Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > उकडलेल्या भाज्या खाण्याचे ५ फायदे, मात्र भाज्या उकडण्याची नेमकी पद्धत माहीत आहे का?

उकडलेल्या भाज्या खाण्याचे ५ फायदे, मात्र भाज्या उकडण्याची नेमकी पद्धत माहीत आहे का?

Weight Loss Tips: वेटलॉससाठी उकडलेल्या भाज्या खाणारे अनेक लोक आपण आजूबाजूला पाहतो.. पण का आणि कोणी खायच्या उकडलेल्या भाज्या? (boiled vegetables) काय त्याचे फायदे? असे प्रश्न नेहमी अनेकांना पडतात... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 07:47 PM2022-03-23T19:47:11+5:302022-03-23T19:47:52+5:30

Weight Loss Tips: वेटलॉससाठी उकडलेल्या भाज्या खाणारे अनेक लोक आपण आजूबाजूला पाहतो.. पण का आणि कोणी खायच्या उकडलेल्या भाज्या? (boiled vegetables) काय त्याचे फायदे? असे प्रश्न नेहमी अनेकांना पडतात... 

5 benefits of eating boiled vegetables, Read about the exact method of boiling vegetables for weight loss | उकडलेल्या भाज्या खाण्याचे ५ फायदे, मात्र भाज्या उकडण्याची नेमकी पद्धत माहीत आहे का?

उकडलेल्या भाज्या खाण्याचे ५ फायदे, मात्र भाज्या उकडण्याची नेमकी पद्धत माहीत आहे का?

Highlightsवजन झटपट कमी करायचे असेल किंवा आहे ते वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, तर उकडलेल्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो.

आपल्या तब्येतीबाबत सतर्क असणारे लोक किंवा वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करणारे लोक उकडलेल्या भाज्या (boiled veggies for weight loss) हमखास खातात. अनेक सेलिब्रिटींच्या डाएट संदर्भातही आपण उकडलेल्या भाज्यांचा उल्लेख हमखास ऐकलेला किंवा वाचलेला असतो. त्यामुळे हा डाएट नेमका कुणासाठी असतो, काय त्याचे फायदे आणि आपण जर अशा उकडून भाज्या खाल्ल्या तर काय हाेईल, असे प्रश्न सर्वसामान्य लोकांना नेहमीच पडतात. म्हणूनच तर उकडलेल्या भाज्या खाल्ल्यामुळे नेमका काय फायदा होतो, हे आपण या लेखात बघणार आहोत..

 

उकडलेल्या भाज्या खाल्ल्याने होणारे फायदे (benefits of eating boiled vegetables)
१. वेटलॉस

जे लोक उकडलेल्या भाज्या खातात, त्यांच्यापैकी बहुतांश लोकांचा उद्देश वजन कमी करणे हाच असतो. वजन झटपट कमी करायचे असेल किंवा आहे ते वजन नियंत्रणात ठेवायचे असेल, तर उकडलेल्या भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. याशिवाय आपण भाज्या उकडतो. त्यामुळे त्यासोबत पाण्याचा अंशही पोटात जातो. या दोन्हींमुळे भरपूर वेळ पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदा होतो. याशिवाय पाण्यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. 

 

२. भरपूर उर्जा मिळते
अनेकदा जेव्हा आपण पोटभर जेवतो, तेव्हा जेवल्यानंतर आळस येतो. थकवा येतो. शरीर जड झाल्यासारखे वाटते आणि आपण सुस्त होतो. पण उकडलेल्या भाज्या जेव्हा तुम्ही पोटभर खाता, तेव्हा अशा प्रकारची अडचण कधीच जाणवत नाही. उलट तुम्ही अधिक फ्रेश होता आणि उत्साही राहता. कारण या प्रकारच्या आहारातून भरपूर उर्जा मिळते. 

 

वेटलॉससाठी भाज्या उकडण्याची योग्य पद्धत...
- वेटलॉससाठी बॉईल्ड सलाद हा जो प्रकार खाल्ला जातो, त्यात प्रामुख्याने ब्रोकोली, गाजर, बीन्स, काळे मीरे, लसूण पाकळ्या, थोडंसं मीठ आणि ८ ते १० काजू यांचा समावेश असतो. 
- भाज्या उकडण्यासाठी सगळ्यात आधी एका कढईत पाणी टाका. त्यावर कुकरमधली जाळी ठेवा.
- आता त्यात मावेल असे एक भांडे घ्या, त्यात वरील सर्व भाज्या आणि इतर पदार्थ टाका. 
- कढईवर झाकण ठेवा आणि ८ ते ९ मिनिटे वाफ येऊ द्या. 
- वाफेवर शिजलेल्या भाज्या वेटलॉससाठी खातात. शिजवताना त्यात पाणी घालत नाहीत. 

 

Web Title: 5 benefits of eating boiled vegetables, Read about the exact method of boiling vegetables for weight loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.