Join us  

सायंकाळी ७ नंतर चुकूनही करू ४ गोष्टी, वजन कमी होण्याऐवजी झपाट्याने वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2023 1:43 PM

4 Things Not Do After 7 p.m. If Trying to Lose Weight जर आपण या ४ गोष्टी सायंकाळी ७ नंतर करत असाल तर, वेट लॉस होणार नाही..उलट झपाट्याने वाढेल

लोकांमध्ये सध्या लठ्ठपणाची समस्या वाढत चालली आहे. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे आपण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. लठ्ठपणा फक्त व्यक्तिमत्व बिघडवत नाही तर, आत्मविश्वास देखील कमी करतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोकं तासंतास व्यायाम शाळेत जाऊन घाम गाळतात. तर काही लोकं डाएट फॉलो करून वजन कमी करतात. पण काहींचे हे दोन्ही करून सुद्धा वजन कमी होत नाही.

आपल्याकडून काही नकळत चुका होतात. ज्यामुळे आपले वजन घटत नाही. यासंदर्भात आहारतज्ज्ञ राधिका गोयल यांनी एक व्हिडिओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे. ज्यात त्यांनी सायंकाळी ७ नंतर कोणते ४ चुका करणे टाळावे. या बाबतीत माहिती दिली आहे(4 Things Not Do After 7 p.m. If Trying to Lose Weight). 

कॅफिनयुक्त ड्रिंक्स पिणे टाळा

सायंकाळी ७ नंतर कॅफिनयुक्त ड्रिंक्स पिणे टाळा. कॅफिनयुक्त पेय प्यायल्याने झोप मोड होते. ज्यामुळे अपचनाच्या निगडीत समस्या वाढतात, यासह अतिरिक्त चरबी देखील कमी होत नाही. कॅफिनयुक्त ड्रिंक्सच्या जागी आपण हर्बल चहा पिऊ शकता.

जिरे-मिरे-दालचिनी-हळद, पोटावरची चरबी कमी करण्याचा १ सोपा आणि मस्त उपाय

रात्रीचे फळे खाणे टाळा

अनेकांना असे वाटते की, रात्रीचं जेवण स्किप करून फळं खाल्ल्याने वजन कमी होते. तर असे होत नाही. आरोग्यासाठी फळे खाणं आवश्यक आहे पण, काही लोकं जेवण स्किप करून फळं खातात.  ज्यामुळे पचनक्रिया मंदावते, अशा वेळी वजन वाढू शकते.

सुटलेलं पोट होईल कमी, डबल चिन गायब,रामदेव बाबा सांगतात सोपे उपाय

रात्री उशिरा जागत राहण्याची सवय

वेट लॉस दरम्यान, शरीराला आराम व ८ तासांची झोप मिळणे आवश्यक आहे. अपुऱ्या झोपेमुळे हार्मोनल असंतुलित होतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे रात्री उशिरा जागू नका, वेळेवर ८ तासांची झोप घ्या.

कॅलरीजयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळा

काही लोकं सायंकाळची छोटी भूक भागवण्यासाठी जंक फूड खातात. जंक फूड लवकर पचत नाही. ज्यामुळे शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढते, यासह अतिरिक्त चरबी देखील वाढते. त्यामुळे रात्रीच्या वेळी कॅलरीजयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळा. 

टॅग्स :फिटनेस टिप्सवेट लॉस टिप्सहेल्थ टिप्सआरोग्य