Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > थुलथुलीत पोट, कंबरेचा घेर कमी करायचा आहे? नियमित खा -प्या ४ पांढरे पदार्थ, व्हा शिडशिडीत

थुलथुलीत पोट, कंबरेचा घेर कमी करायचा आहे? नियमित खा -प्या ४ पांढरे पदार्थ, व्हा शिडशिडीत

4 Types of White foods that helps to Weight Loss : कोण म्हटलं पांढऱ्या गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर नसतात; एकदा या ४ गोष्टी खाऊन पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2024 04:29 PM2024-03-06T16:29:25+5:302024-03-06T16:30:09+5:30

4 Types of White foods that helps to Weight Loss : कोण म्हटलं पांढऱ्या गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर नसतात; एकदा या ४ गोष्टी खाऊन पाहा...

4 Types of White foods that helps to Weight Loss | थुलथुलीत पोट, कंबरेचा घेर कमी करायचा आहे? नियमित खा -प्या ४ पांढरे पदार्थ, व्हा शिडशिडीत

थुलथुलीत पोट, कंबरेचा घेर कमी करायचा आहे? नियमित खा -प्या ४ पांढरे पदार्थ, व्हा शिडशिडीत

वजन वाढलं की, कमी करताना नाकीनऊ येतात. वजन वाढलं की, कमी करण्यासाठी आपण विविध फंडे अवलंबून पाहतो. पण प्रत्येक उपायांनी वजन कमी होईलच असे नाही (White Foods). बऱ्याचदा अन्न व्यवस्थित पचत नसल्यामुळेही वजन कमी होत नाही. बिघडलेली जीवनशैली, उलट-सुलट पदार्थ खाणे, वेळेवर जेवण न करणे, वेळेवर झोप न घेणे, यासह इतर कारणांमुळे पचनक्रिया बिघडते, शिवाय शरीर बेढब दिसू लागते (Fitness Tips).

जर आपल्याला व्यायाम आणि डाएटकडे हवे तसे लक्ष द्यायला जमत नसेल तर, ४ प्रकारचे हेल्दी पांढऱ्या गोष्टी खाऊन पाहा (Weight Loss). या हेल्दी पदार्थांमुळे उन्हाळ्यातील आजार दूर राहतील. शिवाय वजनही कमी करण्यास मदत होईल(4 Types of White foods that helps to Weight Loss).

वजन कमी करण्यासाठी काय खावे?

वेट लॉससाठी आपण प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थ खाऊ शकता. प्रोबायोटिक्समध्ये जिवंत सूक्ष्मजीव असतात. जे पचनतंत्रासाठी फायदेशीर ठरतात. प्रोबायोटिक्सयुक्त पदार्थ आतड्यात राहणाऱ्या 'गुड बॅक्टेरिया'ची संख्या वाढवतात. ज्यामुळे आरोग्य सुदृढ राहते. शिवाय पोटाचे आरोग्य सुधारते. ज्यामुळे खाल्लेलं योग्यरित्या पचते, व वेट लॉससाठी मदत होते.

रोज खा ४ पदार्थ, डेअरी प्रॉडक्ट्स न खाताही मिळेल भरपूर कॅल्शियम! हाडांची होणार नाही झिज

दही

दही हे प्रोबायोटिक्सचे उत्तम स्त्रोतांपैकी एक आहे. यात विविध प्रकारचे प्रोबायोटिक बॅक्टेरिया असतात, जे पचन सुधारतात. दह्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने आढळतात. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय उलट-सुलट पदार्थ खाण्याचीही इच्छा कमी होते. उन्हाळ्यात आपण आपल्या आहारात दह्याचा समावेश करू शकता.

ताक

उन्हाळ्यात ताक प्यायल्याने शरीर थंड राहते. ताकात पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लोह, फॉस्फोरस, इत्यादी खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. जर आपल्याला वजन कमी करायचं असेल तर, सॉफ्ट ड्रिंक व्यतिरिक्त ताक प्या. ताक प्यायल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय यात कॅलरीज कमी असतात. ज्यामुळे अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत होते.

केफिर

केफिर हे एक निरोगी, आंबवलेले अन्न आहे. ज्याची तुलना पिण्यायोग्य दह्याशी करता येते. हे उत्पादन पारंपारिकपणे डेअरी दुधापासून बनवले जाते. त्यात लैक्टोबॅसिलस असतात. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, यासह हाडांचे आरोग्यही सुधारते.

थुलथुलीत पोट, कंबरेचा घेर वाढतच चालला? ४ सुपरफूड खा, वेट लॉस करणं होईल सोपं..

पनीर

पनीर हा प्रोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो. यामध्ये प्रथिने भरपूर प्रमाणात असल्याने वजन कमी करण्यास मदत होते. जर आपण वेट लॉससाठी पनीर खात असाल तर, नियमित सुमारे १५० ते २०० ग्रॅम कमी चरबीयुक्त पनीर खा. यामुळे वेट लॉससाठी मदत, यासह हाडांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरेल.

Web Title: 4 Types of White foods that helps to Weight Loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.