आजच्या धावपळीच्या जीवनात जंक फूड (Junk Food) खाणं सामान्य झालं आहे. सोयीनुसार आणि झटपट उपलब्ध होते, म्हणून आपण जंक फूड खातो (Health Tips). झटपट पण चवीला रुचकर जरी असले तरी, याचा आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो (Weight Loss). जास्त प्रमाणात जंक फूड खाल्ल्याने वजन तर वाढतेच, यासह हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. अशा स्थितीत जंक फूड टाळून निरोगी जीवनशैली अंगीकारणे गरजेचं आहे. मात्र, एकदा का जंक फूड खायला सुरुवात केली, तर त्याला माघार नाही. जंक फूड खाणे हे एखाद्या व्यसनापेक्षा कमी नाही.
जर आपल्याला जंक फूडपासून सुटका हवी असेल तर, जीवनशैलीत काही बदल करून पाहा. यामुळे जंक फूडची सवय सुटेल, यासह आरोग्यालाही अनेक फायदे मिळतील. जंक फूडची सवय मोडण्यासाठी नक्की काय करावे?(4 Ways to Stop Cravings for Unhealthy Foods and Sugar).
घरचे अन्न खा
हिवाळ्यात जास्त प्रमाणात भूक लागते. अशावेळी आपण झटपट बनणारे पदार्थ खातो. यामुळे जिभेचे चोचले पूर्ण होतात. पण वजन वाढत जातं. त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त घरी बनलेले पदार्थ खा. घरगुती पौष्टीक पदार्थ खाल्ल्याने वजन वाढत नाही. परंतु, पोट भरते. आणि शरीरला पौष्टीक घटक मिळतात. ज्यामुळे आरोग्य सुदृढ राहते.
गुडघ्यापर्यंत लांब - काळे केस हवेत? खोबरेल तेलात घाला मुठभर 'ही' हिरवी पानं; केस इतके वाढतील की..
कधीही उपाशी राहू नका
अनेक वेळा बराच वेळ उपाशी राहिल्यानंतर अन्नाची लालसा वाढते, ज्यामुळे बाहेरून अन्न मागवावे लागते. त्यामुळे शक्यतो नाश्ता, दुपारचे जेवण किंवा रात्रीचं जेवण करणे टाळा. यामुळे भूक वाढणार नाही.
सोबत हेल्दी स्नॅक्स ठेवा
घरात किंवा सोबत हेल्दी स्नॅक्स ठेवा. आवडीची फळे, ड्रायफ्रुट्स, याशिवाय डार्क चॉकलेट, फळांची कोशिंबीर किंवा काकडी, गाजर, टोमॅटो अशा हिरव्या भाज्यांपासून बनवलेले सॅलड खाऊ शकता. चिप्स, बर्गर आणि पिझ्झाऐवजी हे आरोग्यदायी स्नॅक्स खाण्याचा प्रयत्न करा.
मासिक पाळी वेळेवर येत नाही? कधी लवकर तर कधी २-३ महिन्यांनी येते? ४ टिप्स; त्रास होईल कायमचा दूर
प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थ खा
प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने वेट लॉस होतेच. यामुळे पोट देखील दीर्घकाळ भरलेले राहते. फायबरसाठी, आपल्या स्नॅकच्या वेळेत सफरचंद, ब्रोकोली, गाजर, केळी खाऊ शकता. शिवाय प्रोटीनसाठी डाळ, पनीर किंवा सोयाबिन खाऊ शकता.