चणे (Chickpeas) एक हाय प्रोटीन फूड आहे. भाजलेले चणे तुमच्यासाठी एक उत्तम स्नॅक ऑपश्न आहेत. भाजलेल्या चण्यांमध्ये फायबर्स आणि वेगवेगळी पोषक तत्व असतात जी शरीरासाठी फायदेशीर ठरतात. (Health Tips) चणे एक हेल्दी सुपर फूड आहे. ज्यामुळे शरीरातील पोषक घटकांची कमतरता निघून जाण्यास मदत होते. (Health Tips) रोस्टेड चणे खाल्ल्याने शरीराला फायदे मिळतात. यात प्रोटीन्सचे प्रमाणही जास्त असते आणि वजन कमी होण्यास मदत होते. (Benefits Of Roasted Chana For Weight Loss)
डायबिटिसच्या रुग्णांसाठीसुद्धा हा उत्तम पर्याय आहे. हाय प्रोटीन स्नॅक्ससाठी तुम्ही चण्यांचा आहारात समावेश करू शकता. (Benefits Of Roasted Chana For Weight Loss) भाजलेल्या चण्यांच्या सेवनाने शरीराला बरेच फायदे मिळतात. (Amazing Health Benefits Of Roasted Chana) चणे खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इंफॉर्मेशनमध्ये पब्लिश झालेल्या रिपोर्टनुसार चण्यांमधील फायबर्स आणि प्रोट्रिन्स क्रेव्हिंग्स कमी करतात आणि वजन कमी करण्यास मदत करतात. (Ref) वजन कमी करण्याासाठी चणे एखाद्या सुपरफूडप्रमाणे काम करते. यात प्रोटीन्सचे प्रमाण जास्त असते.
डायबिटीस नियंत्रणात राहते
चण्यांचे सेवन केल्यानं ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते. कारण ग्लायसेमिक इंडेक्सयुक्त पदार्थांच्या लिस्टमध्ये याचा समावेश होतो. यात प्रोटीन्स मोठ्या प्रमाणात असतात. डायबिटीस असलेल्यांसाठी चणे जास्त फायदेशीर ठरतात. कारण हा सोपा झटपट नाश्त्याचा पदार्थ कधीही खाता येतो.
कंबर-गुडघ्यांचं दुखणं फार वाढलंय? बाबा रामदेव सांगतात ५ पदार्थ खा-हाडं ठणकणंच होईल बंद
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
चण्यांचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. कारण यात फायबर्सचे प्रमाण भरपूर असते. ज्यामुळे कार्डिओवॅस्क्युलर आजारांचा धोका टाळण्यास मदत होते.
मुलांच्या उत्तम वाढीसह मेंदूविकासासाठी आहारात हवे ५ पदार्थ, एकाग्रता-स्मरणशक्तीही वाढेल
कॅन्सरचा धोका टळतो
नॅशनल कॅन्सर इंस्टिट्यूट आणि नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोजी इंफॉर्मेशनमध्ये पब्लिश केलेल्या रिपोर्टनुसार यातील फॅटी एसिड कॅन्सर सेल्सना विकसित होऊ देत नाहीत. चणे खाल्ल्याने कॅन्सरसारख्या गंभीर आजारांपासून बचाव होतो.
मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर
हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिश झालेल्या एका रिपोर्टनुसार चण्यांचे सेवन केल्याने ब्रेन पॉवर बुस्ट होण्यास मदत होते. यातील ल्यूटिन आणि अन्य फायटोन्युट्रिएंट्स मेंदूचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात. दिवसभरात कधीही तुम्ही वाटीभर भाजलेले चणे खाऊ शकता.