Join us

हिवाळ्यात महागडा सुकामेवाच कशाला हवा, मूठभर शेंगदाणे खा! आहारतज्ज्ञ सांगतात ५ जबरदस्त फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2024 18:35 IST

Heath Benefits Of Eating Peanut: हिवाळ्यात महागडा सुकामेवा आणून खाण्यापेक्षा मुठभर शेंगदाणे नियमितपणे खाल्ले तर त्याचेही आरोग्याला खूप फायदे होतात, असं आहारतज्ज्ञ सांगतात...

ठळक मुद्देशेंगदाण्यांमध्ये असलेले मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त ठरतात

हिवाळा सुरू झाला, वातावरणात थंडी जाणवायला लागली की शहरातली सुकामेव्याची दुकानंही गर्दीने फुलून जातात. कारण वेगवेगळ्या प्रकारचा सुकामेवा, खारीक, खोबरं, मेथ्या, उडीद असं सगळं घालून आपल्याकडे खास पौष्टिक हिवाळी लाडू केले जातात. या लाडूंमध्ये जास्त प्रमाणात सुकामेवा असतो. सुकामेवा खाल्ल्याने आरोग्याला होणारे फायदे तर आपल्याला माहितीच आहेत. पण त्या फायद्यांएवढेच जबरदस्त फायदे देणारा एक पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच असतो, पण आपण त्याकडे मात्र हमखास दुर्लक्ष करतो (heath benefits of eating peanut). हा पौष्टिक पदार्थ म्हणजे शेंगदाणे.(5 amazing benefits of eating handful of peanuts every day in winter)

 

मूठभर शेंगदाणे दररोज खाल्ल्याने होणारे फायदे 

आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी याविषयीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी मूठभर शेंगदाणे दररोज खाल्ल्यामुळे शरीराला होणारे फायदे कोणते, याविषयीची माहिती दिली आहे. ते फायदे नेमके कोणते ते पाहा..

लोकसंख्या वाढीसाठी जपानचा मोठा निर्णय! मुलं होऊ द्यावीत म्हणून इथून पुढे महिलांसाठी..

१. रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले शेंगदाणे जर सकाळी खाल्ले तर त्यातून चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन B 6 मिळते.

२. अनेक जणांना पोट फुगण्याचा म्हणजेच ब्लोटिंग, गॅसेसचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी भिजवलेले शेंगदाणे खाणे फायद्याचे ठरते. 

 

३. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी गूळ, शेंगदाणे आणि खोबरं एकत्र करून खावे. हिवाळ्यात अनेक जण सर्दी, खोकला, कफ होऊन वारंवार आजारी पडतात. हा त्रास कमी करण्यासाठी गूळ, शेंगदाणे, खोबरे यांचे मिश्रण खूप उपयुक्त ठरू शकते.

काही केल्या वजन कमी होईना? सकाळी उपाशीपोटी ५ पदार्थ खा- भराभर वजन उतरेल, करून बघा

४. बऱ्याच महिलांच्या शरीरात लोह कमी असते. त्यामुळे त्यांना ॲनिमियाचा त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी गूळ- शेंगदाणे खाणे उपयुक्त ठरते कारण त्यामुळे शरीरातील लोह वाढते.

५. शेंगदाण्यांमध्ये असलेले मोनोसॅच्युरेटेड फॅट्स आणि पॉलिसॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास उपयुक्त ठरतात. तसेच हिवाळ्यात शेंगदाणे खाल्यामुळे शरीर उबदार राहण्यास मदत होते. 

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सअन्नहिवाळ्यातला आहारआरोग्यहेल्थ टिप्स