दुपारी चपाती, भाजी, डाळ , भात असं परिपूर्ण जेवण खाल्ल्यानंतर रात्री काहीतरी हलकं खाण्याचा सल्ला दिला जातो. रात्रीचं जेवण ८ च्या आधी घ्यायचं. हे खरं असलं तरी कामाच्या गडबडीत रात्रीच्या जेवणाला उशीर होतो. अशात हेवी जेवण केलं तर पचायला पुरेसा वेळ मिळत नाही आणि या अन्नाचं फॅट्समध्ये रुपातंर होतं. रात्रीच्या जेवणात डाळ, तांदळाची मऊ खिचडी खाल्ल्यानं शरीराला बरेच फायदे मिळतात. (Health Benefits of eating Khichdi in dinner)
आयुर्वेदानुसार खिचडी सर्व तिन्ही दोष - वात, पित्त आणि कफ दोष संतुलित करणारा अन्नपदार्थ आहे. त्यामुळे कोणताही विचार न करता तुम्ही हिरवी मसूर आणि तांदूळ घालून खिचडी बनवू शकता. आजारी व्यक्तींनाही डॉक्टर खिचडी खाण्याचा सल्ला देतात. हे संतुलित आणि पौष्टिक जेवण मानले जाते. (4 Surprising Health Benefits of Khichdi)
साधी मूग आणि तांदळाची खिचडी तुम्हाला प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि पोषक तत्वांचा संपूर्ण पॅक देते. खिचडी खाल्ल्यानं शरीराला फायबर्स आणि प्रोटीन्स दोन्ही एका वेळेला मिळतात. त्यामुळे बराचवेळ पोट भरलेलं राहतं आणि खाल्लेलं अन्न लगेच पचतं. यामुळे शरीर डिटॉक्स होतं, पचनक्रिया चांगली राहते.
खिचडी बनवण्याची सोपी पद्धत
१) मूग डाळ आणि तांदूळ १ ते २ तासांसाठी भिजवून ठेवा.
२) प्रेशर कुकर गरम करून त्यात तेल राई, जीर, कांदा, लसणाची फोडणी घाला
३) त्यानंतर मसाले, मीठ घाला आणि डाळ तांदूळ परतवून. तुम्ही खिचडीमध्ये आवडीनुसार भाज्या घालू शकता.
४) नंतर गरजेनुसार पाणी घालून उकळी आल्यानंतर कुकरचं झाकण बंद करा.
५) ३ ते ४ शिट्या घेतल्यानंतर गॅस बंद करा. तयार आहे मऊ, पौष्टीक खिचडी