Join us  

सायंकाळी पोटभर खा ५ पदार्थ, रात्री न जेवताही मग होईल वजन झटपट कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2024 5:28 PM

5 Delicious, Easy Snacks That Will Help You Lose Weight : वजन वाढण्याच्या भीतीने रात्रीचं जेवणच बंद? मग सायंकाळीच खा ५ पदार्थ, वजन वाढणार नाही

वजन कमी करण्यासंदर्भात आपण अनेक मिथ्स पहिल्या असतील. काही लोकं वजन  कमी करण्याच्या नादात रात्रीचं जेवण स्किप करतात. किंवा भात-चपाती खाणं सोडतात. पण या सगळ्या गोष्टीमुळे खरंच वजन कमी होते का? वजन वाढण्याच्या भीतीने लोकं रात्रीचं जेवण खाणं टाळतात. जर आपण रात्रीचं जेवण करणं टाळत असाल तर, सायंकाळी फायबरयुक्त स्नॅक्सचे सेवन करा.

फायबरयुक्त स्नॅक्स खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. शिवाय पचनक्रियाही सुधारते. ज्यामुळे पोटाचे विकार आपल्याला छळत नाही. जर आपण देखील रात्रीचं जेवण स्किप करत असाल तर, सायंकाळी फायबरयुक्त स्नॅक्स खा(5 Delicious, Easy Snacks That Will Help You Lose Weight).

फायबर म्हणजे काय? यामुळे वजन कमी होते का?

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनवर प्रकाशित, मेडलाइन प्लसच्या संशोधनानुसार, फायबर हे अन्नामध्ये आढळणारे न पचणारे कार्बोहायड्रेट आहे. फायबर प्रत्येक पदार्थात आढळत नसून, ते फळे, भाज्या, धान्य यासह इतर पौष्टीक पदार्थात आढळून येते.'

सूर्यफुलाचं तेल वापरलं तर वाढलेलं वजन सरसर कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, तेलाचा इफेक्ट

शरीरात फायबर कशारित्या काम करते?

मेडलाइन प्लस या वेबसाईटनुसार, 'फायबर अन्न गोळा करते, आणि आतड्यांमध्ये जमा करून ठेवते. फायबरयुक्त आहार घेतल्यास भूक कमी लागते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते. यासह पचनक्रिया सुधारते. ज्यामुळे बद्धकोष्ठता यासह इतर पोटाचे विकार आपल्याला छळत नाही.

फायबरयुक्त स्नॅक्स

ओट्स टिक्की

वेट लॉस करताना आपण ओट्स खातोच. ओट्स खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत होते. जर आपल्याला दुधासोबत ओट्स खायला आवडत नसेल तर, ओट्सचे चमचमीत टिक्की तयार करून खा. ओट्स टिक्की खाल्ल्याने आपले पोट दीर्घकाळ भरलेले राहील. शिवाय चयापचयाला गती मिळेल. त्यामुळे सायंकाळी स्नॅक्समध्ये आपण ओट्स टिक्की खाऊ शकता.

क्विनोआ व्हेज उपमा

क्विनोआमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. जर आपण सायंकाळी क्विनोआचा व्हेज उपमा करून खात असाल तर, आपल्याला सायंकाळी भूक लागणार नाही. क्विनोआ व्हेज उपमा खाल्ल्याने आपल्या पोटातील मेटाबॉलिक रेट वाढते. शिवाय त्यात आपण भाज्या देखील घालून शकता. भाज्यांमुळे शरीराला इतर पौष्टीक घटक मिळतील.

सुंदर आकर्षक लांबसडक पापण्या हव्या? पापण्यांना लावा रोज ‘खास’ तेल, डोळे दिसतील टपोरे

व्हेज अप्पे

दाक्षिणात्य पदार्थ अप्पे कोणाला नाही आवडत. बनवायला सोपी, चवीला भारी आणि पचायला हलकी ही रेसिपी झटपट तयार होते. जर आपण रात्रीचं जेवण स्किप करत असाल तर, सायंकाळी स्नॅक्समध्ये व्हेज अप्पे खा. एका प्लेटमध्ये आपले पोट भरेल.

चिवडा

हेल्दी चिवड्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. हे पचायला हलके तर असतेच, शिवाय चविष्ट असल्यामुळे आपल्या जिभेचे चोचले पुरवले जातात. चिवडा खाल्ल्याने मेटाबॉलिक रेट वाढते. ज्यामुळे वेट लॉससाठी मदत होते.

फ्रुट चाट

फ्रुट चाट खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. यामध्ये जीवनसत्त्वे, फायबर आणि अनेक पोषक तत्वे असतात. ज्यामुळे शरीर निरोगी राहते. फ्रुट चाट खाल्ल्याने आपले पोट फुगत नाही. शिवाय पोटाचे विकारही छळत नाही.

टॅग्स :वेट लॉस टिप्सफिटनेस टिप्स