आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम (metabolism) सकाळी उठल्यानंतर अतिशय जलद असतं. त्यामुळे सकाळी किंवा दुपारच्या जेवणात घेतलेलं जड अन्नही व्यवस्थित पचतं. पण हळूहळू मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया मंदावत जाते. रात्री तर पचन (digestion) आणि चयापचय या दोन्ही क्रियांचा वेग मंदावलेला असतो. अशावेळी जर आपण खूप जड, मसालेदार जेवण केलं, तर ते पचायला नक्कीच त्रास होतो. अनेकदा खाल्लेलं अन्न व्यवस्थित न पचल्याने मग दुसऱ्यादिवशी ॲसिडीटी, अपचन, कॉन्स्टिपेशन किंवा ब्लोटींग असे अनेक त्रास होतात.(how to take dinner at night?)
शिवाय चयापचय क्रियेचा वेग उत्तम असेल तर खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होतं आणि त्यामुळे मग शरीरावर चरबीचे थर साचत नाहीत. पण रात्रीच्या वेळी चयापचय क्रिया मंदावलेली असताना जड अन्न खाल्लं तर त्यामुळे नक्कीच अपचन होऊन चरबीचे प्रमाण वाढत जाते. त्यामुळे मग बऱ्याच जणांना वजन वाढीचाही त्रास होतो. त्यामुळेच तर रात्रीचा आहार अगदी हलका असावा, असं आहारतज्ज्ञही वारंवार सांगतात. पण हलका आहार घ्यावा, म्हणजे नेमकं काय खावं, हे अनेक जणांना समजत नाही. शिवाय हलका आहार घ्यायचा म्हणजे कमी जेवायचं का, त्यामुळे पोट भरेल का? असे प्रश्नही अनेकांच्या मनात असतातच. यासाठीच रात्रीचं जेवण कसं असावं, याच्या काही खास टिप्स. या टिप्स इन्स्टाग्रामच्या rashichowdhary या पेजवर शेअर करण्यात आल्या आहेत.
रात्री जेवताना लक्षात ठेवा ४ गोष्टी१. रिफाईन कार्ब्स नकोरात्रीच्या जेवणात refined carbs असणारे पदार्थ घेऊ नयेत. हे पदार्थ रात्री खाल्ल्याने वजन आणि पचनाचा त्रास या दोन्ही गोष्टी वाढतात. यामध्ये मैद्याचे पदार्थ, ब्रेड, पांढरा भात, पेस्ट्री, पास्ता, गोड पदार्थ यांचा समावेश असतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणात असे पदार्थ नको.
२. प्रोटीन्स वाढवारात्रीच्या जेवणात प्रोटीन्स असावेत. प्रोटीन्स मिळविण्याचा उत्तम पर्याय म्हणजे पालेभाज्या खाणे. सूप किंवा उकडलेल्या भाज्या, कडधान्यांच्या उसळी या स्वरुपात तुम्ही प्रोटीनयुक्त आहार घेऊ शकता. अनेकदा प्रोटीन्स असणारे काही पदार्थ प्रत्येकाच्याच प्रकृतीला अनुकूल असतात असं नाही. त्यामुळे जे प्रोटीन पदार्थ तुमच्या तब्येतीला सुट होतात, असेच पदार्थ खा. अन्यथा जळजळ, ॲसिडीटी असा त्रास होऊ शकतो.
३. सूप पिण्याची योग्य पद्धतरात्रीच्या जेवणात वाटीभर सूप असेल तर कधीही उत्तम. पण जर तुम्हाला रात्री जेवल्यानंतर पोट फुगण्याचा किंवा मग गॅसेसचा त्रास होत असेल तर चमच्याने सूप पिणे टाळा. सरळ कप किंवा बाऊल तोंडाला लावा आणि थेट एकेक घोट घेऊन सूप संपवा.
४. भाज्या खारात्री उकडलेल्या भाज्या आणि सूप हा सगळ्यात योग्य आहार आहे. कारण भाज्यांमुळे शरीरात microbiome तयार होतात, जे पचनासाठी अतिशय उपयुक्त ठरतात. त्यामुळे पचनक्रियेचा वेग वाढण्यासही मदत होते. रात्रीचं जेवण असंच हलकं- फुलकं असावं. सुरुवातीला कमी जेवणाचा त्रास होऊ शकताे. त्यासाठी एकदम आहार कमी करू नका. थोडा थोडा कमी करत न्या. काही दिवसांनी या आहाराची सवय झाल्यावर आपोआपच हलके- हलके वाटू लागेल. शरीरात जडपणा जाणवणार नाही आणि पचनाच्या समस्याही कमी होतील.