Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > जेवताना केलेल्या या ४ चुका वाढवतात आजारपण.. फिट राहण्यासाठी आयुर्वेद एक्सपर्टचा खास सल्ला 

जेवताना केलेल्या या ४ चुका वाढवतात आजारपण.. फिट राहण्यासाठी आयुर्वेद एक्सपर्टचा खास सल्ला 

How and When To Eat: आपण काय जेवतो, कसं आणि केव्हा जेवतो, या सगळ्या गोष्टी आपल्या तब्येतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच तब्येत सांभाळायची असेल तर आयुर्वेदाचे हे 4 नियम पाळाच..(4  rules of ayurveda)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2022 08:00 AM2022-08-13T08:00:20+5:302022-08-13T08:05:01+5:30

How and When To Eat: आपण काय जेवतो, कसं आणि केव्हा जेवतो, या सगळ्या गोष्टी आपल्या तब्येतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळेच तब्येत सांभाळायची असेल तर आयुर्वेदाचे हे 4 नियम पाळाच..(4  rules of ayurveda)

4 diet mistakes that causes various diseases, 4 Rules for diet as per Ayurveda  | जेवताना केलेल्या या ४ चुका वाढवतात आजारपण.. फिट राहण्यासाठी आयुर्वेद एक्सपर्टचा खास सल्ला 

जेवताना केलेल्या या ४ चुका वाढवतात आजारपण.. फिट राहण्यासाठी आयुर्वेद एक्सपर्टचा खास सल्ला 

Highlights जेवण कसं असावं आणि कसं करावं, याविषयी आयुर्वेदामध्ये काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत.

आजकाल कामाच्या किंवा इतर गोष्टींच्या मागे धावताना अनेक जण स्वत:च्या तब्येतीकडे मात्र हमखास दुर्लक्ष करतात. इतर सगळ्या कामांसाठी वेळ काढतात, पण जेवण मात्र अतिशय घाईघाईने उरकतात. कारण वेळच नाही, असं त्याचं म्हणणं असतं. पण रोजचा आहार (How to take proper diet?) ही आपल्या सगळ्यांसाठीच एक अतिशय गरजेची गोष्ट असून ती जर व्यवस्थित ठेवली, तर इतर गोष्टी सुरळीत सुरू राहतील. म्हणूनच जेवण कसं असावं आणि कसं करावं, (4 diet mistakes that causes various diseases) याविषयी आयुर्वेदामध्ये काही अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. याच गोष्टी आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. वैशाली यांनी एचटी लाईफस्टाईलशी बोलताना शेअर केल्या. या गोष्टी जर पाळल्या तर नक्कीच अनेक आजार आपोआप नियंत्रणात राहू शकतात, असं त्याचं म्हणणं आहे. (4 Rules for diet as per Ayurveda)

 

तब्येत सांभाळायची तर या गोष्टी करू नका
१. खाण्याचे चुकीचे प्रमाण

दिवसाच्या कोणत्या वेळी किती प्रमाणात आहार घ्यावा, याचे काही नियम आयुर्वेदात दिले आहेत. त्यानुसार दुपारचं जेवण हे पोटभर करा. कारण दिवसाच्या सुरुवातीला आपल्या शरीराची हालचाल उत्तम असते. त्यामुळे पचनक्रियाही व्यवस्थित राहते. दिवस मावळताना पचन क्रिया मंदावत जाते. त्यामुळे दुपारचं जेवण पोटभर तर रात्रीचं जेवण अगदी हलकं- फुलकं असावं. 

 

२. रात्री उशिरा जेवणे
रात्री उशिरा जेवण करायचं आणि जेवण केल्यानंतर लगेचच झोपायची, अशी सवय असेल तर ती लगेच सोडा. कारण आपण झोपतो तेव्हा पचनक्रिया अगदीच मंदावलेली असते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. आणि मग आपण जे काही अन्न खातो, त्यातल्या कॅलरी फॅट स्वरुपात शरीरात साचत राहतात. फॅट्स वाढले की आपोआपच आजारपण वाढतात. त्यामुळे झोपण्याच्या २ ते ३ तास आधी रात्रीचं जेवण झालेलं असावं.

 

३. अन्न वारंवार गरम करणे
अनेक घरात स्वयंपाक लवकर होतो. त्यानंतर मग आपापल्या साेयीने प्रत्येक जण जेवायला बसतो. मग प्रत्येकाच्या जेवणाच्या वेळी अन्न पुन्हा पुन्हा गरम केलं जातं. असं वारंवार अन्न गरम करणं टाळा. दुसरं म्हणजे उरलेलं अन्न फ्रिजमध्ये ठेवणं, भूक लागल्यावर ते फ्रिजमधून काढून थेट गॅसवर ठेवून गरम करणं आणि खाणं हे देखील कटाक्षाने टाळलं पाहिजे. 

 

४. पोटाला आराम न देणे
अनेक लोक पोटात भूक नसतानाही केवळ आवड किंवा इच्छा म्हणून खातात. असं करणं थांबवा. आठवड्यातून एकदा उपवास करा. उपवास करणं म्हणजे एकादशी आणि दुप्पट खाशी या पद्धतीचा उपवास नव्हे. या दिवशी कमी खा. फळं आणि सलाड खाण्यावर अधिक भर द्या. शिवाय ज्या दिवशी दुपारचे जेवण खूप जास्त झाले, असे वाटते, त्या दिवशी रात्रीचे जेवण टाळा. आणि अतिजेवणाचा त्रास होत असल्यास गरम पाण्यात सुंठ टाकून प्या. 

 

Web Title: 4 diet mistakes that causes various diseases, 4 Rules for diet as per Ayurveda 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.