Join us  

थुलथुलीत पोट, कंबरेचा घेर वाढतच चालला? ४ सुपरफूड खा, वेट लॉस करणं होईल सोपं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2024 3:44 PM

4 Superfoods that Burn Belly Fat and Help With Weight Loss : कोण म्हणतं खाऊन वजन कमी होत नाही? ४ पैकी एक सुपरफूड रोज खा-दिसेल फरक...

वजन कमी करणं हे खरंतर कठीण काम पण, अशक्य बिलकुल नाही. वजन कमी करण्यासाठी आपण विविध उपाय करून पाहतो. काही लोकं काटेकोरपणे डाएटकडे लक्ष देतात. तर काही लोकं व्यायामाकडे लक्ष देतात. तर काही लोकं वजन वाढेल या भीतीपोटी एक वेळचं खाणं टाळतात (Health Tips). पण जेवण टाळण्यापेक्षा आपण काही हेल्दी पदार्थ खाऊनही वजन घटवू शकता. खाण्याच्या देखील काही पद्धती आहेत (Foods for Fitness). कोणती गोष्ट किती प्रमाणात खायला हवे, याचे गणित माहित असायला हवे.

बऱ्याचदा हेल्दी वाटणाऱ्या गोष्टी वजन वाढीस कारणीभूत ठरतात (Weight Loss). जर आपल्याला डाएट आणि व्यायामासाठी पुरेसा वेळ मिळत नसेल तर, सुपरफुड्स खाऊन वजन कमी करा. यामुळे वजन कमी करणे अधिक सोपे होईल(4 Superfoods that Burn Belly Fat and Help With Weight Loss).

मखाणा

मेडिकल न्यूज टुडे या वेबसाईटनुसार, 'मखाणामध्ये फायबर आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते. त्यात कॅलरीजटचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे पोट अधिक काळ भरलेले राहते. मखाणामध्ये अँटिऑक्सिडंट असतात. ज्यामुळे खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचते. शिवाय चयापयचय बुस्ट होते. आपण मखाणा भाजून त्यात मीठ मिरपूड घालून खाऊ शकता.

गव्हाचे पदार्थ न खाल्ल्यास, खरंच वजन कमी होते? तज्ज्ञ सांगतात आहारातून गहू वगळाल तर..

पेरू

उन्हाळा सुरु होताच आपण प्रत्येक जण आवडीने पेरू खातो. पेरू खाल्ल्याने चयापचय क्रिया बुस्ट होते. ज्याचा फायदा वेट लॉससाठी होतो. पेरू खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय त्यात कॅलरीजही कमी प्रमाणात असल्याकारणाने वजन वाढत नाही. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अनेक जीवनसत्त्वे-खनिजे आढळतात. ज्याचा फायदा आरोग्याला पुरेपूर होतो.

अक्रोड

वेट लॉससाठी मदत करणाऱ्या सुपरफूडपैकी एक म्हणजे अक्रोड. अक्रोड अँटिऑक्सिडंट्स आणि ओमेगा ३ फॅटी ऍसिडने समृद्ध आहे. नियमित अक्रोड खाल्ल्याने भूक नियंत्रित राहते. अक्रोडमधील पौष्टीक घटक हृदय निरोगी राखण्यास मदत करतात.

लग्नाची तारीख ठरली? फिटनेससाठी खाणं टाळता? ६ जबरदस्त टिप्स-लग्नात दिसाल फिट-सुडौल

रताळे

रताळे चवीला स्वादिष्ट आणि पौष्टीक्तेने परिपूर्ण असतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, ए, सी, बी आणि मँगनीज सारख्या जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. रताळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे भुकेवर नियंत्रण मिळवता येते. रताळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. जे शरीराला मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवतात.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स