Join us  

लाईफस्टाइलमध्ये करा फक्त सोपे ४ बदल, ६ महिन्यात होईल घटेल वाढलेली अनावश्यक चरबी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2023 8:55 AM

4 Easy weight loss tips : काही सोप्या गोष्टी केल्यास वजन कमी करणे फार अवघड नाही...

वजन कमी करणे हे अनेकांपुढील एक महत्त्वाचे आव्हान असते. काहीवेळा बराच व्यायाम, डाएटचे नियम असं सगळं पाळूनही वजन म्हणावं तसं कमी होत नाही. अशावेळी वजन वाढलेलं असलेल्या व्यक्तीला त्याचा ताण यायला लागतो. वाढत्या वजनामुळे आधीच मानसिकरित्या ताण आलेला असताना हे वजन कमी कसे करायचे हे काही केल्या समजत नाही. दिवसभर बैठे काम, व्यायामाला नसणारा वेळ, जंक फूडचे सेवन यांमुळे शरीरावर वाढलेली चरबी कमी कशी करायची हा प्रश्नच असतो. पण काही नेमक्या गोष्टी केल्या तर वाढलेले वजन नियंत्रणात येण्यास निश्चितच मदत होऊ शकते (4 Easy weight loss tips). 

त्यासाठी फक्त आपल्या रोजच्या जीवनशैलीत काही किमान बदल करण्याची आवश्यकता असते. आता हे बदल कोणते आणि ते कसे करायचे हे समजून घ्यायला हवे. ठरवले तर अगदी लहान बदल करुन आपणही वजन नक्कीच कमी करु शकतो. त्यासाठी प्रसिद्ध आहारतज्ज्ञ श्वेता शहा-पांचाळ वजन कमी करण्यासाठीच्या काही सोप्या गोष्टी सांगतात, त्या कोणत्या आणि त्याचा वजन कमी होण्यासाठी कसा फायदा होतो पाहूया...

(Image : Google)

१. खाण्याच्या सवयी

सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली पायरी म्हणजे खाण्याच्या सवयी नियमित करणे आणि त्यामध्ये काही किमान बदल करणे. यामध्ये खाण्याच्या वेळा नक्की करणे आणि रोज ठरलेल्या वेळेला खाणे याकडे विशेष लक्ष देण्यात आले. 

२. आहारात किमान बदल 

चुकीचा आहार ज्यावेळी घेतला जात होता त्याजागी चविष्टच पण काही वेगळे पर्याय देणे. यामुळे शरीराचे चांगल्या प्रकारे पोषण होण्यास मदत होते आणि अनावश्यक गोष्टी पोटात जात नाहीत. असे पर्याय आपल्याला आपल्या आहारात नक्कीच समाविष्ट करता येतात. 

३. रात्रीच्या जेवणाची वेळ

आपण सगळेच साधारणपणे रात्री ९.३० किंवा १० वाजता जेवतो. पण त्याऐवजी रात्रीच्या जेवणाची वेळ ७.३० वर आणल्यास त्याचा खाल्लेले अन्न पचण्यासाठी अतिशय चांगला फायदा होतो. 

४. व्यायाम

खाण्याच्या सवयींमुळे हळूहळू वजन कमी व्हायला लागल्यावर व्यायामाकडे लक्ष देणे अतिशय महत्त्वाचे आहे. सुरुवातीला अगदी हलका आणि नंतर थोडा थोडा व्यायाम वाढवत त्यामध्ये नियमितपणा आणणे महत्त्वाची गोष्ट आहे.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सलाइफस्टाइलआरोग्य