हल्ली वजनवाढीची समस्या अनेकांना छळते आहे. काही लोकांची अंगकाठीच तशी असते, तर काही लोकांचं त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे, चुकीच्या आहारामुळे वजन वाढत जातं. वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मग आपण व्यायाम करतो, जमेल तसं डाएटिंगही करतो. पण तरीही वजनावर म्हणावा तसा परिणाम दिसून येत नाही. वजन काही कमी होत नाही. यासाठी नेमक्या कोणत्या गोष्टी जबाबदार ठरतात ते पाहा आणि त्या करणं टाळा. म्हणजे मग डाएटिंगचा आणि व्यायामाचा योग्य परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येईल आणि वजन कमी होईल...(why no weight loss insted of doing exercise and dieting regularly?)
व्यायाम आणि डाएटिंग करूनही वजन कमी का होत नाही?
१. खूप ताण घेण्याची सवय
काही लोकांना लहानसहान गोष्टींचाही खूप ताण घेण्याची सवय असते. सतत ताण घेतला तर त्यामुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो. यामुळे मग इन्सुलिन निर्मितीवर परिणाम होतो. इन्सुलिन कमी प्रमाणात मिळाले तर शरीरातली साखर वाढत जाते. त्याचा परिणाम शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होण्यावर होतो.
मासिक पाळीत पोट खूप दुखतं? ६ योगासनं करा, काही मिनिटांतच आराम मिळेल- कंबरदुखीही थांबेल
२. कमी झोप
दररोज ८ तासांची झोप घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही सतत त्यापेक्षा कमी झोपत असाल तर त्यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडत जाते. त्याचा परिणामही वजन वाढीवर होतो.
३. प्रोटीन्स कमी प्रमाणात घेणे
काही अभ्यासांवरून हे सिद्ध झालं आहे की जे लोक योग्य प्रमाणात प्रोटीन्स घेतात, त्यांचे इतर व्यक्तींच्या तुलनेत लवकर वजन कमी होते. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जर तुमच्या आहारात योग्य प्रमाणात प्रोटीन्स असतील तर तुमचं पोट अधिक काळ भरल्यासारखं वाटतं. वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे आपोआपच कमी खाल्लं जातं.
मनी प्लांटला द्या ३ प्रकारचं पाणी! छोट्याशा कुंडीतही भरपूर वाढेल, हिरवागार- भरगच्च दिसेल...
४. खूप पटापट खाणे
काही लोकांना खूप पटापट खाण्याची सवय असते. ही सवय वजनवाढीसाठी कारणीभूत ठरू शकते.
मुलांना 'या' २ वेळांना अजिबात रागावू नका, तज्ज्ञ सांगतात मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर होतो वाईट परिणाम
कारण असे लोक व्यवस्थित अन्न चावत नाहीत. त्यामुळे त्याचं पचन व्यवस्थित होत नाही. यामुळे चयापचय क्रिया, पचनक्रिया व्यवस्थित न झाल्याने शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होत जाते.