Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > सकाळी उपाशीपोटी जिऱ्याचं पाणी पिण्याचे ६ जबरदस्त फायदे! उत्तम आरोग्य मिळेल- सौंदर्यही खुलेल

सकाळी उपाशीपोटी जिऱ्याचं पाणी पिण्याचे ६ जबरदस्त फायदे! उत्तम आरोग्य मिळेल- सौंदर्यही खुलेल

Benefits Of Starting Your Day With Warm Jeera Water: जिऱ्याचे पाणी नियमितपणे घेणं तुमच्या आरोग्यासाठी किती उत्तम आहे ते पाहूया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2025 15:27 IST2025-02-03T15:26:23+5:302025-02-03T15:27:00+5:30

Benefits Of Starting Your Day With Warm Jeera Water: जिऱ्याचे पाणी नियमितपणे घेणं तुमच्या आरोग्यासाठी किती उत्तम आहे ते पाहूया..

5 amazing benefits of having jeera water as a first drink in morning, benefits of starting your day with warm jeera water | सकाळी उपाशीपोटी जिऱ्याचं पाणी पिण्याचे ६ जबरदस्त फायदे! उत्तम आरोग्य मिळेल- सौंदर्यही खुलेल

सकाळी उपाशीपोटी जिऱ्याचं पाणी पिण्याचे ६ जबरदस्त फायदे! उत्तम आरोग्य मिळेल- सौंदर्यही खुलेल

Highlightsअभिनेत्री जुही परमार हिने सुद्धा  नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला असून यामध्ये तिने जिऱ्याचं पाणी पिण्याचे फायदे सांगितले आहेत.

सध्या प्रत्येकाच्या आरोग्याच्या काही ना काही समस्या आहेत. यातल्या बहुतेक समस्या या अपचनामुळे होणाऱ्या आहेत. खाल्लेल्या अन्नाचे पचन व्यवस्थित झाले नाही तर त्यातूनच मग वजन वाढणे, ॲसिडीटी, अपचन असे त्रास होतात. याशिवाय पोट खराब असेल तर त्याचा परिणाम आपोआपच चेहऱ्यावरही पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन या स्वरुपात दिसून येतो. त्यामुळेच अन्नपचन व्यवस्थित होणे अतिशय गरजेचे आहे. आणि ते होण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याचं पाणी पिणं अधिक लाभदायक ठरतं (benefits of starting your day with warm jeera water). अभिनेत्री जुही परमार हिने सुद्धा  नुकताच एक व्हिडीओ सोशल मिडियावर शेअर केला असून यामध्ये तिने जिऱ्याचं पाणी पिण्याचे फायदे सांगितले आहेत.

 

जिऱ्याचं पाणी पिण्याचे फायदे

१. जिऱ्याचं पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने पचनासाठी उपयुक्त ठरणारे एन्झाईम्स ॲक्टीव्ह होतात आणि त्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली होण्यास मदत होते.

२. चयापचय क्रिया अधिक चांगली होते आणि त्यामुळे शरीरावरील चरबी अधिक जलदपणे विरघळण्यास मदत होते. 

दूरचं धुसर दिसतं? योगशास्त्रात सांगितलेल्या ४ सोप्या गोष्टी करून पाहा, नजर होईल तेज

३. जिऱ्याचं पाणी हे नॅचरल बॉडी डिटॉक्स ड्रिंक म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे शरीरातील अशुद्ध, विषारी घटक शरीराबाहेर येण्यास मदत होते.

४. जिऱ्यामध्ये असणारे ॲण्टीऑक्सिडंट्स त्वचेवरील चमकदारपणा वाढविण्यास उपयुक्त करतात.

नकळतपणे वजन, शुगर वाढविणारे ५ पदार्थ, गोड खाणं टाळता पण 'हे' पदार्थ खातानाही विचार करा

५. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्यापोटी जिरा पाणी पिणे फायद्याचे ठरते.

६. मासिक पाळीच्या काळात पोट खूप दुखत असेल तर जिऱ्याचं पाणी प्यायल्यास वेदना कमी होतात.

 

जिऱ्याचं पाणी कसं तयार करावं?

दोन पद्धतींनी तुम्ही जिऱ्याचं पाणी तयार करू शकता. त्या नेमक्या कोणत्या ते पाहूया.

१. पहिल्या पद्धतीनुसार रात्री झोपण्यापुर्वी १ ग्लास पाण्यात १ चमचा जिरे टाका आणि ते हलवून घ्या. त्यानंतर ग्लासवर झाकण ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी गाळून घ्या आणि प्या.

बघा आईची माया!! मुलाला ३१ हजारांचं ब्रॅण्डेड स्वेटर घेणं परवडत नव्हतं म्हणून आईने चक्क....

२. किंवा १ ग्लास पाण्यात १ चमचा जिरे टाका आणि ते पाणी गॅसवर ७ ते ८ मिनिट उकळवून घ्या. त्यानंतर ते पाणी गाळा आणि गरम असतानाच प्या.


 

Web Title: 5 amazing benefits of having jeera water as a first drink in morning, benefits of starting your day with warm jeera water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.