Join us  

फळं खा, वजन घटवा! वेटलॉससाठी खा 5 प्रकारची फळं, वजन कमी- स्किनवरही येईल ग्लो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2022 1:06 PM

Fruits For Weight Control: वेटलॉस किंवा वेट कंट्रोल (weight loos and weight control) या दोन्ही गोष्टींसाठी प्रयत्न करत असाल तर ही काही फळं तुमची वेटलॉस जर्नी (fruits that helps in weight loss journey) नक्कीच अधिक सोपी करू शकतात..

ठळक मुद्देवजन कमी करायचं असेल तर ही काही फळ नियमितपणे खा.काही फळांमध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतं. अशी फळ पचनक्रिया, मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी मदत करतात.

वजन कमी करण्यासाठी काही जणं कठोर मेहनत घ्यायला तयार असतात. त्यासाठी एकदम हेवी वर्कआऊट, तसंच खाण्यापिण्यावर (workout and diet) कंट्रोल असं सगळं करण्याची त्यांची तयारी असते. काही जणं व्यायाम करतात पण खाण्यावर कंट्रोल (5 Best fruits for weight loss) ठेवणं त्यांच्यासाठी कठीण असतं. काही जणांचं यापेक्षाही वेगळं असतं. कमीत कमी व्यायाम करतात, पण खाण्यावर मात्र जबरदस्त कंट्रोल ठेवतात. आता वजन कमी कसं करायचं, याचा मार्ग प्रत्येकाचा वेगळा असतो. पण तरीही सगळ्यांना उपयोगी पडेल आणि वेटलॉस (weight loss journey) करण्यासाठी फायदेशीर ठरेल, असा एक उत्तम पर्याय म्हणजे काही फळं नियमित खाणं. (Fruits For Weight Control)

 

वजन कमी करायचं असेल तर अर्थातच तुम्हाला काय खायचं आणि काय टाळायचं हे अगदी परफेक्ट माहिती हवं. कारण ज्याप्रमाणे काही पदार्थ वजन वाढविण्यासाठी उपयुक्त ठरतात, तसंच काही फळांच्या बाबतीतही असतं. काही फळं वजन वाढविण्यासाठी मदत करतात. त्यामुळे वेटगेन करण्यासाठी त्यांचा चांगला उपयोग होतो. त्याचप्रमाणे काही फळांमध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतं. अशी फळ पचनक्रिया, मेटाबॉलिझम सुधारण्यासाठी मदत करतात. यामुळे आपोआपच वेटलॉस होण्यासाठी मदत होते. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर ही काही फळ नियमितपणे खा.

 

वेटलॉससाठी मदत करणारी फळं (Fruits For Weight Loss)१. संत्री संत्री या लिंबूवर्गीय फळामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्याशिवाय त्यामध्ये ८८ टक्के पाणी असते. त्यामुळे शरीराला भरपूर प्रमाणात पाणी देऊन शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी संत्री खाणं अतिशय फायद्याचं ठरतं. शिवाय संत्री खाल्ल्याने भरपूर वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. संत्र्यामध्ये फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम हे घटकही मोठ्या प्रमाणात असतात. 

 

२. टरबूज- खरबूजही खास उन्हाळी फळं. पण काही भागांमध्ये उन्हाळ्यानंतरही टरबूज मिळतं. या दोन्ही फळांमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते. पाणी ज्या फळांत जास्त प्रमाणात असते, ते फळ वजन कमी करण्यासाठी किंवा आहे ते वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतं. त्याशिवाय टरबूज, खरबूज या दोन्ही फळांमध्ये कॅलरीचे प्रमाण खूप कमी असते.

 

३. किवीकिवी हे देखील एकप्रकारचं सायट्रस फ्रुट आहे. किवीमध्येही भरपूर प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे हे फळ खाल्ल्याने अधिक वेळपर्यंत पोट भरल्यासारखं वाटतं. शिवाय किवीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी किवी आवर्जून खावं, असा सल्ला डॉक्टर देतात. एखाद्या मोठ्या आजारातून उठलेल्या व्यक्तीलाही शरीराची ताकद भरून येण्यासाठी किवी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे थोडंसं खाल्लं तरी भरपूर पोषण देणारं फळ म्हणून किवी ओळखलं जातं.

 

४. सफरचंदकॅलरी अगदी कमी प्रमाणात असणं आणि फायबर खूप जास्त प्रमाणात असणं हे सफरचंदाचं वैशिष्ट्य. सफरचंदाच्या या दोन्ही गोष्टी वजन कमी करण्यासाठी जो काही आहार सांगितलेला असतो, त्या आहारानुसार परफेक्ट मानल्या जातात. कॅलरी कमी असल्याने वजन वाढण्याचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होतो. शिवाय फायबर भरपूर असल्यामुळे खूप अधिक वेळ पोट भरल्यासारखं वाटतं. फायबरचा आणखी एक फायदा म्हणजे पचनक्रिया, चयापचय क्रिया व्यवस्थित होते, त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन होऊन आपोआपच शरीरावर अतिरिक्त चरबी साचण्याचं प्रमाण कमी होतं.  

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यहेल्थ टिप्सफळे