Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > वजन कमी करायचं तर चुकूनही खाऊ नका ४ फूड कॉम्बिनेशन; विरुद्ध पदार्थ एकत्र खाल तर...

वजन कमी करायचं तर चुकूनही खाऊ नका ४ फूड कॉम्बिनेशन; विरुद्ध पदार्थ एकत्र खाल तर...

4 fattening foods combinations you should avoid Weight loss Tips : पाहूयात अशी कोणती फूड कॉम्बिनेशन्स आहेत जी आपण खाणे टाळायला हवे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2023 02:28 PM2023-03-27T14:28:00+5:302023-03-27T14:47:43+5:30

4 fattening foods combinations you should avoid Weight loss Tips : पाहूयात अशी कोणती फूड कॉम्बिनेशन्स आहेत जी आपण खाणे टाळायला हवे.

4 fattening foods combinations you should avoid Weight loss Tips : If you want to lose weight, do not eat by mistake 4 food combinations; If you eat opposite foods together... | वजन कमी करायचं तर चुकूनही खाऊ नका ४ फूड कॉम्बिनेशन; विरुद्ध पदार्थ एकत्र खाल तर...

वजन कमी करायचं तर चुकूनही खाऊ नका ४ फूड कॉम्बिनेशन; विरुद्ध पदार्थ एकत्र खाल तर...

आपण दिवसातून ३ ते ४ वेळा विविध प्रकारचे पदार्थ खात असतो. यातही शक्यतो घरी तयार केलेले ताजे आणि पौष्टीक अन्नपदार्थ आपल्या आहारात असावेत यासाठी आपण प्रयत्नशील असतो. थोडा वेगळा मेन्यू करायचा म्हणून किंवा काहीतरी हटके असे म्हणून आपण काहीतरी नवीन ट्राय करतो. किंवा बाहेर गेल्यावर हॉटेलमध्येही आपण काहीतरी वेगळं म्हणून एखादा पदार्थ ऑर्डर करतो. पण काही पदार्थ हे एकमेकांसोबत खाणे आरोग्यासाठी घातक असते. हे पदार्थ विरुद्ध गुणधर्माचे असल्याने ते एकत्र खाल्ल्यास पचायला अवघड जाते. इतकेच नाही तर हे पदार्थ एकत्र खाल्ल्यास वजन वाढणे, रक्तातील साखरेचे प्रमाण वाढणे असे इतरही काही त्रास होण्याची शक्यता असते. पाहूयात अशी कोणती फूड कॉम्बिनेशन्स आहेत जी आपण खाणे टाळायला हवे (4 fattening foods combinations you should avoid Weight loss Tips). 

१. भात आणि बटाटा 

आपण अनेकदा वरण भात किंवा आमटी भात करतो आणि त्यासोबत तोंडी लावायला उकडलेल्या बटाट्याची भाजी किंवा बटाट्याच्या काचऱ्या करतो. इतकेच नाही तर बिर्याणी, मसालेभात यांमध्येही आपण बटाटा घालतो. पण भातामध्ये कार्बोहायड्रेटस जास्त प्रमाणात असल्याने वजन वाढण्यासाठी भात कारणीभूत ठरतो. बटाट्यामध्ये स्टार्चचे प्रमाण जास्त असते. भात आणि बटाटा दोन्ही वजन वाढण्यासाठी हानीकारक असते. तसेच दोन्हीतून खूप जास्त प्रमाणात कॅलरीज मिळत असल्याने हे दोन्ही एकत्र खाऊ नये किंवा खात असाल तर अतिशय कमी प्रमाणात खावे.

(Image : Google)
(Image : Google)

२. ब्रेड आणि फ्रोजन योगर्ट 

बरेचदा वेळ नसल्याने झटपट काहीतरी खायचे म्हणून आपण ब्रेड खाण्याला प्राधान्य देतो. इतकेच नाही तर आपल्या फ्रिजमध्ये योगर्ट असते. त्यामुळे पोटभरीचे असे सँडविच करताना आपण हे दोन्ही पदार्थ वापरतो. ब्रेड आणि योगर्ट या दोन्हीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. इतकेच नाही तर या दोन्ही गोष्टींमुळे वजनही वाढते म्हणून सँडविच हा योग्य पर्याय नाही. 

३. चहा-कॉफी आणि नमकीन पदार्थ 

आपण नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मधे साधारण ११ ते १२ च्या दरम्यान किंवा संध्याकाळी ४ ते ६ च्या दरम्यान चहा-कॉफी आवर्जून घेतो. यासोबत आपण कधी नमकीन बिस्कीट, चिप्स किंवा आणखी काही ना काही पॅकेट फूड खातो. यामध्ये साखर, मीठ, प्रिझर्व्हेटीव्ह असतात. चहा आणि कॉफी तसेच हे पदार्थ एकत्र खाल्ल्यास अॅसिडीटी तसेच वजन वाढीची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. 

(Image : Google)
(Image : Google)

४. दूध आणि केळं

शिकरण हा महाराष्ट्रीयन घरातील एक अतिशय आवडीचा पदार्थ आहे. किंवा लहान मुलांनाही आपण अनेकदा दूध देतो आणि त्यावर फळ म्हणून केळं खायला देतो. या दोन्ही पदार्थांमध्ये आरोग्यासाठी अतिशय उत्तम गुणधर्म असतात. पण हे पदार्थ एकत्र खाणे योग्य नाही. त्यामुळे तुम्हाला हे दोन्ही खायचे असेल तर त्यात किमान २० ते ३० मिनीटांचा गॅप ठेवायला हवा.   

 

Web Title: 4 fattening foods combinations you should avoid Weight loss Tips : If you want to lose weight, do not eat by mistake 4 food combinations; If you eat opposite foods together...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.