Join us  

पोटाचा घेर कमी करण्यासाठी ५ सोप्या गोष्टी नियमित करा, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2022 3:38 PM

5 Diet Tips for Loosing Tummy Fat : आहाराबाबत काही गोष्टी पाळल्या तर वाढलेले पोट कमी होण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो.

ठळक मुद्देमिनी मिल म्हणजेच आपण नेहमी जिकते खातो त्याच्या अर्धेच एकावेळी खायला हवे. आपल्यापैकी बहुतांश जणांना पोटाचा घेर वाढण्याचीच समस्या जास्त असते, अशावेळी डाएटमध्ये नेमके कोणते बदल करावेत याविषयी..

पोटाचा वाढता घेर ही अनेकांपुढील एक मोठी समस्या असते. आरोग्यासाठी तर पोटावर वाढलेली चरबी चांगली नसतेच पण सौंदर्याच्या दृष्टीनेही हे वाढलेले पोट चांगले दिसत नाही. पोट एकदा वाढायला लागले की ते कमी करणे हा मोठा टास्क असतो. दिवसभराची बैठी जीवनशैली, जंक फूडचे सेवन, व्यायामाचा अभाव यांसारख्या कारणांनी पोटाचा घेर वाढत जातो. मग वाढलेले पोट कमी करण्यासाठी कधी आपण मनानेच काही डाएट फॉलो करतो तर कधी जीम जॉईन करतो. मात्र तरी म्हणावा तसा रिझल्ट मिळतोच असे नाही. मात्र आहाराबाबत काही गोष्टी पाळल्या तर वाढलेले पोट कमी होण्यासाठी त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ अंजली मुखर्जी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन याबाबत एक महत्त्वाची पोस्ट शेअर करतात. त्यामध्ये त्या कोणते ५ उपाय सांगतात ते पाहूया (5 Diet Tips for Loosing Tummy Fat)...

१. आहारात हाय फायबर असणाऱ्या पदार्थांचा समावेश वाढवायला हवा. यामध्ये तुम्ही गव्हाचा कोंडा, ओटसचा कोंडा आणि ज्वारी यांचा समावेश करु शकता. यांमुळे चरबी कमी होण्यास चांगली मदत होते.  

२. पांढरा भात, ब्रेड, केक, पिझ्झा यांसारखी रिफाईंड कार्बोहायड्रेटस शक्यतो टाळायला हवीत. या पदार्थांमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते आणि वजन वाढीवर त्याचा परिणाम होतो. 

३. वयाच्या ४० वर्षानंतर आहारातील कार्बोहायड्रेटसचा समावेश ४० टक्क्यांनी कमी करायला हवा. याचं कारण म्हणजे आपलं जसं वय होत जातं तशी आपल्या शरीराची कार्बोहायड्रेटस पचवण्याची ताकद कमी होते. त्यामुळे हे कार्बोहायड्रेटस पचले गेले नाहीत तर ते पोटावर वाढतात आणि पोट वाढत जाते. 

४. एकावेळी कमी प्रमाणात खा. मिनी मिल म्हणजेच आपण नेहमी जिकते खातो त्याच्या अर्धेच एकावेळी खायला हवे. जेणेकरुन ते पचायला हलके होते, तसेच कमी जेवल्यान पोटाचा वाढणारा घेत आपोआप नियंत्रणात येतो. 

५. दर चार तासांनी खा. लहान मील घेतल्याने ठराविक काळाने भूक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे दर थोडा वेळाने काहीतरी खात राहा.   

 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआहार योजना