Join us  

कॉफी प्या आणि वजन कमी करा ! आहारतज्ज्ञ सांगतात ४ प्रकारची कॉफी प्या, वजनाचा काटा हललाच समजा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2023 9:30 AM

Weight loss: 4 amazing ways coffee speeds up weight loss, according to science : वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय केले जातात, पण कॉफी पिऊन पाहिली आहे का ?

आजकाल प्रत्येकालाच स्लिम, ट्रिम आणि फिट दिसायचे आहे. आपण चारचौघात उठून दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण जिम, डाएट, एक्सरसाइज यांसारख्या अनेक गोष्टीं फॉलो करायला सुरुवात करतो. इतकेच नव्हे तर, आहारात कोणत्या गोष्टी कमी कराव्यात, कोणत्या गोष्टी वाढवाव्यात इथपासून ते कोणता व्यायाम, योगा करावा इथपर्यंत सगळे पर्याय आपण  करतो. ब्लॅक कॉफी रोज प्यायल्याने आपले वाढलेले वजन कमी करण्यासाठी याची फार मदत होते, हे आपण आतापर्यंत ऐकलेच असेल. यासाठी आपण वेटलॉस (The Best Black Coffee Recipe For Weight Loss) करताना साखरयुक्त चहा - कॉफी पिणे सोडून ब्लॅक कॉफी (Black Coffee) प्यायला सुरुवात करतो.

ब्लॅक कॉफी शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी मदत करते. यामुळे मेटाबॉलिझमही सुधारते आणि पचनक्रियाही चांगली होते. परंतु, ब्लॅक कॉफी (4 Best Coffee Types for Diet) पिण्याची योग्य पद्धत माहित असणं गरजेचं आहे. योग्य आहार आणि व्यायाम केल्याशिवाय ही पद्धत फायदेशीर ठरणार नाही. ब्लॅक कॉफी पिण्याची योग्य पद्धत नेमकी कोणती, तसेच कोणत्या पद्धतीने कॉफी बनवली तर आपले वजन झपाट्याने(4 Coffee recipes that help in losing weight faster) कमी होईल याबद्दल फिट क्लिनिकच्या आहारतज्ज्ञ सुमन यांनी अधिक माहिती दिली आहे, ते पाहूयात(4 Easy Coffee Recipes For Weight Loss).

वजन कमी करण्यासाठी नेमकी कोणत्या पद्धतीने कॉफी प्यावी ?

१. दालचिनी कॉफी :- वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफीमध्ये दालचिनीची पूड घालून देखील आपण ती पिऊ शकता. दालचिनीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स चयापचय वाढवतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात. ही कॉफी प्यायल्याने आपल्याला दीर्घकाळ भूक लागत नाही. याचबरोबर आपली प्रतिकारशक्तीही मजबूत होते.

भात खा बिंधास्त पोटभर ! ऋजुता दिवेकर सांगतेय, राइस इज नाइस, भीती विसरा-भात खा कारण...

२. लेमन कॉफी :- वजन कमी करण्यासाठी आपण कॉफीमध्ये लिंबाचा रस मिसळून पिणे हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. ही कॉफी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. या कॉफीमध्ये कॅफीन, सायट्रिक ऍसिड आणि व्हिटॅमिन सी यांचे प्रमाण अधिक असते. जे वजन कमी करण्यास मदत करतात. ही कॉफी चयापचय क्रिया गतिमान करते. ही कॉफी बनवण्यासाठी १ कप कॉफीमध्ये १/२ चमचे लिंबाचा रस घालावा. आपली लेमन कॉफी पिण्यासाठी तयार आहे.

वजन कमी करण्याचा ५० - ३५ - १५ फॉर्म्युला, ऋजुता दिवेकर सांगतात लठ्ठपणा कमी करण्याची खास ट्रिक...

३. ब्लॅक कॉफी :- आपण सगळेच शक्यतो वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी पिणे पसंत करतो. वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी देखील प्यायली जाऊ शकते. ब्लॅक कॉफी प्यायल्याने मेटाबॉलिक रेट वाढतो. यामुळे वजन कमी होण्यासोबतच पोटाची चरबीही लगेच कमी होते. ही कॉफी आपली ऊर्जा वाढवते आणि शरीर निरोगी ठेवते. या कॉफीची चव वाढवण्यासाठी आपण त्यात चिमूटभर जायफळ पावडर देखील घालू शकतो. 

वजन कमी करण्यासाठी दिवसभरात थोडे थोडे खाता ? ५ गोष्टी विसरू नका, नाहीतर होईल उलटेच...

४. डार्क चॉकलेट कॉफी :- वजन कमी करण्यासाठी बहुतेकजणांना डार्क चॉकलेट कॉफी प्यायला आवडते. डार्क चॉकलेटमधील मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड पचनशक्तीचा वेग वाढवतात त्यामुळे वजन झपाट्याने कमी होते. या कॉफी ड्रिंकमुळे जास्त वेळ भूक लागत नाही, त्यामुळे जास्त खाण्यापासून बचाव होतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.

मॉर्निंग वॉकला काही खाऊन जावे की उपाशीपोटीच जाणे योग्य ? तज्ज्ञ सांगतात, नक्की योग्य काय...

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स