Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोटावरची चरबी कमीच होत नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ५ पदार्थ खा- सुटलेल्या पोटासाठी खास उपाय

पोटावरची चरबी कमीच होत नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ५ पदार्थ खा- सुटलेल्या पोटासाठी खास उपाय

5 Ayurvedic Food That Helps To Lose Weight: पोटावरची वाढती चरबी, वाढणारं वजन अशा समस्यांमुळे वैतागून गेला असाल तर लगेचच आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेला हा एक सल्ला बघा... (ayurvedic remedies for weight loss)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2024 05:55 PM2024-09-23T17:55:20+5:302024-09-23T18:03:29+5:30

5 Ayurvedic Food That Helps To Lose Weight: पोटावरची वाढती चरबी, वाढणारं वजन अशा समस्यांमुळे वैतागून गेला असाल तर लगेचच आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेला हा एक सल्ला बघा... (ayurvedic remedies for weight loss)

5 ayurvedic food that helps to lose weight, ayurvedic remedies for weight loss | पोटावरची चरबी कमीच होत नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ५ पदार्थ खा- सुटलेल्या पोटासाठी खास उपाय

पोटावरची चरबी कमीच होत नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात ५ पदार्थ खा- सुटलेल्या पोटासाठी खास उपाय

Highlightsतुम्हीही वाढत्या वजनामुळे, सुटलेल्या पोटामुळे हैराण झाला असाल तर हा एक आयुर्वेदिक उपाय करून पाहा...

वाढतं वजन हा हल्ली बहुतांश लोकांसमोरचा एक मुख्य प्रश्न आहे. कारण प्रत्येकाच्याच कामाचं स्वरुप खूप बदललं आहे. दिवसातून अधिकाधिक वेळ आप बसूनच काम करतो. शिवाय चालणं, फिरणं असा व्यायामही खूप कमी झाला आहे. घरातली कामं, ऑफिस एवढं करतानाच अनेकांची दमछाक होते. कामासाठी सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर घरी यायला जवळपास रात्रच होते. मग अशावेळी व्यायामासाठी वेळच उरत नाही (5 ayurvedic food that helps to lose weight). शिवाय खाण्यापिण्याच्या सवयींमध्येही खूप बदल झाला आहे. याचा परिणाम आपोआपच वाढलेल्या वजनाच्या स्वरुपात दिसून येतो. म्हणूनच तुम्हीही वाढत्या वजनामुळे, सुटलेल्या पोटामुळे हैराण झाला असाल तर हा एक आयुर्वेदिक उपाय करून पाहा...(ayurvedic remedies for weight loss)

 

वाढतं वजन, पोटावरची चरबी कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय

वाढतं वजन तसेच पोटावरची चरबी कमी करण्यासाठी कोणते आयुर्वेदिक पदार्थ नियमितपणे खावे, याविषयीची माहिती डॉ. दिक्षा भावसार यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे. ते ५ पदार्थ नेमके कोणते ते पाहा..

मुठभर हरबरे घेऊन अर्ध्या तासात घरीच तयार करा खमंग फुटाणे- विकतच्या फुटाण्यांची गरजच नाही

१. मध

मध उष्ण प्रकृतीचा असतो. त्यामुळे पचनक्रिया अधिक चांगली करण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. मधामुळे कफ दोष कमी होण्यासही मदत होते. यामुळे शरीराचा जडपणा कमी होतो. त्यासाठी दररोज सकाळी १ ग्लास कोमट पाण्यामध्ये १ टीस्पून मध आणि थोडा लिंबाचा रस टाकून रिकाम्यापोटी प्यावे.

 

२. बार्ली किंवा जव

जव किंवा बार्लीमध्ये असणारे गुणधर्म शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास मदत करतात. याशिवाय रक्तातील साखरेचे प्रमाणत नियंत्रित ठेवण्यासाठीही बार्लीची मदत होते. त्यामुळे मधुमेहींसाठीदेखील ते फायदेशीर ठरते. शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यासाठीही बार्ली उपयुक्त आहे. 

केस वाढतच नाहीत, खूप गळतात? केसांना द्या २ प्रकारचे व्यायाम, वाढतील भराभर- होतील दाट 

३. हळद

हळद ही नॅचरल डिटॉक्स एजंट म्हणून ओळखली जाते. त्यामुळे शरीरातील टॉक्झिन्स शरीराबाहेर टाकण्यासाठी हळदीची मदत होते. शरीरातील कफ दोष हळदीमुळे कमी होते. त्यामुळे शरीराचा जडपणा कमी होतो. त्यासाठी अर्धा टीस्पून हळद मध किंवा आवळ्यासोबत रिकाम्यापोटी खाण्याचा सल्ला डॉ. दिक्षा देतात.

 

४. आवळा

वात, पित्त आणि कफ हे तिन्ही दोष संतुलित ठेवण्यासाठी आवळा उपयुक्त ठरतो. त्यासाठी जेव्हा आवळ्याचा सिझन असतो, तेव्हा दररोज थोडा तरी आवळा आवर्जून खावा.

गरबा- दांडियासाठी सुंदर ऑक्सिडाईज झुमके घ्यायचे? खरेदी करा यंदा ट्रेण्डिंग असणारे लेटेस्ट डिझाईन्स..

आवळ्याचा मुरंबा, आवळ्याचा रस अशा माध्यमातूनही तुम्ही तो खाऊ शकता.

५. आलं

आल्याचा काढा दिवसातून एक दोन वेळा घ्यावा. यामुळे शरीरातली अतिरिक्त चरबी कमी होण्यास बरीच मदत होते. 



 

Web Title: 5 ayurvedic food that helps to lose weight, ayurvedic remedies for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.