Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > पोट लटकतंय-दंड, मांड्या थुलथुलीत दिसतात? डाळिंबाचे दाणे ५ प्रकारे खा-चरबी भराभर कमी होईल

पोट लटकतंय-दंड, मांड्या थुलथुलीत दिसतात? डाळिंबाचे दाणे ५ प्रकारे खा-चरबी भराभर कमी होईल

How To Consume Pomegranate For Weight Loss (Vajan kami karnyasathi kay khave) : डाळिंब एक एंटी इंफ्लामेटरी फूड आहे जे डायटरी फायबर्सनी परीपूर्ण आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 12:25 PM2024-10-24T12:25:19+5:302024-10-24T12:36:05+5:30

How To Consume Pomegranate For Weight Loss (Vajan kami karnyasathi kay khave) : डाळिंब एक एंटी इंफ्लामेटरी फूड आहे जे डायटरी फायबर्सनी परीपूर्ण आहे.

5 Best Way To Consume Pomegranate For Weight Loss And Belly Fat | पोट लटकतंय-दंड, मांड्या थुलथुलीत दिसतात? डाळिंबाचे दाणे ५ प्रकारे खा-चरबी भराभर कमी होईल

पोट लटकतंय-दंड, मांड्या थुलथुलीत दिसतात? डाळिंबाचे दाणे ५ प्रकारे खा-चरबी भराभर कमी होईल

डाळिंब (Pomegranate) खाण्याचे भरपूर फायदे आहेत. जर तुम्ही डाळिंब योग्य पद्धतीनं खाल्ले तर वजन कमी करण्यास मदत होऊ शकते. यामुळे फक्त पोटाची चरबीच नाही तर हात आणि मांड्याची चरबीसुद्धा कमी होते. हिवाळ्याच्या दिवसात डाळिंबाचे सेवन करायला हवे. डाळिंब खाल्ल्यानं रक्त तयार होते, ब्लड सर्क्युलेशन चांगले राहते. रक्त प्रवाह सुधारून शरीरात गरमी टिकून राहते आणि थंडीपासून बचाव होतो. वजन कमी करण्यासाठी डाळिंब अनेकदृष्ट्या फायदेशीर ठरते. (5 Best Way To Consume Pomegranate For Weight Loss And Belly Fat)

लठ्ठपणा एक मोठी समस्या आहे. जगभरातील तज्ज्ञ लठ्ठपणावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी डाएट हेल्दी असणं फार महत्वाचे आहे. नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी एण्ड इन्फॉर्मेशनच्या रिपोर्टनुसार डाळिंब आणि डाळिंबाचा रस फॅट कमी करण्यासाठी परिणामकारक ठरतो. यात एंथोसायनिन, टॅनिन, एंटी ऑक्सिडेंट्स उच्च प्रमाणात असतात.

डाळिंबातील पोषक तत्व

डाळींबात फॅट आणि कॅलरीजचे प्रमाण कमी असते. याशिवाय यात व्हिटामीन्स, फायबर्स, मिनरल्स जास्त असतात. वजन कमी करण्यासाठी अशी फळं आवश्यक असतात. या प्रकारची पौष्टीक फळं खाल्ल्यानं हार्ट, ब्रेन, रेस्पिरेटरी, हेल्थ आणि युरिनरी हेल्थ चांगली राहते. 

डाळिंब एक एंटी इंफ्लामेटरी फूड आहे जे डायटरी फायबर्सनी परीपूर्ण आहे. अभ्यासानुसार फायबर्स आतड्यांमधील बॅक्टेरिया हेल्दी राहण्यास मदत करते. ज्यामुळे मेटाबॉलिक हेल्थ सुधारते आणि मेटाबॉलिझ्मचा वेग वाढतो. मेटाबॉलिझ्म तुमच्या कॅलरीज वेगानं बर्न करते. अनेकदा लठ्ठपणाचं कारण इंफ्लामेशन ठरते ज्यामुळे लोकलाईज ओबेसिटी वाढते. डाळिंबात एंटी इंफ्लामेटरी गुणधर्म असतात यातील गुणांमुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी डाळिंबाचे सेवन कसे करावे?

तुम्ही डाळिंब सोलून थेट खाऊ शकता किंवा डाळिंबाचा रस काढून रस प्या, डाळिंबाचे इनफ्यूस्ड वॉटर बनवून पिऊ सकता, डाळिंबाची स्मूदीसुद्धा उत्तम पर्याय आहे. पोस्ट वर्कआऊट डाएटमध्ये याचा समावेश करा. डाळिंब नियमित  खाल्ल्यानं शरीरात रक्ताची कमतरता भासत नाही. 

Web Title: 5 Best Way To Consume Pomegranate For Weight Loss And Belly Fat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.