर सायकलिंग

जर आपल्याला घराबाहेर जाऊन सायकलिंग करता येत नसेल तर, घरातच राहून इनडोअर सायकलिंग करा. यामुळे गुडघ्यांवर कमी दबाव येतो आणि स्नायू मजबूत होतात. आपण दररोज ३० ते ४५ मिनिटे सायकल चालवू शकता. यामुळे जास्त प्रमाणात कॅलरीज बर्न होतील.

मधुमेह होऊ नये म्हणून काय करावं? ३ गंभीर चुका वेळीच टाळा; अन्यथा वजन वाढेल आणि..

स्विमिंग

स्विमिंग हा एक संपूर्ण शारीरिक व्यायाम आहे. जे जलदरित्या कॅलरीज बर्न करण्यास मदत करतात. ज्यामुळे शरीर टोन होते. यामुळे सांध्यांवर दबाव पडत नाही आणि शरीराला थंडावा मिळतो. आठवड्यातून ३ ते ४ वेळा ३० ते ६० मिनिटे इनडोअर स्विमिंग करा.

नृत्य

डान्सिंग देखील हा एक व्यायाम आहे. नृत्य केल्याने आपल्या शरीराची जास्त प्रमणात हालचाल होते. ज्यामुळे शरीर लवचिक आणि कॅलरी बर्न करण्यास मदत होते. हे मन आणि शरीर दोन्हींसाठी चांगले आहे आणि मूडही सुधारते. आपण आपल्याला आवडत्या गाण्यांवर दररोज ३० ते ४५ मिनिटे नृत्य करू शकता. झुंबा, साल्सा किंवा कोणत्याही प्रकारचा डान्स करू शकता.

मासिक पाळीत पोट दुखते-पायात गोळे येतात? ३ गोष्टी टाळा, क्रॅम्प होतील चटकन कमी

हाय इन्टेन्सिटी वर्कआऊट

हाय इन्टेन्सिटी वर्कआऊट आपल्याला वेट लॉससाठी मदत करते. यामुळे कमी वेळात जास्त प्रमाणात कॅलरीज बर्न होतात. शिवाय मेटाबॉलिझ्म बुस्ट होते. २० ते ३० मिनिटे नॉन स्टॉप वर्कआऊट करू शकता. बर्पी, स्क्वॅट्स, जंपिंग जॅक आणि माउंटन क्लाइम्बर्स यांसारखे विविध प्रकारचे व्यायाम केल्याने बॉडी सुडौल दिसते.

Web Title: 4 Best Exercises to Lose Weight at Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.