Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > डॉक्टर सांगतात, रोज ‘हे’ ५ पदार्थ खा, भराभर वजन घटेल! सुटलेलं पोट होईल कमी

डॉक्टर सांगतात, रोज ‘हे’ ५ पदार्थ खा, भराभर वजन घटेल! सुटलेलं पोट होईल कमी

Ayurvedic Home Remedies For Weight Loss : हळदीत शरीराला शुद्ध करणारे गुण असतात. ज्यामुळे इम्यूनिटी वाढते, कफ कमी होतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2024 08:38 PM2024-08-25T20:38:52+5:302024-08-26T16:41:53+5:30

Ayurvedic Home Remedies For Weight Loss : हळदीत शरीराला शुद्ध करणारे गुण असतात. ज्यामुळे इम्यूनिटी वाढते, कफ कमी होतो.

5 Best And Effective Ayurvedic Home Remedies For Weight Loss According To Ayurveda Doctor | डॉक्टर सांगतात, रोज ‘हे’ ५ पदार्थ खा, भराभर वजन घटेल! सुटलेलं पोट होईल कमी

डॉक्टर सांगतात, रोज ‘हे’ ५ पदार्थ खा, भराभर वजन घटेल! सुटलेलं पोट होईल कमी

वजन (Weight Loss Tips) कमी करण्यासाठी काय करायचं, वजन कमी करण्याचे घरगुती उपाय कोणते, लठ्ठपणा कसा कमी करावा, पोटाची चरबी कशी कमी करावी असे प्रश्न अनेकांना पडतात. जगभरातील लोक लठ्ठपणाचा सामना करात आहेत. लठ्ठपणामुळे तुमची सुंदरताच खराब होत नाही तर अनेक गंभीर आजारही उद्भवतात. जीमला न जाता किंवा डाएट न करता वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर काही आयुर्वेदीक उपाय करून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. (5 Best And Effective Ayurvedic Home Remedies For Weight Loss According To Ayurveda Doctor)

आयुर्वेदीत डॉक्टर  दिक्षा भावसार सांगतात की आयुर्वेदात असे काही पदार्थ आहेत ज्याच्या सेवनाने वजन कमी करण्यास मदत होते.  या खाद्यपदार्थांमुळे फक्त वजन कमी होण्यास मदत होत नाही तर हॉर्मोनल इम्बेंलेंस, संवेदनशील, कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईइड्स कमी होण्यास मदत होते. 

1) मध

आयुर्वेदात मधाचा समावेश कमी फॅट्सयुक्त पदार्थांमध्ये केला जातो. हा एक गोड पदार्थ असून मधाच्या सेवनाने अन्नाचे पचन होण्यास मदत होते. रोज सकाळी रिकाम्या पोटी एक चमचा मध आणि कोमट पाणी,  लिंबू पाण्यासोबत घ्या. 

2) आवळा

आवळा वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांना संतुलित करते.  ज्यामुळे कामेच्छा  चांगली राहते आणि त्वचा तरूण राहते. डायबिटीस, केस गळणं, एसिडीटीची समस्या टाळण्यासाठी आवळा फायदेशीर ठरतो. एक चमचा आवळा मधासोबत रिकाम्या पोटी प्यायल्यानं तब्येत चांगली राहण्यास मदत होते. 

3) हळद

हळदीत शरीराला शुद्ध करणारे गुण असतात. ज्यामुळे इम्यूनिटी वाढते, कफ कमी होतो, डायबिटीस नियंत्रणात राहण्यास मदत होते. अर्धा चमचा हळदीत अर्धा चमचा मध किंवा आवळा मिसळून रिकाम्या पोटी घ्या. 


4) जवस

जवस फॅट्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. शरीराला पोषण मिळते. वजन कमी करण्यासही मदत होते, कोलेस्टेरॉल कंट्रोल होते, पचनक्रिया चांगली राहते, शारीरिक ताकद वाढवण्यास मदत होते. वजन कमी  करण्यासाठी जवसाचे सेवन फायदेशीर ठरते. 

अंगात कॅल्शियम कमी-हाडं कमजोर आहेत? २० रूपयातं ५ पदार्थ खा, कॅल्शियम कधीच कमी पडणार नाही

5) आलं

आल्याच्या सेवनानं भूक आणि पचनक्रिया चांगली राहण्यास मदत होते. हृदयाचे आरोग्य चांगले राहते. ग्रीन टी मध्ये घालून आवळ्याचे सेवन करा. दिवसातून एक ते दोनवेळा याचे सेवन केल्यानं  शरीराला बरेच फायदे  मिळतात.

Web Title: 5 Best And Effective Ayurvedic Home Remedies For Weight Loss According To Ayurveda Doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.