Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > 5 चवदार ड्रिंक्स - बॉडी डीटॉक्स तर करतातच पण मूडही ठेवतात फ्रेश- फिटनेससाठीही पुरेपूर फायदेशीर 

5 चवदार ड्रिंक्स - बॉडी डीटॉक्स तर करतातच पण मूडही ठेवतात फ्रेश- फिटनेससाठीही पुरेपूर फायदेशीर 

Detox Drinks For Fitness: कायम फ्रेश आणि हेल्दी रहायचं असेल, तर वेळोवेळी बॉडी डिटॉक्स (body detox) करणं गरजेचंच आहे. त्यासाठीच तर बघा हे खास चवदार डिटॉक्स ड्रिंक्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2022 08:00 AM2022-07-08T08:00:02+5:302022-07-08T08:05:02+5:30

Detox Drinks For Fitness: कायम फ्रेश आणि हेल्दी रहायचं असेल, तर वेळोवेळी बॉडी डिटॉक्स (body detox) करणं गरजेचंच आहे. त्यासाठीच तर बघा हे खास चवदार डिटॉक्स ड्रिंक्स.

5 Detox drinks to keep your body clean, how to make detox drinks, Homemade detox drinks | 5 चवदार ड्रिंक्स - बॉडी डीटॉक्स तर करतातच पण मूडही ठेवतात फ्रेश- फिटनेससाठीही पुरेपूर फायदेशीर 

5 चवदार ड्रिंक्स - बॉडी डीटॉक्स तर करतातच पण मूडही ठेवतात फ्रेश- फिटनेससाठीही पुरेपूर फायदेशीर 

Highlightsहे पेय प्यायल्याने शरीर आतून स्वच्छ तर होतेच, पण मूड फ्रेश ठेवण्यासाठीही त्याचा भरपूर उपयोग होतो.

आपल्या शरीरात रोजच्या रोज अनेक विषारी पदार्थ म्हणजेच वेगवेगळे टॉक्झिन्स (toxins in body) तयार होत असतात. उत्तम आरोग्यासाठी हे विषारी पदार्थ वेळोवेळी शरीराबाहेर फेकले जाणं अतिशय गरजेचं असतं. कारण असे पदार्थ शरीरात साचून राहल्याने त्याचे आरोग्यावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात. त्यामुळेच नियमितपणे बॉडी डिटॉक्स (How to do body detox) करण्याची गरज असते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास बॉडी डिटॉक्स करणे म्हणजे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर फेकून देणे. यासाठी घ्या हे काही खास ड्रिंक्स. हे पेय प्यायल्याने शरीर आतून स्वच्छ तर होतेच, पण मूड फ्रेश ठेवण्यासाठीही त्याचा भरपूर उपयोग होतो.

 

असे तयार करा डिटाॅक्स ड्रिंक्स
१. दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळा, त्यात अर्धा टेबलस्पून मध घाला आणि ते पाणी प्या. हा बॉडी डिटॉक्स करण्याचा सगळ्यात सोपा घरगुती उपाय आहे. अधिक चांगला फायदा मिळविण्यासाठी त्यात काही थेंब आल्याचा रस घालावा, असा सल्लाही तज्ज्ञ देतात.


२. दालचिनी आणि मेथ्याचे दाणे घालून केलेला चहा हा देखील बॉडी डिटॉक्स करण्याचा एक चांगला उपाय आहे. हा चहा करताना त्यात दूध आणि साखर घालू नये. चवीसाठी थोडासा गूळ घातला तर चालेल. हा चहा रात्री झोपताना प्यावा. यामुळे मेटाबॉलिझम रेट आणि पचनशक्ती वाढून पोट साफ होण्यास मदत होते.


३. काही लोकांना वारंवार चहा पिण्याची, कॉफी पिण्याची सवय असते. असं चहा- कॉफी पिण्यापेक्षा ग्रीन टी पिण्यास प्राधान्य द्या. कारण ग्रीन टी मध्ये असणारे पौष्टिक घटक बॉडी डिटॉक्स एजंट म्हणून काम करतात. त्यामुळे साधा चहा आणि कॉफी वारंवार पिऊन आरोग्य बिघडविण्यापेक्षा ग्रीन टी पिणे कधीही चांगले.


४. दही हे देखील या बाबतीत अतिशय उपयुक्त आहे. दह्यामध्ये असे अनेक बॅक्टेरिया असतात जे पचन क्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. त्यामुळे ताजे दही नियमितपणे खावे. ताजे दही खाल्ल्याने ते बाधतही नाही. ताज्या दह्याचे ताक करून प्यायल्यास अधिक उत्तम.


५. बॉडी डिटॉक्झिफिकेशनसाठी पाणी पिणे हा एक उत्तम उपाय मानला जातो. दिवसातून अडीच ते तीन लीटर पाणी पिण्याची गरज आहे. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये शरीराबाहेर फेकण्यास मदत तर होतेच, शिवाय शरीर हायड्रेटेड राहण्यासही मदत होते. 


 

Web Title: 5 Detox drinks to keep your body clean, how to make detox drinks, Homemade detox drinks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.